पैसा, क्रिकेट, धार्मिक संघटना : गोष्ट कोस्टल कर्नाटकात चालू असणाऱ्या हिंदू -मुस्लिम संघर्षाची

याआधी केरळमध्ये पाहण्यास मिळलेल्या रक्तरंजित संघर्ष आता कर्नाटकात येऊन पोहचला आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते प्रवीण नेत्तारू यांची दक्षिण कन्नडा जिल्ह्यात हत्या करण्यात आली होती. दक्षिण कन्नड जिल्हा हा अधिकच धार्मिक संघर्षांच्या बाबतीत संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो.

यावरून राज्यात वातावरण तापलेला असतानाच आता दुसऱ्या मर्डरची बातमी आली आहे. त्यानंतर आता अजून एक प्रकरण बाहेर आलं आहे ते म्हणजे मेंगलोरमध्येच फाझील या २३ वर्षीय मुस्लिम तरुणाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळं दक्षिण कन्नडमध्ये वातावरण अजूनच टेन्स झालं आहे.

याआधी अशा हत्यांच्या बातम्या केरळमध्ये होत असल्याच्या ऐकायला मिळत होत्या. 

कर्नाटकातील जे जिल्हे किनारी भागात आहे आणि केरळ बॉर्डरला लागून आहेत त्या जिल्ह्यात आता या हत्यांचे लोण पसरल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र कर्नाटकचा किनारी भाग ज्यामध्ये प्रामुख्याने कोडागु, दक्षिण कन्नडा, उडुपी, उत्तर कन्नडा या जिल्ह्यांचा समावेश होतो या भागात हिंदू मुस्लिम संघर्षाचं लोण मागच्या काही वर्षांपासूनच असल्याचं दिसतं.

१९९२ ला बाबरी मस्जिद पडल्यानंतर जशी जसं देशभरातील सामाजिक एकतेचं वातावरण गढूळ झालं त्याला कर्नाटकचा हा भाग देखील अपवाद नव्हता.

या प्रदेशातील  पहिला मोठा दंगा १९९२ बाबरी मस्जिद पडल्यानंतर झाला होता त्यामध्ये  दक्षिण कन्नडा जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर १९९३ ला भटकलमध्ये जवळपास ९ महिने चाललेल्या हिंदू मुस्लिम संघर्षात १६ हिंदू -मुयस्लिमांचा मृत्यू झाला होता. त्यांनतर सुरथकाल दंगल, मेंगलोर दंगल आणि २०१७ मध्ये झालेली उत्तर कन्नडा जिल्ह्यातील दंगल यामुळे वातवरण अजूनच बिघडत गेले.

याचं उदाहरणच घ्यायचं झाल्यास गावागावातील क्रिकेट टीमच्या नावरून घेता येइल. 

११९२ पूर्वी फ्रेंड्स, फ्रेंड्स ऑफ क्रिकेट, फाईव्ह स्टार  क्रिकेट टीमची नावं असंत ज्यामध्ये हिंदू आणि मुस्लीम अशी दोन्हीकडील पोरं एकत्र खेळत मात्र बाबरी नंतर हे बदललं. टीमची नावं आता ‘अडवाणी’, ‘सद्दाम’, ‘ओम शक्ती’ आणि ‘ग्रीन स्टार’ अशी झाली होती आणि टीमही धर्मावरून वेगळ्या झाल्या होत्या हे वेगळं सांगायला नको.

मात्र या सगळ्या तर वरवरच्या गोष्टी झाल्या.

या भागातील जातीय समीकरणं बदलायला सुरवात आधीच सुरवात झाली होती.  1980 आणि 1990 च्या दशकात, अयोध्येतील राम मंदिरासाठी वीट संकलन मोहीम आणि रथयात्रा (रथ यात्रा) यांसारख्या घटनांनी कर्नाटकात जातीय तणाव वाढला होता.

याच सुमारास किनारी भागात आरएसएसने त्यांची गौड सारस्वत ब्राह्मणांसाठी संघटना अशी असलेली आपली प्रतिमा जाणीवपूर्वक बदलण्यास सुरुवात केली. त्याऐवजी बिल्लावा, मोगवीरा आणि एडिगा यांसारख्या उपेक्षित तुळू भाषिक समुदायातील तरुणांना सक्रियपणे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरवात केली.   

त्याचबरोबर विश्व हिंदू परिषद आणि इतर हिंदू संघटना देखील या भागात आपले हातपाय पसरत होत्या. 

“इस्लामीक शक्ती” अगदी शेकडो वर्षांपासून किनारपट्टीवरील कर्नाटकाला त्यांच्या “ऐतिहासिक मंदिरां” मुळे लक्ष्य करत आहेत आणि त्यामुळे “भारताचे इस्लामीकरण” करण्याच्या प्रयत्नांना विरोध करणे हिंदुत्ववादी संघटनांचे अनिवार्य होते या नॅरेटिव्हखाली या संघटना काम करतात.

जसजशी आरएसएस वाढत होती तसतशी मुस्लिम संघटनांनी आरएसएसला काउंटर करण्यासाठी सुरवात केली होती. यामध्ये सगळ्यात पुढे होती बाजूच्या केरळमध्ये स्ट्रॉंग असलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया. 

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि आरएसएस या संघटनेचे कार्यकर्ते वेगवेगळ्या कारणांनी एकमेकांशी भिडायला सुरवात झाली. 

मग ते गोहत्येचा वाद असू दे की हिजाबचा विषय. आता ही  भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते प्रवीण नेत्तारू यांच्या हत्येच्या आरोपाखाली ज्या संशयितांना अटक करण्यात आली आहे. ते पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचे सदस्य असल्याचं सांगण्यात येत आहे.

या सगळ्या संघर्षाला अजून एक पदर आहे तो म्हणजे गरीब श्रीमंतीचा. 

इतर प्रदेशांप्रमाणेच, कर्नाटक आणि केरळच्या किनारी पट्ट्यातील मुस्लिम समुदाय केवळ संख्यात्मकदृष्ट्या मजबूत नाही तर आर्थिकदृष्ट्याही सधन आहे. मच्छीमार आणि कामगार वर्ग सर्व हिंदू समाजातील होते तर व्यापारी आणि खरेदीदार मुस्लिम होते. त्यात जेव्हा गल्फ देशांत नोकरीसाठी जाण्यास मुस्लिमांनी सुरवात केली तेव्हाही त्यांच्या संपत्तीती झपाट्याने वाढ होत गेली.

हिंदू-मुस्लिमांमधील या श्रीमंत गरिबीच्या दरीला जेव्हा धार्मिकतेचा रंग दिला गेला तेव्हा प्रकरण अजूनच गंभीर बनलं. आणि या सर्वाला राजकारणाची जोड मिळाली आणि आजची स्फोटक परिस्तिथी निर्माण झाली.

याला सुरवात झाली भटकळपासून.

येथील मुस्लिम बहुल शहर भटकळमध्ये बाबरी विध्वंसानंतर एक वर्षानंतर 1993 मध्ये हिंसक जातीय दंगल झाली. पुढच्याच वर्षी आरएसएसचे कट्टर कार्यकर्ते असणारे   डॉ. यू. चित्तरंजन हे आमदार म्हणून निवडून आले. पण 1996 मध्ये त्यांची हत्या करण्यात आली ज्यामुळे हिंदूंमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आणि त्यांचे शिष्य अनंतकुमार हेगडे हे पुढे आले.

धार्मिक भावना भडकवनारी विधाने करण्यामध्ये खासदार अनंत कुमार हेगडे सारखे चर्चेत असतात.

” आम्ही अनंत कुमार हेगडे यांना मुस्लिमांच्या विरोधात उभे राहण्यासाठी ५ वेळा निवडून दिलं आहेत. त्यांनी बाकीची कामे नं करता एवढं केलं तरी चालेल”

सं उघडपणे उत्तर कन्नडा या त्यांच्या मतदारसंघातील लोकं मान्य करतात.

जेव्हा इलेक्शन जवळ येतात तेव्हा तर मग हा वाद पराकोटीला पोहचतो. ध्रुवीकरण करण्यासाठी दोन्ही बाजून कडून धार्मिक द्वेष करणारी विधाने केली जातात. त्यामध्ये आमदार खासदार निवडून जातात तर प्रवीण नेत्तारू, फाझील यांसारखे तरुण हकनाक बळी पडतात. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.