बिचारे आपले पंतप्रधान चांगल्या मनाने मिठ्या मारतात आणि विनाकारण वाद ओढवतात.

एखाद्याला अन्कम्फर्टेबल करणं लय सोप्प असतं. कसं विचाराल तर हा फोटो बघा मग समजेल कसं ते !

modi 031121 073012

त्या फोटोतले ते महाशय किती अन्कम्फर्टेबल झाले असतील, हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतच आहे. नाही का ? 

हे महाशय म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव एंटोनियो गुटेरेस आहेत. आणि त्यांना हग देऊन मोदींनी अन्कफर्टेबल केलयं. आता हे फक्त आत्ताच असं झालंय असं नाही. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा परदेश दौऱ्यावर असतात तेव्हा ते ज्या देशात जातात त्या देशातल्या नेत्यांना भेटून गळाभेटी देतात. आणि त्यांना अन्कम्फर्टेबल करतात. 

हल्ली हल्ली मोदी G-20 समिट साठी रोमच्या दौऱ्यावर गेले होते. इथं मोदींनी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन, फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यानुअल मॅक्रोन, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या भेटी घेतल्या. यातल्या काही नेत्यांच्या गळाभेटी घेतल्या. हे सोडा मोदींनी या सगळ्यांच्या आधी ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. 

त्यांना पण कडकडून मिठी मारली मोदींनी. हा फोटो येतो न येतोच तोवर संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांना अन्कम्फर्टेबल गळाभेट घेतल्याचा फोटो आला. आणि सोशल मीडियावर मोदींना जगभरातून ट्रोल करण्यात आलं.

मोदी एवढे ट्रोल झाले, कारण कि… 

संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांना भेटले. त्याचा फोटो ब्रिटिश वृत्तपत्र डेली मेलने छापला. या फोटोला कॅप्शन दिल awkward moment वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने फोटोच्या खाली लिहिलं, 

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या वाढत्या घटनांदरम्यान, पंतप्रधान मोदींनी मास्क न लावता संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना मिठी मारली. फोटोमध्ये पंतप्रधान मोदींच्या मिठीमुळे गुटेरेस अस्वस्थ असल्याचे दिसत आहे. गुटेरेस यांनी मोदींना सुरक्षित अंतरावर ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी हस्तांदोलन करण्यासाठी आपला हात पुढे केला, पण मोदी मिठी मारायचे थांबलेच नाहीत.

ब्रिटिश वृत्तपत्र डेली मेल एवढंच लिहून थांबलं नाही. तर त्यांनी लिहिलं की, मोदी मास्क न लावता अशाच सगळ्या नेत्यांना मिठ्या मारत आहेत. 

मोदींचा आंतरराष्ट्रीय स्तरावर एवढा बाजार उठण्याच अजून एक कारण आहे ते म्हणजे, कोरोना अजून गेला नाही. संपला नाही. वॅक्सीन घेऊन सुद्धा कोरोना होऊ शकतो. त्यासाठीच मास्क आणि सोशल डिस्टनसिंग पाळा असं सगळं जग सांगतंय. अहो फक्त जगच नाही, तर भारत सरकारनं सगळ्यांच्या फोनवर कॉलर ट्यून लावलीय हे कस लक्षात येईन प्रधानसेवकांच्या. 

 

या गळाभेटी बघून मला तर गावच्या लग्नाची आठवण येते. असो आजपर्यंत त्यांनी कोणाकोणाला अन्कम्फर्टेबल केलंय बघूया… 

france x president 031121 075712

modi11 031121 081008

modi obama 031121 081311

modi facebook 031121 081746

prince william 031121 082913

untitled design 1 031121 084323

 एवढ्यानं भागलं नाही, म्हणून आता रोम मध्ये पण गुण उधळून आले हे बाबा..

 

Leave A Reply

Your email address will not be published.