युक्रेन युद्धात रशियाच्या विरोधात आहेत तिथेच मंकीपॉक्स पसरतोय..?

करोनाच्या सावटाखालून आता कुठ तरी बाहेर पडतोय असं वाटतंय. मास्क घालणं कमी झालंय, लोकांना निवांत भेटता येतंय, लग्न- वाढदिवस असं निवांत कार्यक्रम चालू झालाय. अन् तेवढ्यात एका नवीन व्हायरसच्या बातम्या येऊ लागल्यात.

या नव्या व्हायरसचं नाव काय तर मंकीपॉक्स.

स्मॉलपॉक्स म्हणजेच देवी रोगासारखीच याची वरवरची लक्षणं असल्याचं सांगण्यात येतंय. या रोगाचे विषाणू आफ्रिकेतून आल्याचं सांगण्यात येतंय. सांगण्यात येतंय म्हणजे वेस्टर्न आणि सेंट्रल विषवृत्तीय आफ्रिकेत या रोगाचे विषाणू याआधीही आढळले होते. आणि सध्याचा संसर्गही याच देशातून युरोप आणि अमेरिका खंडात पसरल्याचा अंदाज बांधला जात आहे.

अजूनतरी जगभरात जे मंकीपॉक्स चे रुग्ण सापडतायेत त्यांचा कॉमन पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट काय होता हे निश्चित करता आलेला नाहीये. 

मात्र याचवेळी एक इंटरेस्टिंग दावा पुढं आला आहे. रशियाच्या लष्करी शास्त्रज्ञांनी १९९० पर्यंत मंकीपॉक्सचा  बायोवेपण म्ह्णून वापर करण्याच्या दृष्टीने संशोधन केलं होतं असा दावा कधीकाळी रशियात बायोवेपण एक्स्पर्ट राहिलेल्या केन अलिबेक यांनी केला आहे. १९९१ मध्ये सोव्हिएत रशियाचं विघटन होईपर्यंत  केन अलिबेक रशियामध्येच होते. त्यानंतर त्यांनी आपला मुक्काम अमेरिकेला हलवला होता.

केन अलिबेक यांच्या दाव्यामध्ये अजून डिटेलमध्ये जायच्या आत बायोवेपणची कॉन्सेप्ट एकदा क्लेयर करून घेऊ.

बायवेपण म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर बुरशी, विषाणू, बॅक्टेरिया या जिवाणूंचा वापर शत्रू पक्षाला हानी पोहचवण्यासाठी केला जातो. यामध्ये असे जीवनी हवेतून किंवा पाण्यातूनही शत्रू राष्ट्रात पसरवण्याची शक्यता असते.

बायो फिजिसिस्ट स्टिव्हन ब्लॉक  बीओलॉजिकल वेपन्सचा उल्लेख ‘पुअर मॅनस् ऍटम बॉम्ब’ म्हणून करतात.

कारण अणुबॉम्ब इतकीच हानी पोहोचवणारी ही शस्त्र अतिशय कमी किंमतीत डेव्हलप करता येतात. आणि त्यामुळेच दहशतवादी संघटनांकडून अशा शस्त्रांचा वापर होण्याची शक्यता नेहमीच बोलून दाखवली जाते. बायलॉजिकल आणि केमिकल वेपण अशी दोन्ही प्रकारची शस्त्रे बॅन केलेली आहेत. मात्र संशोधनाच्या नावाखाली जगातल्या सर्व प्रमुख देशांनी याचा साठा करून ठेवल्याचा सांगितलं जातं.

आता पुन्हा येऊ रशियन बायोवेपण एक्स्पर्ट केन अलिबेक यांच्याकडे आणि त्यांना सांगितलेल्या मंकीपॉक्सच्या रशियन कनेक्शनबद्दल.

अलीबेक यांचा हा दावा एका जुन्या मुलाखतीच्या पुढे येण्यातून सम्रो आला आहे. १९९८ मध्ये अलीबेक यांनी अमेरिकन केमिकल अँड बायोलॉजिकल वेपन्स नॉनप्रलिफेरेशन प्रोजेक्टला एक मुलाखत दिली होती त्यामध्ये सोव्हिएत मंकीपॉक्स व्हायरसचा वेपण म्हणून वापर करण्यासाठी प्रयत्नशील होतं असं म्हटलं आहे. 

आम्ही माउसपॉक्स विषाणू, रॅबिटपॉक्स विषाणू आणि मंकीपॉक्स व्हायरसची मॉडेल म्हणून चाचणी केली होती आणि त्यांचा बायवेपण म्हणून वापर करण्याचा दृष्टीने पूर्ण प्रयत्न देखील चालू होते. मात्र त्यानंतर तो प्रोग्रॅम बंद करण्यात आला.

मात्र प्रश्न इथंच थांबत नाही. ज्या फॅसिलिटी, लॅबमध्ये हे संशोधन केलं जात होत्या त्या नष्ट करण्यात आल्या नाहीत.

त्यातच  रशियाने तो रिसर्च पुन्हा चालू देखील केला असेल असं अलीबेक यांनी म्हटलं होतं. 

मग प्रश्न उरतो की रशिया हे बायोवेपण आता वापरू शकतं का ?

तर जिओपॉलिटिकली विचार केल्यास तशा शक्यता सापडतात. पाहिलं म्हणजे युक्रेनबरोबर जे रशियाचा युद्ध चालू आहे. या युद्धामध्ये रशियाला युरोप आणि अमेरिकेनं एकटे पाडण्याचे पुरेपूर प्रयत्न केले आहेत. त्यातच रशियावर जे आर्थिक निर्बंध लादले जात आहेत त्यामुळं रशियाला युद्धाची खूप मोठी किंमत चुकवावी लागत आहे. 

त्यात दिवसेंदिवस रशियावरील निर्बंध वाढतच चालले आहेत. त्यामुळं सगळीकडूनच कोंडी झाल्याने रशिया अशी टोकाची पावलं उचलू शकतो. विशेषतः पुतीन यांच्या लीडरशिपखाली अशी पावलं उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच रशियावर याआधीही केमिकल आणि बायोवेपण वापराचे आरोप झाले आहेत.

मग रशियाने खरंच हा रोग पसरवला आहे का?

ब्रिटन, पोर्तुगाल यांसह नऊ युरोपियन देशांमध्ये, तसेच अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये संक्रमणाची पुष्टी झाली आहे. मंकीपॉक्स मध्य आणि पश्चिम आफ्रिकेच्या दुर्गम भागांमध्ये सर्वसामान्यपणे आढळतो. त्यामुळं युरोप आणि अमेरिकेतच या केसेस सापडणं रशियानेच बायोवेपण वापरल्याचा शक्यतेला अजूनच बळ देतं?

आफ्रिकन शास्त्रज्ञांनीही म्हटलं आहे की ते या रोगाच्या जागतिक प्रसारामुळे हैराण झाले आहेत.

मात्र याचे कोणतेच पुरावे सध्या नाहीयेत. ज्या द मेट्रो या ब्रिटनमधील वृत्तपत्रानेदेखील जे वृत्त दिलं आहे त्यांनी ही शक्यता पूर्णपणे फेटाळून लावलेली नाहीये तर फक्त सध्या पुरावे नसल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे हा विषाणू अजून तेवढा धोकादायक बनलेला नाहीये आणि देवीच्या लसीने त्याच्यावर उपचार केले जात आहेत. 

त्यामुळं आज ना उद्या रोगाचं ओरिजीन माहित पडेलच मात्र तोपर्यंत रशिया आणि पुतीन यांचं कनेक्शन हायलाइट होत राहणार एवढं नक्की.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.