अभिनेत्यांसाठी शोध लागलेल्या टेलिप्रॉम्प्टरचा खरा फायदा करून घेतला नेत्यांनीच

नेते हे सगळ्यात भारी अभिनेते असतात असं कुणीतरी लिहून ठेवलंय. तुमच्यापैकी अनेकांना  वाटतं असेल की नेत्यांच्या ऍक्टिंगची सर अभिनेत्यांना कुठं.

ऍक्टर लोकांचे सगळे गुण अधिक स्वतःचे वेगळे ‘गुण’ आणि बनतो मग परफेक्ट राजकारणी.

आता ते राहूदे आपल्या मुद्यावर येऊ. भारतीय राजकरणात उत्कृष्ट भाषणशैली असलेल्या नेत्यांची मोठी परंपरा आहे. जवाहरलाल नेहरू,अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं आजही आपण ऐकतो. पुढं एखादी टिपण असायचा किंवा कधी तेही नसायची आपल्या नुसत्या ओघवत्या वाणीनं हे नेते सभा गाजवून सोडायचे.

पण बाकीच्यांना हे जमलं नाही मग त्यांनी एकतर सरळ भाषणं वाचवून दाखवली किंवा टेलिप्रॉम्प्टरची ट्रिक वापरली.

आता टेलिप्रॉम्प्टर काय असतं हे साध्या भाषेत सांगायचं  एक स्क्रीन ज्यावर मजकूर रोल होत राहतो आणि भाषणकर्ता ते वाचून दाखवतो.

त्यातही ही भाषण ऐकणाऱ्यांना मी भाषण वाचून दाखवत नाहीये हे दाखवण्यासाठी वेगळे कौशल्य लागतात.

तर बघावं म्हटलं ह्या टेलिप्रॉम्प्टरचा शोध नक्की का आणि कोणी लावला.

तर टेलिप्रॉम्प्टरचा शोध लागला अभिनेत्यांसाठी. १९४९-५०चा काळ होता. नाटक, थेटर यांच्यातून डेली सिरिअल्सकडे अमेरिकेतील लोकांचा कल वाढत होता. मात्र हे स्थलांतर अभिनेत्त्यांसाठी सोप्पं नव्हतं. नाटकामध्ये एकदा स्क्रिप्ट पाठ केली का तीच मग रिपीट करायची असायची मात्र डेली सिरिअल्ससाठी रोज पाठांतर करणं शक्य नव्हतं. असाच त्रास करावा लागलेला अभिनेता फ्रेड बार्टन जूनियर मग हे तक्रार घेऊन 20th Century Fox फिल्म स्टुडिओमध्ये  गेले आणि आपलं गाऱ्हाणं मांडला.

मग स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या हुबर्ट श्लाफ्लाय जूनियर यांना कंपनीने एक उपकरण तयार करण्यास सांगितले होते जे कलाकारांना त्यांच्या ओळी लक्षात ठेवण्यास मदत करेल.

हुबर्ट श्लाफ्लाय जूनियर यांनी मग टेलीप्रॉम्प्टर विकसित केले, ज्याला ऑटोक्यू म्हणून देखील ओळखले जाते. मग हे टेलीप्रॉम्प्टर, जे यूएस सोप ऑपेराच्या सेटवर पहिल्यांदा वापरण्यात आले, ते एका फिल्म कॅमेर्‍याजवळ ठेवण्यात आले होते . शोच्या कलाकारांना मदत करण्यासाठी सूटकेसच्या आत कागदाचा रोल लावला होता जो एका मोटरने स्क्रोल केला जायचा.

जरी श्लाफ्लाय आणि कहाणने हे उपकरण 20th Century Fox ला दिले तरी कंपनीला त्यात रस नव्हता. 

त्यांनी लगेच कंपनी सोडली आणि TelePrompTer कॉर्पोरेशनची स्थापना करून स्वतःची कंपनी सुरू केली. त्यांची हे उपकरण सिनेजगतात जोरदार हिट झालं.याचदरम्यान १९५२ मध्ये अमेरिकन राष्ट्रपतीपदाची निवडणूक आली होती.

माजी अध्यक्ष हर्बर्ट हूवर यांना जनरल ड्वाइट डी. आयसिनहॉवर यांच्या प्रचारासाठी भाषणे वाचण्यात अडचण आल्याचे वाचल्यानंतर श्लाफ्लाय आणि कहाण यांनी रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनचे यजमान शहर शिकागो येथे प्रवास केला आणि हूवर आणि इतर वक्त्यांना हे मशीन वापरून पाहण्यासाठी राजी केले. हे तंत्रज्ञान नेत्यानं लगेच आवडलं आणि अधिवेशनादरम्यान आणि त्या महिन्याच्या उत्तरार्धात झालेल्या मेळाव्यादरम्यान, 58 प्रमुख भाषणांपैकी ४७ भाषणे टेलिप्रॉम्प्ट करण्यात आली.

झालं आता राजकारणी न कचरता टेलिप्रॉम्प्टरवरून तुफान फेकू शकत होते.

पुढे बदल होत टेलिप्रॉम्प्टरपण आधुनिक झालेत सुरवातीला मेकॅनिकल असणारे आता फुल्ली ऑटोमॅटिक इलेक्ट्रॉनिक टेलिप्रॉम्प्टर बाजारात उपलब्ध आहेत.

आता तर नुसती ट्रान्स्परन्ट स्क्रीनच्या स्वरूपात हि ते उपलब्ध आहेत. सध्या फेमस असलेला टेलिप्रॉम्प्टर म्हणजे ४५ डिग्रीत उभी केलेली  टेलिप्रॉम्प्टरची जोडी ज्यामुळं नेत्याला टेलिप्रॉम्प्टरकडे एकटक न बघता पूर्ण सभेकडे नजर फिरवत भाषण देता येतं.

बाकी तुम्ही कोणत्या नेत्याची टेलिप्रॉम्प्टरची ट्रिक ओळखली असेल तर खाली कंमेंट करून जरूर सांगा.

हे ही वाच भिडू:

Webtitle : Modi teleprompter : how teleprompter invented and became the  centerpiece of modern political campaigning

Leave A Reply

Your email address will not be published.