मोहन सिंह यांच्या आत्महत्येचे कारण डिप्रेशन आहे कि अन्य काही ?

काळ आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये अबुधाबी येथील ग्राउंडवर न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात मॅच झाली. ही मॅच भारतासाठी फार महत्त्वाची होती. 

भारत वर्ल्डकपमध्ये आगेकूच करणार कि नाही हे या मॅचच्या निकालावरून ठरणार होते. या लढतीत अफगाणिस्ताचा पराभव झाला आणि टीम इंडियाचे आव्हान संपुष्टात आले. म्हणजे हे ठरलंय कि भारत आता सेमीफायनल खेळणार ! 

पण ….. 

या सामन्याआधी एक धक्कादायक बातमी क्रिकेट टीमला मिळाली होती. ती  म्हणजे सामन्याच्या काही तास आधी अबू धाबी क्रिकेट स्टेडियमचे मुख्य पिच क्युरेटर मोहन सिंग त्यांच्या खोलीत मृतावस्थेत आढळले. मृत्यूचे कारण अजून कळू शकले नाही, मात्र स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे. असा प्राथमिक अंदाज काढला जातोय कि, मृत्यूचे कारण आत्महत्या असू शकते.

यूएई क्रिकेटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळचे उत्तराखंडचे ४५ वर्षीय मोहन सिंग हे काही काळापासून डिप्रेशनमध्ये होते. न्यूझीलंड-अफगाणिस्तान सामन्यापूर्वी त्यांनी खेळपट्टीची पाहणी केली. नंतर ते त्यांच्या खोलीत गेले. आणि काळानंतर ते खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.

अबूधाबी क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने त्यांना श्रद्धांजली वाहिली, परंतु मृत्यूच्या कारणाबद्दल काही भाष्य केलं नाही.  “मोहन यांना श्रद्धांजली वाहण्यात येत असून, त्यांच्या अतुलनीय कामगिरीचा आगामी काळात सन्मान केला जाईल,” असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने निवेदनात म्हटले आहे. 

आम्ही मोहनच्या कुटुंबासोबत आहेत. या दु:खाच्या वेळी मीडियाला त्यांच्या गोपनीयतेचा आदर करावा असे आवाहन आम्ही करतो असंही परिषदेने म्हणलंय. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे जी लवकरच अबुधाबीला पोहोचणार आहेत.

विश्वचषक स्पर्धेशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, मोहन सिंग हे गेल्या ४ महिन्यांपासून खूप डिप्रेशनमध्ये होते. याचे कारण माहीत नाही. मोहन कोणत्याही डॉक्टरांच्या संपर्कात होते की नाही हे आम्हाला माहीत नाही. सामन्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला की नाही हे पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतरच समजू शकेल, असंही त्यांनी सांगितलं.

मोहन सिंह २००४ मध्ये अबुधाबीला आले होते. यापूर्वी त्यांनी मोहालीमध्ये ग्राउंड पर्यवेक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. यूएईला जाण्यापूर्वी त्याने बीसीसीआयकडून पिच क्युरेटरचे प्रशिक्षण घेतलं होतं. 

२००० च्या सुरुवातीला यूएईला जाण्यापूर्वी मोहनने मोहालीमध्ये बीसीसीआयचे माजी मुख्य क्युरेटर दलजित सिंग यांच्या देखरेखीखाली काम केले. जवळपास २२ वर्षे भारतीय क्रिकेटची सेवा करणाऱ्या दलजीत सिंग मोहन यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला आहे.

मोहन सिंग यांच्यासाठी हे वर्ष खूप व्यस्त गेलं होतं. पीएसएल, आयपीएल आणि विश्वचषकात ते व्यवस्थापनात सततपणे गुंतलेले होते. यादरम्यान त्यांनी बनवलेल्या खेळपट्ट्यांवर अनेक धावाही झाल्यात. 

बीसीसीआयचे माजी मुख्य क्युरेटर दलजीत सिंग यांनी भावना व्यक्त केल्या, “ही खूप धक्कादायक बातमी होती. मी त्यांना चांगले ओळखत होतो. मोहन हे खूप मेहनती, तापट आणि महत्त्वाकांक्षी व्यक्ती होते.  ते सतत माझ्या संपर्कात असायचे आणि मी त्यांच्या संपर्कात होतो. यूएईमध्ये येण्यापूर्वी मोहनने माझ्यासोबत १० वर्षांहून अधिक काळ काम केले आहे. UAE ला गेल्यानंतर तो जेव्हाही भारतात  यायचा तेव्हा तो मला भेटायचा, पण गेल्या काही दिवसांपासून आमची भेट होत नव्हती. तो खूप लवकर निघून गेला. हे खरोखरच दुःखदायक आहे.” अशा आठवणी देखील दलजीत सिंग यांनी सांगितल्या. 

शेख जायद स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या संघातील मॅच झाल्या आहेत. या मॅचसाठीच्या खेळपट्टी मोहन सिंग यांनी तयार केली होती.

शेख जायद स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या संघातील मॅच झाल्या आहेत. या मॅचसाठीची खेळपट्टी मोहन सिंग यांनी तयार केली होती.

क्रिकेट विश्वात याआधी देखील अशीच एक घटना घडली होती. २००७ मध्ये वर्ल्डकप मॅच सुरू असतांनाच्या च काळात पाकिस्तान क्रिकेट संघाचे कोच बॉब वूल्मर यांचा मृत्यू झाला होता. हॉटेल रूममध्ये ते मृत अवस्थेत आढळले होते. या घटनेच्या एक दिवस आधी आयरर्लंड संघाने पाकिस्तानचा पराभव केला होता. मात्र बॉब वूल्मर यांच्या मृत्युचं कारण मात्र समजू शकलं नव्हतं. आणि आत्ता देखील मोहन सिंग यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही परंतु लवकरच या तपासाचा निकाल यायला हवा अशी आशा आहे.

 हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.