मराठ्यांची जिथवर सत्ता पोहचली तिथं राज्यकारभार मोडी लिपीतच चालायचा

ब्राह्मी लिपीशी साधर्म्य सांगणारी आणि मराठी माणसाची नाळ द्रविड संस्कृतीशी जोडणारी आपली मोडी लिपी म्हणजे मराठी राजकारभारासाठी येथल्या स्थानिक लोकांनी शोधलेलं सगळ्यात जबरी इनोव्हेशन म्हणता येईल.

काळाच्या ओघात तीचे ऐतिहासिक महत्त्व कमी झाले असले तरी तिची गरज अजूनही आहेच.

महाराष्ट्र शासनाने नव्याने अभिलेख उतारे उपलब्ध करून देताना मूळ मोडी लिपीतील अनेक कागदपत्रे देवनागरीत पुन्हा बनवली आहेत. हल्ली तिचा उल्लेख कमी प्रमाणात होत असला तरी संशोधक आणि जुन्या कागदपत्रांच्या अभ्यासात ती तुफान लोकप्रिय आहे. सम्राट अशोक याच्या काळात वापरली जाणारी मौर्यी या ब्राह्मी लिपीशी साधर्म्य असणाऱ्या मोडीचा मराठ्यांनी स्वीकार केला आणि आपला सर्वच राज्यकारभार याच भाषेत केला. उत्तर भारतात मराठी प्रभाव वाढल्यानंतर ही लिपी तिकडची पसरली.

हिंदी, गुजराती, कोंकणी, तमिळ, तेलुगू या भाषा लिहिण्यासाठी सुद्धा ही लिपी वापरली गेली.

रामचंद्र या यादवकालीन राजाच्या काळात प्रधान असणारे हेमाद्री पंत या माणसाने ही लिपी शोधली असे मानले जाते. त्यांच्या नावे अशी अनेक इनोव्हेशन आहेत, उदाहरणार्थ मंदिर बांधण्याची हेमाडपंथी पद्धत. मात्र इतर काही स्रोतांचा विचार करता ह्या लिपीची नक्की सुरुवात झाली कशी हा वादाचा मुद्दा आहे.

काहींच्या मते ही लिपी हेमाद्री पंत यांनी ही लिपी श्रीलंकेतुन आणली आणि महाराष्ट्रात रुजवली.

पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे 1389 सालापर्यंत जाणारी मोडी कागदपत्रे उपलब्ध आहेत. तर काही तज्ज्ञांच्या मते मात्र शिवरायांच्या मंत्रिमंडळात चिटणीस म्हणून काम पाहणारे बाळाजी आवजी यांनी 1642-1680 या काळात या लिपीचा शोध लावला असा कयास आहे.

सतराव्या शतकाच्या सुरुवातीला मराठ्यांनी ही लिपी राजव्यवहारात वापरण्यास सुरुवात केली. ह्यानंतर मराठ्यांची सत्ता जिथपर्यंत पोचली तिथवर मोडी लिपी पोचत गेली.

तंजावरच्या मराठी आगारात अजूनही काही मोडी कागदपत्रे सापडतात.

प्रख्यात संशोधक प्राची देशपांडे यांनी मराठी भाषेतील लेखन व लिपी यासंबंधी आपल्या संशोधनात ह्या सर्वच गोष्टींवर मूलभूत प्रकाश टाकला आहे. मोडी भाषेमुळे लेखनात आलेली स्थिरता, बोरू न उचलता लिहिन्याने लिखानकामाचा वाढलेला वेग, त्याचबरोबर दिवानजीच्या कामाचे झालेले सुलभीकरण व वाढलेली पारदर्शकता ह्या सर्वांच्या अनुषंगाने त्यांनी मोलाचे विवेचन केले आहे.

मोडी लिपीची खासियत ही होती की एकदा टेकलेला बोरु ओळ संपेपर्यंत उचलण्याची आवश्यकता नव्हती त्यामुळे ओळच्या ओळ न थांबता एकाच दमात लिहिता येत असे.

पुढे छापखाना तयार झाल्यानंतर मुद्रणाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढला आणि आता लिहिण्यासाठी अतिवेगाची गरज नव्हती. जाडसर बोरू आता अस्तंगत होऊन छोट्या टाकाचे व धातूच्या लेखण्या व निब उपलब्ध झाल्या होत्या.

ह्यामुळे मोडी लिपीच्या मुख्य जबाबदाऱ्या अपोआप पार पाडल्या जाऊ लागल्या.

मग त्या काळी बाळबोध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवनागरी लिपीचा पुनर्विकास का झाला?

तर या ते कारण आहे ते म्हणजे या पाण्याचा शोध हाफ खाण्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये एखादी गोष्ट कागदावर छापण्यासाठी तिच्या अक्षरांचे सुटेसुटे बनवावे लागत असत व ते क्रम बदलून आळीपाळीने एकमेकांचा नंतर वापरता यायला हवेत अशाप्रकारे त्या लिपीची रचना हवी असे इंग्रजीमध्ये प्रत्येक अक्षर सुटे असते त्यामुळे त्या भाषेत ही अडचण येणार नव्हती. पण जर करसिव्ह इंग्रजी छापायची म्हटली तर ती मात्र अवघड गोष्ट झाली असती

मोडी लिपी ही मराठी भाषेची तसेच वळणदार करसिव्ह लिपी आहे.

ती छापणे व त्याचे छोटे छोटे काप बनवून ते मुद्रणासाठी वापरणे अशक्यप्राय काम होते यामुळे हळूहळू मोडी लिपीचा वापर कमी होऊन देवनागरी बाळबोध लिपीचा वापर वाढला.

याशिवाय दुसरे कारण होते की इंग्रजांना मोडी लिपी समजत नसे व इंग्रजांच्या हाती कारभार आल्यानंतर स्थानिक लोकांचा मोडी भाषेतून नेमका कोणता व्यवहार चालतो हे त्यांना कळत नव्हते.

त्यामुळे त्यांनी ही मोडी लिपी वापरण्यावर सक्ती घालून हळूहळू देवनागरी लिपी वापरण्यासाठी आपल्या सेवेतील कारकुनांना प्रवृत्त केले व अशाप्रकारे मोडीचा राजाश्रय संपुष्टात आला आणि बाळबोध लिपी जनसामान्यांमध्ये रूढ झाली.

1917 साली मुंबईच्या प्रांतीय सरकारने आपल्या संपूर्ण प्रांतात एकसंध भाषा व लिपी ठेवण्यासाठी मोडी लिपीचा वापर पूर्णपणे बंद केला.

तरीही मोडी लिपी काही प्रमाणामध्ये टिकून होती कारण अद्यापही शाळांमधून लहान मुलांना देण्यासाठी व शिकवण्यासाठी हीच लिपी वापरली जात असे मात्र 1959 झाली सरकारने आदेश आणून शाळांमधून मोडीलिपी शिकवणे कायमचे बंद केले व त्यानंतर ही लिपी लिहिणारी माणसे सापडणे दुर्मिळ होत गेले.

लेजा काळात मात्र मोडी लिपीचे अभ्यासक मुलीचे प्रशिक्षण वर्ग चालवून लोकांना ही लिपी वाचण्यासाठी चे शिक्षण देत आहेत तसेच नुकतेच मोडी लिपीचे वर्ग युट्युबवर देखील उपलब्ध करण्यात आले आहेत. जिज्ञासूंनी नक्कीच त्याचा लाभ घ्यावा.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.