स्वतः जिंकून थांबला नाही या नॅशनल चॅम्पियननं महाराष्ट्रातलं आदिवासी गाव स्क्वॅश कॅपिटल केलंय…
कलोते-मोकाशी हे गाव मुंबई पासून ७० किलोमीटरवर आहे. या गावाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटन स्थळे आहेत. जिथं वर्षभर पर्यटक फिरायला येतात. या गावाची ओळख आता एवढ्या पुरती मर्यादित राहिली नाही.
हे गाव आता राज्याचे स्क्वॅश कॅपिटल झालंय.
यासाठी एक निवृत्त खेळाडू पुढे आला असून त्याने या गावात स्क्वॅश अकॅडमी सुरु केली आहे. ज्यामुळे हे गाव देशभरात ओळखले जातंय. देशाला स्क्वॅश खेळाडू देण्याचे काम ही अकॅडमी करत आहेत. राष्ट्रीय स्पर्धेत याअकॅडमीतील खेळाडू चमकू लागले आहेत.
त्यापूर्वी स्क्वॅश बद्दल पाहूया.
१९ व्या शतकात इंग्लंड मध्ये स्क्वॅशच्या शोध लागला. त्यामुळे कॉमनवेल्थ देशाचे सदस्य असणाऱ्या देशांमध्ये हा खेळ पोहचला. जसे की, औस्ट्रेलिया, कॅनडा, साऊथ आफ्रिका आणि भारता.
स्क्वॅश खेळाची सर्वाधिक चर्चा झाली ती २०१४ मध्ये. झाले असे की, भारताची स्क्वॅश टीम कॉमनवेल्थ आणि अशियन गेम्स मध्ये फायनलचा पोहचली होती. देशाचे नाव रोशन केलं. स्क्वॅशने देशाला दीपिका पल्लिकल, जोशना चिनप्पा आणि ऋत्विक भट्टाचार्य सारखे खेळाडू दिले आहेत.
ऋत्विक भट्टाचार्य आपल्या अनुभवाचा फायदा देशाला व्हावा, गावातील मुलं पुढे जावेत यासाठी प्रयत्न करत आहेत. आपले ज्ञान पुढच्या पिढीकडे देण्यासाठी ही कोलते गावात ही स्क्वॅश अकॅडमी सुरु केली आहे. स्क्वॅश खेळासाठी ऋत्विकला पुढची पिढी घडवायची आहे.
ऋत्विक भट्टाचार्य
ऋत्विक भट्टाचार्यचा जन्म व्हेनेझुएला इथं झाला. काही वर्षानंतर त्याच कुटुंबीय भारतात परत आले. वडिलांच्या नोकरीमुळे त्याला देशातील विविध शहरात राहावं लागत होत. त्याला लहानपणा पासून फुटबॉलची आवड होती. शाळेतच त्याला स्क्वॅश बद्दल माहिती मिळाली होती.
त्यानंतर पुढचे शिक्षणआणि स्क्वॅशचे प्रशिक्षण घेण्यासाठी ऋत्विक अमेरिकेला गेला. भारतात परत आल्यानंतर तो देशाकडून खेळू लागला होता. ऋत्विक १९९७ मध्ये राष्ट्रीय ज्युनियर चैंपियन बनला तर अवघ्या १९ व्या वर्षी त्याने राष्ट्रीय स्पर्धा जिंकली. २०००, २००० आणि २००३ च्या राष्ट्रीय स्पर्धेवर आपले नाव कोरले होते.
असा सगळा अनुभव ऋत्विकच्या पाठीशी होता.
२०१० पासून बॉम्बे जिमखाना, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि इतर क्लब मध्ये स्क्वॅशच प्रशिक्षण द्यायला सुरवात केली होती. मात्र या ठिकाणी ऋत्विकला हवी तेवढी जागा मिळत नव्हती. तसेच इथं वेळेचं बंधन सुद्धा होते. इथली जागा या खेळासाठी पुरेशी नसल्याचे ऋत्विकचे मत होते.
हा खेळ ग्रामीण भागात अजूनही पोहचला नाही. ग्रामीण भागातील तरुणात टॅलेंट भरपूर आहे मात्र त्यांच्याकडे पुरेशी लक्ष दिल्याने ते मागे पडल्याचे सांगत ऋत्विक ग्रामीण भागात अकॅडमी सुरु करण्याचा विचारात होता. याच काळात ऋत्विक पर्यटनासाठी रायगड तालुक्यातील कलोते गावात आला होता. तेव्हा त्याच्या लक्षात आले की, खेळासाठी इथले वातावरण खूप मस्त आहे. मात्र, ज्या काही गोष्टी इथं पर्यंत पोहचायला हव्या होत्या त्या पोहचल्या नव्हत्या.
आज पर्यंत आपण स्क्वॅश खूप खेळलो आहे. देशाला काही तरी परत द्यायला हवं असा विचार मनात आला. आपले हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी काम सुरु केला. काही दिवसानंतर कलोते गावात त्याने ४ एकर जागा विकत घेतली. तिथे मैदान करण्यात आले.
२०१७ मध्ये ऋत्विकने या जागेवर स्क्वॅश कोर्ट बांधले आणि मुलांना खेळाची ओळख करून दिली. त्याला स्क्वॅश टेंपल अँड रिअल ट्रेनिंग अकादमी (स्टार्ट) असे नाव देण्यात आले.
इथं वर्ल्ड क्लास फेसिलिटी आणि आंतरराष्ट्रीय कोचेस उपलब्ध करून देण्यात आले. २०१८ मध्ये स्मार्ट अकॅडमीचे १२ खेळाडू जयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेत भाग घेतला होता. इथं खेळावर फोकस करण्यासाठी एकदम शांततेचं वातावरण आहे. फिटनेवसवर अधिक जोर दिला जातो. गावातच एवढ्या साऱ्या सुविधा मिळाल्याने हे मुलं ७ ते ८ तास स्क्वॅश खेळत असतात.
स्टार्ट अकादमीचे ४२ प्लेयर नॅशनल स्पर्धेत खेळले आहेत. ४ मुलं वर्ल्ड टूर साठी गेले आहेत.
कोलते गावातील बिजली दरवदा या तरुण खेळाडूने गावात स्टार्ट अकादमी सुरु करण्यापूर्वी स्क्वॅशचे नाव पण कधी ऐकलं नव्हते, ज्या वेळी गावात ऋत्विक भट्टाचार्यने अकादमी सुरु केली. त्यावेळी त्याला या खेळाबद्दल माहिती मिळाली आणि उत्सुकता वाढली. तिने इथेच पहिल्यांदा स्क्वॅशचे रॅकेट हातात घेतले.
काही दिवसांच्या मेहनती नंतर बिजली एकदम तयार झाली. स्टार्ट अकादमीचे ४ खेळाडू वर्ल्ड टूरला गेले होते त्यातील बिजली एक होती.
ऋत्विक भट्टाचार्य फक्त भविष्यातील खेळाडू तयार करत नाही तर स्क्वॅश खेळ नेक्स्ट लेव्हल घेऊन जात आहेत. अकादमीतील सुमारे २०० खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. त्यापैकी १०० पेक्षा जास्त कलोते गावातील आहे. हे खेळाडू रात्रंदिवस प्रशिक्षण घेतात.
हे ही वाच भिडू
- कुठल्या खेळाडूशी नाय, तर गावसकरचं अख्ख्या कोलकात्याशी भांडण झालं होतं…
- गांगुलीचा वारसदार समजला जाणारा खेळाडू चॅपलच्या नादी लागला आणि संघातून बाहेर पडला..
- हरियाणा आणि ओडिसाने सिद्ध केलं कि, खेळाडूंना सुविधा दिल्यावर चांगली कामगिरी करतातचं….