२५ रुपयांपासून सुरवात करत अरबो रुपयांचा ओबेरॉय हॉटेल ग्रुप उभारला….

भारतात ओबेरॉय हॉटेल ग्रुपचं मार्केट काय आहे याच्या चर्चा जगभर चालतात. ओबेरॉय हॉटेल हे भारतातील दुसऱ्या नंबरच सगळ्यात मोठं हॉटेल आणि रिसॉर्ट आहे. या ग्रुपचे भारताबरोबरच इस्त्रायल, इंडोनेशिया, संयुक्त अरब अमिरात, मॉरिशियस आणि सौदी अरेबिया मध्ये ३१ हॉटेल आणि रिसॉर्ट आहेत. आज ९ हजार ९९१ करोड रुपयाची उलाढाल करणाऱ्या ओबेरॉय ग्रुपची सुरवातच मुळात फक्त २५ रुपयांपासून झाली होती. ओबेरॉय ग्रुपचे संस्थापक होते मोहनसिंह ओबेरॉय होते.

मोहनसिंह ओबेरॉय यांचा जन्म १८९८ मध्ये झेलम जिल्ह्यातल्या भाऊन गावात झाला. त्यांचे वडील ठेकेदार होते. ज्यावेळी मोहनसिंह हे फक्त ६ महिन्याचे होते तेव्हाच त्यांच्या वडिलांचं अचानक निधन झालं. त्यावेळी महिला या तितक्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हत्या त्यामुळे मोहनसिंह यांच्या वडिलांचं निधन झाल्यावर सगळी घरादाराची जबाबदारी मोहनसिंह यांच्या आईवर येऊन पडली. गावात प्राथमिक शिक्षण घेऊन मोहनसिंह हे रावळपिंडीला उच्चशिक्षणासाठी गेले. 

रावळपिंडीत सरकारी कॉलेजात ऍडमिशन घेतल्यावर पार्टटाइम जॉब म्हणून त्यांनी काम शोधायला सुरवात केली, कारण आपल्या शिक्षणाचा खर्च त्यांना स्वतःलाच उचलायचा होता. नोकरी शोधत असतानाच त्यांचं शिक्षण पूर्ण झालं पण नोकरी काय मिळाली नाही. एका मित्राच्या सल्ल्यावरून त्यांनी अमृतसरला टायपिंग आणि स्टेनोग्राफीचा कोर्स सुरु केला. पण लवकरच त्यांना कळलं कि टायपिंगचा कोर्स करून आपल्याला नोकरी मिळणार नाही आणि आपले पैसेही खर्च होत राहणार.

शेवटी जेवणाचे सुद्धा शहरात वांदे झाले म्हणून मोहनसिंह पुन्हा गावी आले आणि घरची परिस्थिती बघून ते काकांसोबत बुटांच्या कारखान्यात जाऊ लागले. हे काम मोहनसिंह यांच्या मनाजोगं नव्हतं पण पैसे मिळत होते म्हणून ते हे काम करत होते. पण अचानक पुन्हा एकदा संकट आलं आणि ती बुटांची फॅक्ट्री बंद झाली. मोहनसिंह पुन्हा एकदा निराश झाले. 

१९२० साली जेव्हा मोहनसिंह घरी आले तेव्हा त्यांच्या कुटुंबाने लग्नाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. २०-२१ वर्षाच्या वयातच मोहनसिंह यांचं लग्न एका कोलकात्याच्या मुलीसोबत झालं. लग्न झाल्यावर सासुरवाडीतच बरेच दिवस ते राहिले पण प्लेगची साथ आली आणि ते गावी आले पण गावात प्लेगची साथ आधीच आलेली होती तेव्हा त्यांच्या आईने त्यांना प्लेगच्या भीतीने गावात येऊ दिलं नाही.

मोहनसिंह यांनी आईची गोष्ट समजून घेतली आणि गावातून निघून जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या आईने त्यांच्या हातावर २५ रूपये ठेवले होते. त्यावेळी मोहनसिंह यांना याबद्दल जराही शक्यता नव्हती कि ते २५ रुपये पुढे अरबो रुपयांचा पाया घालणार आहे. १९२२ साली ते २५ रुपय घेऊन मोहनसिंह शीमल्याला गेले. द सेसिल हॉटेलमध्ये ५० रुपये महिन्याने त्यांनी क्लर्कची नोकरी केली.

मोहनसिंह यांची इमानदारी आणि डेडिकेशन बघून तिथल्या मालकाने त्यांना कार्लटन हॉटेलच्या मॅनेजमेंटची जबाबदारी दिली. हॉटेलच्या मालकाच्या अनुपस्थितीत मोहनसिंह यांनी हॉटेलची प्रगती केली आणि तब्बल ८० % त्यांनी हॉटेलचा उत्कर्ष केला.

पाच वर्षाच्या मेहनतीच्या जोरावर मोहनसिंह ओबेरॉय यांना शिमल्यातल्या कार्लटन हॉटेलचा मालक बनवण्यात आलं. पुढे या हॉटेलचं नाव अगोदरच्या मालकाच्या नावावरून कार्ल हॉटेल करण्यात आलं.

हे हॉटेल खरेदी केल्यावर मोहनसिंह यांनी मागे वळून बघितलं नाही. १९४७ साली ओबेरॉय पाम बीच हॉटेलसोबतच त्यांनी मर्करी ट्रॅव्हल्स एजेन्सी सुरु केली. १९४९ मध्ये द ईस्ट इंडिया हॉटेल लिमिटेड कंपनीची सुरवात केली. यानंतर मोहनसिंह यांनी १८ करोड रुपयांची गुंतवणूक करत मुंबईत ओबेरॉय हॉटेल सुरु केलं. पुढच्या काही दशकातच हॉटेल व्यवसायात मोहनसिंह टॉपचे उद्योगपती बनले.

मोहनसिंह ओबेरॉय हे १९६८-७१ या काळात पार्लमेंट सदस्य सुद्धा होते. २००० साली त्यांना पदमभूषण पुरस्कार देण्यात आला होता. इतकी सारी संकटं आणि त्यावर उपाय शोधत शोधत भारतातले नामवंत उद्योगपती ते झाले. २००२ साली मोहनसिंह ओबेरॉय यांचं निधन झालं. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.