पुतीन नहीं मरतें…!!! कोण म्हणतय पुतीन मेलेत, गेल्या 500 वर्षांपासून ते जिवंत आहेत..

कालपरवा एक बातमी आलेली. पुतीन आण्णा गेले म्हणून. मग आत्ता रशियाचा राष्ट्राध्यक्ष कोणय तर एक डुप्लिकेट व्यक्ती. पुतीन कधीच मेले असून सध्या पुतीन यांचा डुप्लिकेट पुतीन यांच्या जागेवर बसलेली बातमी व्हायरल झाली.

बर ही बातमी देणारे काय साधेसुधे नव्हते. ही बातमी ब्रेक केली ती ब्रिटनच्या मिरर संकेतस्थळाने. त्यानी द डेली स्टार चा रेफरन्स या बातमीला दिला. बर हा दावा देखील काही साध्यासुध्या व्यक्तीने केलेला नाही. ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा MI16 च्या प्रमुखांनी हा दावा केल्याचं सांगण्यात येतय.

पण खरच अस असेल का?

तर हे गुप्तचर यंत्रणेलाच माहिती. पण रशियाची कट्टर पुतीनभक्त मात्र पुतीन गेल्या ५०० वर्षांपासून जिवंत असल्याचा दावा करतात.

download 5

यासाठी फोटो दाखवले जातात. एक फोटो आहे तो आहे १९२० सालच्या रशियन सैनिकाचा. तेव्हाच्या सिव्हिल वॉर मध्ये सहभागी झालेला तो सैनिक डिक्टो पुतीन यांच्यासारखा दिसतो. हे तर सोडा १९४१ साली दुसऱ्या महायुद्धात रशिया जेव्हा हिटलर विरोधात उतरले, त्यांनी अतिशय चिवटपणे नाझी सेनेला मॉस्कोमधून परतून लावलं. हिटलरला हरवणाऱ्या रशियन सेनेमधील एका पायलटचा फोटो समोर आला.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा १९४१ सालचा पायलट देखील सेम पुतीन सारखा दिसतो.

यात कुठलं मॉर्फिंग नाही, फोटो शॉप नाही. पुतिनचे ते नातेवाईक आहेत तस देखील नाही. हे फोटो जेव्हा मार्केटमध्ये आले तेव्हा सगळ्या जगाच्या चक्कीत जाळ झाला. सगळ्यात जास्त अमेरिकेची फाटली. पुतीन हा १५४१ साली जन्मलेला ड्रॅक्युला आहे असं म्हटलं जाऊ लागलं.

WhatsApp Image 2021 03 27 at 2.36.29 PM

पुतीन खरचं माणसाचं रक्त पिणारा व्हॅम्पायर आहे का याबद्दल अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्स ब्रिटनच्या टेलिग्राफ पासून ते भारताच्या इंडिया टुडेपर्यंत अनेकांनी चर्चा केल्या. आता यात काही निष्पन्न झालं नसेल पण एवढे मोठे पेपर चर्चा करतात म्हणजे डाळ में काळा असेल असच जनतेला वाटतंय.

अधिकृतपणे बघितलं तर पुतीन साहेब जन्मले ७ ऑक्टोबर १९५२ साली. त्याचे आजोबा म्हणे लेनिनच्या घरात आचारी होते तर वडील दुसऱ्या महायुद्धात लढलेले सैनिक. व्लादिमिर जन्मण्यापूर्वी म्हणे त्याच्या आईआवडिलांच्या पोटच एकही पोर जगत नव्हतं. बऱ्याच नवसाने तो झाला असं म्हणतात. त्याला लहानपणापासून खेळायची आवड होती. वयाच्या बाराव्या वर्षी ज्युडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला.

origin

पुढे कॉलेजमध्ये असताना तो जर्मन भाषा शिकला. या सगळ्याचा उपयोग त्याला झाला केजीबी मध्ये जॉईन होण्यासाठी.

केजीबी म्हणजे रशियाचं गुप्तहेर खातं. आपलं रॉ, पाकिस्तानी आयएसआय, अमेरिकेचं सीआयए   वगैरे सोडा जगातल्या सगळ्यात खुंखार इंटेलिजन्स मध्ये या केजीबीला ओळखलं जातं. आणि त्यांचा सेलिब्रेटी जेम्स बॉण्ड होता पुतीन.

१९७५ साली तो केजीबी जॉईन केला तिथून पुढं त्याच ऑफिशियल रेकॉर्ड सापडत नाही. त्याचा इतिहास काय तर त्याची कौटूंबिक माहिती देखील कोणाला मिळत नाही.

असं म्हणतात की त्याची पहिली पोस्टिंग पूर्व जर्मनीमध्ये होती. त्याकाळी अमेरिकेच्या प्रभावाखालची पश्चिम जर्मनी आणि सोव्हिएतवाल्या प्रभावाची पूर्व जर्मनी असे दोन प्रकार होते. या दोन्हीत प्रचंड भांडणे होती आणि या दोन्ही देशातील भांडणाचा अमेरिकन विरुद्ध सोव्हिएत कोल्ड वॉर मध्ये रूपांतर केलं जायचं. पुतिनने या काळात अनेक इम्पॉसिबल मिशन पार पाडले ज्याचा कुठेही पुरावा नाही ना ते कधी बोललं जात. जर्मनीत एका साध्या टाईपरायटरची नोकरी करणारा हा माणूस एवढा धोकादायक असेल याची कोणालाच कल्पना नसेल.

१९९० साली तो राजकारणात आला आणि तिथून पुढचा इतिहास तर सगळ्यांना ठाऊकच आहे.

अत्यंत तरुण वयात रशिया सारख्या महाप्रचंड देशाची सत्ता हातात घेणे आणि तब्बल २० वर्षे ती आपल्या लोखंडी हातात पकडून ठेवणे हे कोणालाही शक्य नाही. ते पुतीन कस काय शक्य करून दाखवतोय याच गूढ अमेरिकेला आणि जगाला सतावत असते.

केजीबीच्या करियर पासून त्याच्या आयुष्यातील रहस्यमयी सिक्रेट, त्याला नेमक्या बायका किती, त्याची मुलबाळ किती आहेत, कुठे आहेत, त्याला विरोध करणारे नेते अचानक गायब कसे होतात, त्याच्या आदेशावरून रशियाचे जगभरात खुफिया चालले कार्यक्रम  याची उत्सुकता सगळ्यांना असते. पुतीन मात्र हे सगळं लपवून ठेवण्यात कायम यशस्वी ठरतोय. 

त्याच्या भोवती असलेलं हे गूढतेच वलय, त्याचा बर्फातल्या हाड गोठवणाऱ्या थंडीत देखील शर्ट काढून बॉडी दाखवत फिरण्याचा swagवाला फिटनेस, किती जरी मोठा देश समोर आला तरी त्याला भीक न घालण्याची स्टाईल, खास रशियन मुजोरपणा यामुळेच पुतीन जगातल्या सगळ्यात वांड नेत्यांमध्ये गणला जातोय. त्याच्या डोळ्यातील कोल्ड ब्ल्डेड लूक, कधीही झडप घालून संपवण्याचा संदेश देत असतो. व्हॅम्पायर असण्याच्या चर्चा सुरु होतात आणि आपल्याला त्यावर विश्वास देखील ठेवू वाटतो.

हे ही वाच भिडू.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.