त्वरा करा, त्या गुहेत तुम्ही देखील राहू शकता. भाडं फक्त…

मोदींनी केदारनाथ दौरा गाजवला. काहीही असो शेवटचा सिक्सरच म्हणायला पाहीजे. म्हणजे कस सगळा देश आत्ता काय आत्ता काय या चर्चेत गुंतलेला. २३ नंतर मोदी येणार का तिसरी आघाडी येणार. कॉंग्रेसच जमतय का आणि काय होतय याच चर्चा चालू आहेत. दिवसरात्र टिव्हीवर पण तेच. त्यात आपल्याकडच्या निवडणुका पार पडून महिन्याहून अधिक वेळ झाला. तरी निकाल लागायचं नाव घेत नाही म्हणून लोक बोअर झालेली.

नाही म्हणायला ममता बॅनर्जी आणि अमित शहा यांनी वातावरणात टाईमपास आणला पण एकदंरीत या वातावरणात मज्जा नव्हती. इलेक्शनमध्ये मज्जा आली नाही म्हणून सगळेच निवांत पडलेले पण जिथ कमी तीथ मोदी. नरेंद्र मोदी अशा वेळेला धावून आले. निवडणुक आयोगाचा विचार न करता ते केदारनाथला गेले. कारण काय तर देवदर्शन आणि झालेल्या विकासकामांचा रिव्ह्यू.

निवडणुक आयोगाने नेहमीप्रमाणे हात वर केले. मोदींनी केदारनाथ मध्ये रेड कार्पेट टाकूनच डाव हाणला. पहिल्या दोन दौऱ्यात मोदींनी काठी वापरली नव्हती. या दौऱ्यात मोदींनी काठी वापरली. ते स्वत: स्वत:च्या पायाने चालत गेले. सगळं कस भारी भारी.

अशाच एक फोटो आला आणि लोकं भरून पावली. मोदींना तिथे ध्यानधारणा केली. कितीतरी तास ते मौनात होते. डोळे मिटून शांतपणे विचार करत होते. बर हे सगळं झालं कुठं तर केदारनाथच्या तिथेच असणाऱ्या गुहेत.

मग लोकं म्हणाली अशी कुठं गुहा असते का? कपडे लावायचा हॅंगर, AC, भारीतला बेड आणि याला कोण गुहा म्हणतं का ?

सगळा मिडीया तूम्हाला अवघड गोष्टी सांगणार पण पण बोलभिडू नेहमी कामाच्या गोष्टी सांगत असतो. मोदी, राजकारण या गोष्टी चालत राहतील पण त्या गुहेच काय आपण कस तिथं जावू शकतोय. या सगळ्याची उत्तर खास तुमच्यासाठी आणली आहे.

तर मुद्दा क्रमांक एक या गुहा आहेत कुठं.

केदारनाथ मंदिरापासून दोन किलोमीटर लांब मंदाकिनी नदीच्या दूसऱ्या बाजूस या गुहा करण्यात आल्या आहेत. 

आत्ता गुहेतली फॅसेलिटी.

त्या गुहेमध्ये सिंगल बेड, लंच, डिनर, ब्रेकफास्ट आणिदिवसातून दोन वेळा चहा दिला जातो. हे सगळं धरून गुहेच भाडं आहे फक्त आणि फक्त 990 रुपये. अगोदर या गुहेचं भाडं साडेतीन हजार रुपये ठेवण्यात आलं होतं पण त्यानंतर मात्र गढवाल मंडल विकास निगमने याचं भाड 990 रुपये केलं.

काही महिन्यापुर्वी डोंगर पोखरून या गुहा तयार केल्या आहेत. म्हणजे मानवनिर्मित. पण लोकांच्या थंड प्रतिसादामुळे त्या बंद ठेवण्यात आल्याच सांगण्यात येत. आत्ता परत त्या सुरू केल्या आहेत. खुद्द नरेंद्र मोदी या गुहेत राहून गेल्यामुळे भविष्यात गुहांची भाडेवाढ होईल हे नाकारता येणार नाही हे पण खरय. 

आत्ता गंमत, या गुहांची निर्मीती केली आहे नेहरू पर्वतारोहण संस्थान यांनी. पहिल्या टप्यात तीन गुहा केल्या आहेत. त्यातही कस आहे तर तुम्ही जास्तित जास्त तीन दिवसांसाठी बुकिंग करू शकता. बुकिंग झालं की गुप्तकाशी आणि केदारनाथ मध्ये तुमचं मेडीकल होतं मगच इथे रहायची परवानगी मिळते.

बुकिंग कुठे करायचं ?

निगमची बेसाईट : gmvnl.in
फोन नंबर : 0135-2747898, 2746817
मेल आयडी : gmvn.gmvnl.in

 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.