घराणेशाहीच्या नादी न लागता मोनालीने बॉलिवूडवर आपली पकड मजबूत करून ठेवलीय….

गाणी वैगरे ऐकण्याचा शौक अलीकडच्या काळात जास्तच वाढत चाललाय. म्हणजे ट्रॅक्टरवर एकेकाळी उदित नारायण, कुमार सानू, अभिजित, अलका यादनिक या मंडळींशीवाय दुसरी गाणीच वाजत नसायची. नंतर काळ जसा जसा पुढे सरकत गेला नव्या दमाचे नवे गायक गायिका येत गेल्या.

म्हणजे आता जर एखादी सोशल मीडियाची गाण्याची साईट किंवा ऍप उघडली तर यापैकी काही गाणी ट्रेंड करत असतात ती गाणी म्हणजे ये मोह मोह के धागे , सवार लुं. ही गाणी अजूनही ट्रेंड करण्यामागचं कारण आणि आवाज म्हणजे मोनाली ठाकूर. पण आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर आपलं स्थान अबाधित ठेवणाऱ्या मोनाली ठाकुरचा संगीताचा प्रवास सुद्धा खडतर होता.

मोनाली ठाकुरचा जन्मचं हा संगीतकार कुटुंबात झाला. संगीताचे धडे लहानपणीच कानावर पडत गेले आणि आवाजावर संस्कारही घडत गेले. तिचे वडील शक्ती ठाकूर आणि बहीण मेहुली ठाकूर हे संगीत जगतातले प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहेत. बंगाली म्युझिक इंडस्ट्रीत त्यांना दिग्गज म्हणून ओळखलं जातं. आता घरात असं वातावरण असल्यावर मोनालीने लहानपणीचं शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला सुरवात केली. सतत शिक्षण सुरूच असल्याने आवाजाला एक धार चढत गेली. आता आवाज गोड होताच पण त्याला लोकांपर्यंत पोहचवणे सुद्धा गरजेचे होते.

इंडियन आयडॉलचा एक सिझन तेव्हा नुकताच संपला होता. तेव्हा मोनालीने आपला ऑनस्क्रीन डेब्यु इंडियन आयडॉलच्या दुसऱ्या सीझनमध्ये केला. आता वडिलांची इतकी ओळख असताना मोनाली ठाकुरला सहज काम मिळालं असतं पण तिने स्वतःच्या दमावर काम मिळवायला सुरवात केली. बॉलिवूडमध्ये तिला बराच स्ट्रगल करावा लागला.

शेवटी अनेक महत्प्रयासाने 2008 साली रेस सिनेमात तिला 2 गाणी गायला मिळाली आणि ती गाणी होती जरा जरा टच मी टच मी आणि खाँब देखे. ही दोन गाणी तिला अधिकृतरित्या बॉलिवूडमध्ये ब्रेक देऊन गेली. ही दोन्ही गाणी प्रचंड गाजली आणि मग मात्र मोनाली ठाकूर प्रसिद्ध होत गेली.

मोनाली ठाकुरची टॉप गाणी जी सोशल मीडियावर कायम ट्रेंड करत असतात आणि तरुणाईच्या मोबाईलमध्ये सेवच्या कप्प्यात असतात.

 सवार लुं – लुटेरा या सिनेमातलं गाणं लोकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं होतं. या गाण्यात 70-80 च्या दशकातल्या व्हाईब्ज होत्या. या गाण्यासाठी मोनाली ठाकुरला फिल्म फेअर अवॉर्ड मिळाला होता.

 

 मोह मोह के धागे – दम लगा के हैश्या या सिनेमातलं हे गाणं आजही तरुणाईच्या ओठांवर असतं. या गाण्यासाठी तिला नॅशनल अवॉर्ड मिळाला होता.

छम छम छम,

अग बाई, बद्री की दुल्हनिया अशी बरीच हिट गाणी मोनाली ठाकुरने बॉलीवूडला आपल्या आवाजाच्या रूपाने दिली आहेत.

ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.