राहूल बाबांनी मोदींना चितपट केलय…

 

गेल्या दोन दिवसांपुर्वीपासून मोदिंच्या डोळ्याला डोळा नाही. जरा झोपावं म्हणलं की अंगावरचा मोदी मोदी कोट टोचू लागतोय. स्वप्नात अचानक राहूलबाबा येवून हाहाहा करू लागतात अस आमच्या दिल्लीतल्या वार्ताहरानं सांगितल..

साबरमतीच्या नदित विमानानं उतरणारे मोदी अचानकच राहूल बाबांना का भिवू लागले याचं कोडं आमच्या टिमच्या देखील लक्षात येत नव्हतं म्हणूनच आम्ही दहा एकर इकाय लागलं तरी चालेल पण हे सत्य जनतेपुढं आणायचच या हेतूने रिसर्च करू लागलो. नुकतीचं मोदींचे ट्विटरवर ६० टक्के फॉलोअर्स खोटे असल्याचं ट्विटरनं ट्विट करून सांगितलं. नेमकं हेच टेन्शन मोदींना असणार म्हणून सुरवातीला आम्ही देखील या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं पण जस जस मोदी अंगाव काढू लागले तस आमच्या टिमच्या लक्षात आलं की कायतर गडबडाय..

म्हणूनच आम्ही मोदींच्या बिघडलेल्या गणिताचा हिशोब मांडायचं मनावर घेतलं. रिसर्च करताना आमचा एक मेंबर थेट मोदींच्या उशीखाली गेला. मोदी त्याला मित्रों म्हणून हाक मारू लागतील या भितीनेचं हाती लागतील तेवढी कागदपत्रे घेवून तो बाहेर पडला. त्याच्या हाती जे लागलं ते आमच्या देखील बत्यागुल करणाऱ्या होतं.

त्याचं कारण न भूतो न भविष्यती अशी एक गोष्ट घडली होती मोदीला पिछाडीवर टाकतं चक्क राहूल बाबानं एका गोष्टीत नंबर मारला होता. हिच कागदपत्र उशाला कवटाळून मोदी रात्रभर हसमूसून हसमूसून रडत होते.
नुकतच ट्विटरनं जारी केलेली खोट्या फॉलोवर्सची लिस्ट होती ती…

दोन दिवस उच्चांकी खोटे फॉलोवर्स मिळवून आपणच नंबर एक असल्यानं मोदी समाधानी होते. यातचं त्यांच्या हातात दूसरा कागद लागलां. यात राहूल बाबांना चक्क मोदींपैक्षा ८ टक्यांनी खोटे फॉलोअर्स जास्त होते. राहूल बाबा तर मोटाभाय पेक्षाही दोन टक्यानं पुढं गेलेलं. हे सगळ विपरित होतं…

गुजरात असो वा नागालंड मोदींच सर्वश्रेष्ठ असणाऱ्या राज्यात राहूल गांधीनी खोट्या फॉलोअर्सच्या संख्येत का होईना त्यांना चितपट केल्याचं दूखं मोदींना होणं साहजिक होतं…

Leave A Reply

Your email address will not be published.