अलीने रागाच्या भरात देशासाठी जिंकलेलं ऑलिंपिक मेडल नदीत फेकून दिलं होतं.

गोष्ट आहे एकोणिसशे पन्नास साठच्या दशकातली. आता सारखी तेव्हा देखील वंशवादाविरोधातली आंदोलने अमेरिकेत पेटली होती. अगदी छोटे छोटे मूलभूत अधिकार मिळवण्यासाठी सुद्धा कृष्णवर्णीयांना लढा द्यावा लागत होता.

तेव्हा मोहम्मद अली हा कॅशीयस क्ले होता.

एका गरीब कृष्णवर्णीय घरात जन्मलेला हा मुलगा

त्याची सायकल चोरीला गेल्याचं निम्मित झालं आणि एका पोलीस ऑफिसरच्या नजरेस पडला. त्याच्यात असलेली रानटी ताकद त्या पोलिसाला जाणवली. हा पोलीस एक बॉक्सिंग कोच होता.

त्याने कॅशीयस क्लेला बॉक्सर बनवलं.

त्याच्या मुठीमध्ये एनर्जी ठासून भरलेली होती. डोळ्यात आग होती, बॉक्सिंगच जन्मजात स्किल होत, मेहनत करायची तयारी होती,

सगळ्यात महत्वाच म्हणजे जिंकण्याची अफाट जिद्द होती

क्ले ला अगदी लहानपणापासून कधी हरणे माहीत नव्हतं. आपल्या पेक्षा दुप्पट उंचीच्या मुलांना तो सहज आडवं करत होता.

अमेरिकेतील ज्युनिअर मुलांच्या सगळ्या स्पर्धा त्याने जिंकल्या होत्या. लवकरच त्याची रवानगी सिनियर गटात करण्यात आली. तिथेही त्याला कोणी विशेष आव्हान देऊ शकल नाही.

अवघ्या १६-१७वर्षाच्या वयात त्याने ६ केंटूकी राज्यातील स्पर्धा, २ नॅशनल लेव्हलच्या स्पर्धा सुद्धा जिंकल्या. तो अमेरिकेचा अमॅच्युअर बॉक्सिंगचा चॅम्पियन बनला. तोवर त्याने १०० बॉक्सिंग फाईट जिंकले होते.

क्लेची निवड १९६० साली रोममध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी झाली.

लाईट हेविवेट गटात खेळणाऱ्या अलीला जागतिक लेव्हलला देखील कोणी चॅलेंज करू शकलं नाही. रशिया, युरोपच्या बॉक्सर पुढे अगदी छोटा दिसणाऱ्या अलीने त्यांना बॉक्सिंग रिंग मध्ये अक्षरशः रडवलं.

हा बॉक्सर नाही तर एक चमत्कार आहे असं अनेकांचं म्हणणं होतं.

ऑलिम्पिकची फायनल मॅचसुद्धा अलीने सहज जिंकली.

त्याच रिंग मध्ये पोडीयम उभा करून त्याच्या गोल्ड मेडल घालण्यात आलं. त्यांचं राष्ट्रीय गीत वाजत होतं, मागे अमेरिकेचा झेंडा फडकत होता.

IMG 20200616 214821

कॅशीयस क्लेचं उर राष्ट्राभिमानाने भरून आलं.

आपण देशासाठी सुवर्णपदक जिंकलंय. आता आपण आपल्या देशबांधवांसाठी हिरो झालो.

तसं त्याच अमेरिकेत आल्यावर जंगी स्वागत झालं. जाईल तिथे त्याचा सन्मान केला जात होता. कॅशीयस क्लेला ते कौतुक आवडत देखील होतं.

तो त्याच्या गावी आला त्या दिवशी जिथे जाईल तिथे हवा करण्यासाठी गळ्यात ऑलिम्पिक गोल्ड मेडल अडकवून फिरु लागला. या मेडल वरून लोक त्याला ओळखायचे. त्याच अभिनंदन करायचे.

IMG 20200616 214948

असच फिरत फिरत तो एका हॉटेल मध्ये आला. त्याला भूक लागली होती. त्याने त्या हॉटेलमध्ये ऑर्डर दिली.

पण गंमत म्हणजे त्या रेस्टॉरंटच्या मालकाने त्याला सरळ नकार दिला. कारण होत की ते हॉटेल फक्त गोऱ्या लोकांसाठीच होतं.

क्लेला हा स्वतःचा खूप मोठा अपमान आहे हे जाणवलं. देशाला सर्वोच्च मेडल मिळवून देणाऱ्या बॉक्सरला त्याच्या रंगामुळे त्या हॉटेलमधून हाकलून देण्यात आलं.

क्लेची त्या हॉटेल मालकाबरोबर वादावादी झाली. तिथल्या काही गुंडाबरोबर मारामारी देखील झाली. कसबस हे प्रकरण मिटलं.

संतापाच्या भरात तो ओहयो नदीच्या पुलावर आला. जे मेडल आपल्याला समाजातील इतर व्यक्तींच्या बरोबरीचे स्थान मिळवून देऊन शकत नाही त्याचा काय उपयोग अस म्हणत त्याने ते

सुवर्णपदक वाहत्या नदीत फेकून दिलं.

हजारो ठोसे खाऊन त्याने हे मेडल जिंकल होत मात्र आज झालेला अपमान त्या हजारो ठोस्यांहून कितीतरी अधिक होता.

ही घटना त्याला वर्णभेदाच्या विरोधातील एक मोठा कार्यकर्ता बनवली. तो आपल्या हक्कांच्या बाबतीत सजग झाला. त्यासाठी भांडू लागला. पण या घटनेन त्याच्या मनावर खूप परिणाम केला होता.

त्याच्यात तो राग एवढा भिनला होता की

त्याने थेट मुस्लिम धर्म स्वीकारला व तो मोहम्मद अली बनला.

पुढे त्याने प्रोफेशनल बॉक्सिंग खेळण्यास सुरू केलं. जगातला हेविवेट चॅम्पियन बनला. आजवरचा ग्रेटेस्ट बॉक्सर म्हणून त्याला ओळखतात.

पण अनेकदा त्याचे मित्र ती नदीत गोल्ड मेडल फेकल्याची घटना खोटी असल्याची सांगतात. त्यांच्या मते भांडणात अलीने ते मेडल हरवलं होत.

ते काही असलं तरी शेवटी ऑलिम्पिक कमिटीनेही या घटनेचा निषेध म्हणून त्याला सन्मानाने दुसरं मेडल दिलं.

IMG 20200616 214857

अलीने १९९६ साली अटलांटा ऑलिम्पिकची मशाल थरथरत्या हाताने पेटवली. एक वर्तुळ पूर्ण झालं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.