मोदी म्हणतायेत, केंद्राच्या यंत्रणेचा उपयोग लोकांना घाबरवण्यासाठी करू नये.

“गेल्या सहा-सात वर्षांमध्ये आम्ही लोकांमध्ये विश्वास निर्माण करू शकलो आहोत की देशातील भ्रष्टाचार थांबवणे शक्य आहे आणि आम्ही ते करून दाखवलं. देशातील लोकांचा विश्वास आहे की त्यांना कोणत्याही मध्यस्थांशिवाय सरकारी योजनांचा लाभ मिळेल, ”असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

याच निमित्त म्हणजे, गुजरातमध्ये केंद्रीय मुख्य दक्षता आयोग CVC आणि केंद्रीय अन्वेषण विभाग CBI यां संस्थांच्या संयुक्त परिषदेमध्ये नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे अधिकाऱ्यांना संबोधित करतांना भ्रष्ट्राचाराबाबत परखड मते व्यक्त केलीत.

केंद्रीय मुख्य दक्षता आयोग आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यांच्या संयुक्त परिषदमध्ये ऑनलाईन  कार्यक्रमाद्वारे अधिकाऱ्यांना संबोधित करतांना हे परखड मत व्यक्त केलं आहे.

सरकारी योजनांविषयी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी लोकांना अनावश्यक व्यवहार किंवा मध्यस्थीमधून जाण्याची गरज नाही. याशिवाय, पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले की, देशाची फसवणूक करणाऱ्या किंवा गरिबांना लुबाडणाऱ्या कोणालाही सरकार दया दाखवत नाही आणि यापुढे देखील दाखवणारही नाही.

कोणी कितीही ताकदवान असो, जर ती व्यक्ती देशाच्या हिताच्या आड अन जनतेच्या हिताच्या आड येत असेल तर त्यावर कारवाई करतांना केंद्रीय यंत्रणांनी मागे रहाता कामा नये. जो कुणी देशाची फसवणूक करेल त्यांना जगात कुठेही सुरक्षित जागा सापडता कामा नये, असा इशारा देखील मोदींनी दिला.

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी असेही म्हटले की, ‘न्यू इंडिया’मधील भारतीय आता यापुढे भ्रष्टाचार हा व्यवस्थेला तोंड तर देतीलच आणि या भ्रष्टाचाराला समूळपणे नष्ट करतील असंही त्यांनी ठामपणे सांगितले, तसेच की भारत आता पारदर्शक व्यवस्था, एक कार्यक्षम प्रक्रिया आणि सुरळीत प्रशासन शोधत आहे आणि आम्ही गेल्या ७ वर्षांत हेच प्रशासन निर्माण करत आहोत.

ते असंही म्हणाले कि, केंद्राच्या यंत्रणेचा उपयोग लोकांना घाबरवण्यासाठी करू नये.

केंद्रीय यंत्रणेचा उपयोग हा कोणाला घाबरावण्यासाठी केला जाऊ नये अशी सूचना त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केली आहे. केंद्राच्या या यंत्रणेबद्दल लोकांच्या मनातील भिती आणि गैरसमज  हे काढून टाकली पाहिजेत.

त्यांनी असा विचार मांडला आहे कि,  केंद्र सरकारने ‘जास्तीत जास्त सरकारी नियंत्रण ठेवण्याऐवजी’ किमान सरकार, जास्तीत जास्त शासन’ या धोरणावर फोकस केला पाहिजे. तसेच असंही धोरणं राबवता येणं महत्वाचं आहे कि, प्रत्येक सरकरी प्रक्रिया त्रासमुक्त बनवण्याचा उद्देश सरकार समोर  आहे.

या भाषणाच्या दरम्यान त्यांनी आधीच्या सरकार वर देखील निशाना साधला आहे.

२०१४ च्या आधीच्या सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करतांना मोदी म्हणाले कि, आधीच्या  सरकारमध्ये भ्रष्ट्राचार विरोधात कारवाई करण्याची राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीची कमतरता होती. पण आता इथून पुढे असं होणार नाही. आणि गेल्या ७ वर्षामध्ये भाजप सरकारने  भ्रष्टाचाराचे अनेक मार्ग आणि प्रकार बंद केले आहेत. डिजीटल तंत्रज्ञानामुळे आता भ्रष्टाचाराला वाव राहिला नाहीये असा दावा देखील पंतप्रधान यांनी यावेळी केला.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.