फिर भी दिल हैं हिंदुस्तानी..

 

लाईफस्टाईल भिडू, लाईफस्टाईल..

मोदीच्या हातातलं घड्याळ पाहिलं का ? ते गॉगल कोणत्या ब्रँँडचं होतं रे ? वाह काय स्टाईल आहे. बाकी काही असेल नसेल पण स्टाईलीश राहणाऱ्या निवडक पंतप्रधानांमध्ये नरेंद्र मोदींच नांव नक्कीच प्राधान्यानं घ्यावं लागेल. नरेंद्र मोदींच्या स्टाईलबद्दल अनेकांची वेगवेगळी मतं असतील. लोकशाहीत पंतप्रधानांच्या कपड्यांबाबत सर्वांनी सतर्क असणं ही खरं तर लोकशाहीची गरज असावीच. म्हणूनच खास माहितीच्या अधिकारात आम्ही आपल्याला सांगतोय प्रधानसेवक नरेंद्र मोदी नक्की कोणकोणते ब्रॅण्ड वापरतात त्याबद्दल…

तर हे वाचा, जेव्हा मोदी मित्रों म्हणतील तेव्हा त्यांच्या प्रत्येक ब्रॅण्डची आकडेवारी सख्या मित्राप्रमाणे तोंडावर इतरांना सांगा कारण असलं पोलिटिकल ग्यान चार चौघात इम्प्रेशन झाडण्यासाठी खूप महत्वाचं असतं.

 

  • गॉगल –

मित्रों, प्रधानसेवक ‘बुल्गरी’ ब्रॅण्डचा गॉगल वापरतात. ‘रे बॅन’च्या पुढे आपली  गाडी कधीच गेली नाही हे आम्ही जाणतो. तर हा ‘बुल्गेरी’ ब्रॅण्ड आहे इटलीचा. ही कंपनी खरं तर सोन्याचे दागिने बनवते. पण आत्ता गॉगल निर्मातीमध्ये देखील या कंपनीने आपले पाय घट्ट रोवलेत. या कंपनीच्या गॉगलची सुरवात होते ती ३० हजारांपासून पुढे.
आत्ता ही माहिती समोर आल्यानंतर त्यांना कधीतरी कोणीतरी सांगावं साहेब, कधीतरी इटलीच्या चष्म्यातून राजकारण पहायचं बंद करा !!!

 

  • पेन –

बराक ओबामा, दलाई लामा, अमिताभ बच्चन, वॉरेन बफेट जगभरातील दबंग माणसं जो पेन वापरतात तोच पेन मोदी वापरतात. ‘मोन्ट ब्लॉक’ असं या कंपनीचं नांव. ही कंपनी जर्मनची आहे आणि जर्मनीतल्या सर्वोच्च पर्वतावरुन या कंपनीचं नांव ठेवण्यात आलंय. या पेनची किंमत सुरू होते दिड लाखापासून .

  • घड्याळ –

‘मोवाडो’ कंपनीचं कधी नाव ऐकलय का…? स्वित्झर्लंडची  कंपनी आहे. जिथं भारतीयांचा ठेवलेला काळा पैसा लपून आहे. मोदी तो पैसा परत आणणार होते आणि प्रत्येक भारतीयाच्या खात्यात पंधरा लाख टाकणार होते. काळा पैसा तर काय आला नाही पण हे घड्याळ आलं. चाळीस हजारांपासून सुरु होणाऱ्या या घड्याळाची किंमत दिड लाखांपर्यन्त जाते.

 

  • सुट –

JADEBLUE या कंपनीचं नांव कधी ऐकलंय का ? काळजी नको ही कंपनी बाहेरची नाही, अहमदाबादचीच आहे. नरेंद्र मोदी गेली वीस वर्ष याच ठिकाणावरुन डिझायनर सुट शिवून घेतात असं सांगितलं जातं. जतिन आणि बिपीन यांची ही कपंनी देशातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखले जाती. बाकीचं काहीही असो कपड्याच्या बाबतीत मोदी ‘देशीवादी’ असल्याचं दिसून येतं.

 

  • मोबाईल –

अॅप्पल. जगात कितीही श्रीमंत असला तर त्याची झेप अॅप्पल पर्यन्तच जाते. जास्तीच जास्त सोन्याचा अॅप्पल, हिरे लावलेला अॅप्पल घेऊन ताल करता येवू शकतो. पण अॅप्पलच लागतो. प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांच्याकडे देखील अॅप्पलच आहे. अॅप्पलचे नव-नवीन व्हेरियंट त्यांना वापरायला आवडतात असं राजकीय तज्ञ सांगतात.

बाकी अजूनही खूप गोष्टी असतील, जशा-जशा त्या बाहेर पडतील तशा-तशा त्या तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.