मोदींनी आपल्यावर होणाऱ्या टिकेला फाट्यावर मारत काशी धामचा इव्हेन्ट धमाक्यात साजरा केलाय
पंतप्रधान मोदी कुठेही असले, कुठल्याही देशाच्या दौऱ्यावर असो वा देशातल्या दौऱ्यावर असो… मोदींचा, त्यांची स्टाईल आणि त्यांचा अंदाज.. चर्चेचा विषय असतो. साहजिकच आहे त्यांचा वाराणसी दौरा देखील सर्वांच्याचं नजरेत आला आहे..काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन करण्यासाठी वाराणसीत पोहोचलेले पंतप्रधान मोदी काशीतील लोकांमध्ये पूर्णपणे वेगळ्याच रूपात दिसले….
तुम्ही इंटरनेट वर जाऊन त्यांच्या काशी दौऱ्याचे फोटो पाहिलेत तर लक्षात येईलच…हो इंटरनेट काय प्रत्येक सोशल मीडियावर पंतप्रधानांचा काशी दौऱ्याचा फोटो असणारच आहे… असायलाच हवा कारण त्यासाठी तेवढे कष्ट देखील घेतले गेलेय….”जिथे जातील तिथे कॅमेरा घेऊन जातात अशी टीका मोदींवर कायमच होत असते. पण याही पलीकडे जाऊन मोदींनी या टिकेला फाट्यावर मारत काशी दौऱ्यावर तर कॅमेरामन ची अख्खी फौजचं घेऊन गेले असावे असं वाटतं…
कारण त्यांचा दौरा खास करण्यासाठी नेहेमीप्रमाणेचं त्यांचे फोटो सेशन झाले. सगळ्यांची मनं जिंकणारा पहिला फोटो. म्हणजे पंतप्रधान मोदी विमानतळावर पोहोचले तिथे योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले आणि एकमेकांना शुभेच्छा देताना हे सुंदर छायाचित्र कॅमेऱ्यात कैद झाले.
पुढचा फोटो पीएम मोदी लोकांचे अभिवादन स्वीकारतानाचे फोटो, यानंतर कालभैरवाची पूजा करतानाचे फोटो, पूजा करून ते निघातानाचे फोटो, निघताना पुन्हा रस्त्यावरील लोकांना अभिवादन करतानाचे फोटो, त्यानंतर अभिवादन स्वीकारताना फोटो, पंतप्रधान मोदी खिडक्या घाटातून क्रॉस मार्गे ललिता घाटाकडे निघाले त्याचा फोटो, नंतर क्रूझवरचा फोटो होता. नेहेमीप्रमाणेच त्यांनी एक आकर्षक फोटो दिला तो म्हणजे, म्हणजे पंतप्रधान गंगेत स्नान, गंगेची पूजा करतानाचा फोटो, पूजेनंतर पंतप्रधान कॉरिडॉर बांधण्यासाठी मदत करणाऱ्या मजुरांमध्ये पोहोचले आणि या फोटोनेही लोकांची मने जिंकली.
तुम्ही म्हणाल काय बोर करताय, मोदींच्या फोटो मध्ये काय नवीन ? आता हा सगळा घटनाक्रम फोटोग्राफर्स ने पुरेपूर टिपला आहे. पंतप्रधान जिथे असतात तिथे त्यांच्या शैलीचा आणि त्यांच्या छायाचित्रांचा उल्लेख करणे अत्यावश्यक ठरते आणि पंतप्रधान जेव्हा वाराणसीच्या भूमीवर असतात तेव्हा ते वेगळ्याच शैलीत दिसतात….
आता एवढ्या सगळ्या फोटोचा मी उल्लेख केला आहे, त्यासाठी केलेली तयारी देखील तितकीच जंगी केली असणार ना? त्याच तयारीबाबत आपण बोलणार स्पष्ट आहे. हे सगळे फोटो काय २/३ फोटोग्राफरने काढलेले नाहीत तर त्यासाठी अख्खी फौजच तिथे होती.
हे सर्व कार्यक्रम कव्हर करण्यासाठी २०० हून जास्त दूरदर्शन (DD) कर्मचारी सदस्य, ज्यात विविध शहरांतील वार्ताहर, कॅमेरापर्सन, इंजिनिअर, तंत्रज्ञ आणि इतर काही कर्मचारी, एवढा सगळा लवाजमा मोदींचा हा कार्यक्रम कव्हर करण्यासाठी तैनात करण्यात आला होता.
काही सूत्रांनुसार, १३ डिसेंबर रोजी डीडी न्यूज आणि डीडी इंडियावरील कार्यक्रमांमध्ये सकाळी ११ ते दुपारी ३.३० आणि संध्याकाळी ५ ते ८.४५ या वेळेत पंतप्रधानांच्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण केले गेले होते.
याव्यतिरिक्त,१२ डिसेंबर रोजी देखील रात्री ८ ते रात्री १० या वेळेत गंगेच्या काठावर दोन तासांचा “न्यूज नाईट” विशेष बोटीवर गेला होता. तेंव्हा ३० मिनिटांचा विशेष कार्यक्रम देखील प्रसारित केला गेला होता. डीडी इंडियावर, “काशी: एक नवीन ओळख”. या कार्यक्रमांमध्ये काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्पाचे वास्तुविशारद आणि नियोजक डॉ. बिमल पटेल यांच्या मुलाखतीचाही समावेश होता. या ऐवजी वाराणसीतील स्थानिक ऑल इंडिया रेडिओ संघ नेटवर्कवर देखील हा कार्यक्रम कव्हर केला गेला होता.
प्रसार भारतीचे सीईओ शशी शेखर वेम्पती यांनी ट्विट केले की DD ने PM मोदींच्या सोमवारी काशी विश्वनाथ धाम भेटीच्या थेट कव्हरेजसाठी५५ कॅमेरे, सात सॅटेलाइट अपलिंक व्हॅन, जिमी जिब्स तसेच अत्याधुनिक ड्रोन आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी कॅमेऱ्यांसह मोठी तयारी केली होती. सूत्रांनी सांगितले होते की, या भव्य कव्हरेजसाठी वाराणसी येथे दोन अद्ययावत ड्रोन आणि आरएफ कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. तसेच, या कार्यक्रमाच्या कव्हरेजसाठी कितीतरी शहरांमधून बरेच संघ वाराणसीला वळवले गेले होते…याही बद्दल चर्चा चालूये.
मोदींचा ‘भव्य काशी, दिव्य काशी’ हा कार्यक्रम दाखवण्यासाठी, ५५ हाय-डेफिनिशन कॅमेरे, चार जिमी जिब्स आणि एक विशाल ड्रोनसह, दूरदर्शन (डीडी) मधील सुमारे १०० लोकांचा एक चमू,५५ कॅमेरामन, वरिष्ठ अधिकारी आणि इतर कर्मचारी या कार्यक्रमाच्या ठिकाणी तळ ठोकून होते.
५५ एचडी कॅमेरे, सात अपलिंक सॅटेलाइट व्हॅन, चार सेल्युलर मोबाईल न्यूज गॅदरिंग युनिट्स, एक आरएफ (रेडिओ फ्रिक्वेन्सी) कॅमेरा, चार जिमी जेबीएस आणि एक ड्रोन मिड-एअर, अशा स्वरूपाच्या घटनेचे हे एक मोठे कव्हरेज होते. या कार्यक्रमाचे आणि या पवित्र मंदिराच्या विस्तीर्ण परिसराचे दृश्य ड्रोन कॅमेराद्वारे दाखवले गेले.
हेच कार्यक्रम नव्हे तर या दही देखील मोदींच्या कार्यक्रमच असेच भव्य-दिव्य फोटोशूट झालेले आहे.
पीएम मोदींचे मागील कव्हरेज बघितले तर हे लक्षात येईल कि, पंतप्रधानांची हजेरी असलेल्या कार्यक्रमासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करण्याची ही पहिलीच वेळ नाही. जर तुम्ही पंतप्रधानांच्या अलीकडेच झालेल्या सर्व कार्यक्रमांना नीटपणे निरक्षण केल्यास, समजेल कि, सरकारी संस्था म्हणजेच डीडी मोदींच्या प्रत्येक कार्यक्रमाचे आणि दौऱ्याचे कव्हरेज करत असते.
याबाबत विरोधी पक्षांनी तक्रार देखील केली होती.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत, ब्रॉडकास्टरने PM मोदींचा ‘मैं भी चौकीदार’ कार्यक्रम सुमारे तासभर प्रसारित केला होता. तेंव्हा विरोधी पक्षांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे राष्ट्रीय प्रसारक DD चॅनल पक्षपाती असल्याची तक्रार केली होती. आणि असाही आरोप केला होता की ते सरकारी संस्था असलेली DD विशिष्ट पक्षालाच जास्त न्याय देते जे कि, योग्य नाही..
त्यानंतर, निवडणूक आयोगाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला निर्देश दिले होते की कोणत्याही पक्षाच्या बाजूनेच प्राधान्य देऊ नये, तसेच कव्हरेज केले तरी त्याचे एअरटाइम वाढवू नये. पण तेच डीडीच्या एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने माध्यमांना बोलताना सांगितले कि, पंतप्रधान आणि भारताचे राष्ट्रपती यांचा समावेश असलेले सर्व कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे असतात. त्यामुळे डीडी आणि आकाशवाणीमध्ये पुरेसा एअरटाइम मिळेल अशा अनुषंगाने हे कव्हरेज करावाच लागतो.
English Summary: Prime Minister Narendra Modi will inaugurate phase 1 of Shri Kashi Vishwanath Dham, constructed at a cost of around Rs 339 crores, in Varanasi, Uttar Pradesh on Monday. During his visit to Varanasi, he will visit Shri Kashi Vishwanath Temple and offer prayers. The temple has been decked ahead of its inauguration by the Prime Minister.
Web Title: Prime Minister Narendra Modi visit to Varanasi : Narendra Modi photoshoot event in Kashi Vishwanath temple corridor.