मोदींनी खरच जाहीर सभेत शिवी दिली ?

एक व्हिडीओ धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओत नरेंद्र मोदी गुजरातीमध्ये भाषण देत आहेत. त्यात मध्येच ते म्हणतात , भेन्चोद. 

च्या गावात डायरेक्ट शिवी दे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून. हे कस शक्य आहे. आम्हालापण हाच प्रश्न पडला. निदान पदावर असणाना तरी मोदी अस बोलणार नाहीत. बर पंतप्रधान असले तरी रागाच्या भरात बोलले असतील अस समजून जरी घेतलं तरी निवडणुकाच्या टायमिंगला अस होणं जरा अशक्यतच वाटलं. त्यातही भाषण गुजरातीत त्यामुळे नेमक काय बोलले हे कळत नव्हतं. 

आत्ता तो व्हिडीओ काय आहे ते पहिला बघून घ्या. 

 

हा व्हिडीओ गौरव पांधी नावाच्या एका व्यक्तिने ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात अस लिहलय की, 

पंतप्रधान साहेब हि कोणत्या प्रकारची भाषा आहे. काय देशाचा पंतप्रधान अशा प्रकारची भाषा वापरण्यासाठी उत्तेजन देतात काय. ते पण सार्वजनिकरित्या. काहीच नसलं तर निदान खुर्चीचा तरी सन्मान ठेवा. 

झालं हाच व्हिडीओ तुफान शेअर झाला. वेगवेगळ्या पेजवरुन, व्हॉटस्एपवरुन तो फिरू लागला. पंतप्रधान भेन्चोद म्हणाले अशा चर्चा गावोगावी सुरू झाल्या. 

तर मुख्य मुद्दा, पहिला पंतप्रधान या भाषणात काय म्हणाले ते पहायला लागतय,

आने हावे जो बाधा को छो के पानी नी लड़ाई थावन छे तो…” 

याचा अर्थ जर प्रत्येक जण म्हणायला लागला की येणारे युद्ध हे पाण्यावरुन होईल.. 

हा व्हिडीओ Quint या न्यूजसाईटवरुन घेतलेला आहे. Quint ने केलेल्या youtube live वरुन मुळ व्हिडीओ पाहिला तर यामध्ये भेन्चोद हि शिवी कुठेच दिसत नाही. 

हा व्हिडीओ एडिट केलेला आहे आणि शेवटचा थावन छे तो हाच शब्द पुन्हापुन्हा वापरल्यामुळे तो भेन्चोद प्रमाणे ऐकू येत आहे. 

याबद्दल क्विंन्टच्या राघव बेहल यांनी देखील ट्विट करुन हा व्हिडीओ आपला नसल्याचं सांगितलं आहे. हा व्हिडीओ एडिट केला असून त्याबद्दल आणि तक्रार केली आहे अस स्पष्टिकरण देखील दिलय. 

 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.