रिलॅक्स गाईज….स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारतात पोरींची संख्या पोरांपेक्षा वाढलीये…

देशाच्या इतिहासात नेहेमीच एक उदासीनता राहिलेली आहे कि, देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये पुरुषांच्या संख्येच्या मानाने स्त्रियांची लोकसंख्या कायमच कमी राहिलेली आहे.

पण याबाबत सुखावणारी एक बातमी आली ती म्हणजे, अलीकडेच एक सर्व्हे झाला त्यातून अशी माहिती समोर आलीये कि, देशातली स्त्रियांची संख्या हि पुरुषांच्या पेक्षा जास्त आहे. 

नुकत्याच झालेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे (NFHS-५) नुसार भारतातील स्त्रियांची संख्या पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा जास्त वाढली आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच स्त्रियांची संख्या वाढलेली आढळून आली आहे. 

सध्याच्या आकडेवाडी नुसार स्त्रियांची संख्या हि १००० पुरुषांमागे १०२० एवढी झाली आहे. हाच आकडा मागील जनगणनेत १००० पुरुषांमागे स्त्रियांची संख्या हि ९४० एवढी होती. 

त्यामुळे पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांची वाढलेली संख्या हि फार मोठी गोष्ट आहे.  या जनगणनेत आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे ग्रामीण भागात शहरी भागांच्या तुलनेत स्त्रियांची आकडेवारी हि जास्त आहे.  त्यामुळे ग्रामीण भागातील स्त्रियांच्या लोकसंख्येचा वाढीचा दर हा जास्त पाहायला मिळतो. 

जनगणनेत स्त्रियांची संख्या वाढीचं कारणे काय ?

या जनगणनेत जर स्त्रियांची लोकसंख्या वाढीचं कारण पाहायचं झाल्यास पाहिलं कारण म्हणजे, देशातील प्रजननात दरात झालेली घट… जी कि आता २.२ वरून २ टक्क्यांवर आला आहे. 

आता प्रजनन दर म्हणजे काय ? तो कसा काढतात वगैरे वगैरे आपण ते पाहूया,

प्रजनन दर म्हणजे देशातील एका स्त्री ची तिच्या आयुष्यभरात मुलांना जन्म देण्याची क्षमता, अजून सोप्या  भाषेत सांगायचं झालं तर एक महिला कितीवेळा मुलांना जन्म दिला त्याचा दर म्हणजे प्रजनन दर. आणि तो दर घटल्यामुळे स्त्रियांची संख्या वाढण्याला ते कारणीभूत ठरला आहे. दुसरा कारण म्हणजे देशाती स्त्रीभ्रूण हत्या ह्याला थोड्या फार प्रमाणात बसलेला आळा हे हि एक कारण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्त्री सक्षमीकारणासाठी आणि जन्मासाठी समाजात होणारे वेगवेगळे प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि बदल यामुळे हि स्त्रियांची संख्या वाढल्याचे दिसून येते.  

पण नेमकी कशी आणि का केली जाते हि जनगणना ???

भारतात जनगणनेची सुरुवात हि १८७२ पासून झाली होती, आन ती अजूनहि दर १० वर्षांनी केली जाते, ज्यात जनगणनेत फक्त लोकांची संख्याच मोजली जात नाही तर अनेक गोष्टीची पडताळणी आणि अनेक गोष्टीची मोजणी केली जाते ज्यात, साक्षर दर, आर्थिक परिस्थिती, लिंग गुणोत्तर, अपंगत्व आधारित, भाषा आधारित, धर्मनिहाय गणना केली जाते. 

ह्या सगळ्या गोष्टी आणि जनगणना करण्यासाठी भारत सरकार कडून एकही सरकारी कर्मचाऱ्यांनी नियुक्ती केली जाते. आन हे कर्मचारी घरो घरी फिरून लोकांकडून त्यांच्या कुटुंबाची माहिती, त्यांच्या शैक्षणिक माहिती, कोण अपंग असेल तर त्याची माहीती अश्या वेगवेगळ्या माहिती जाणून त्याची नोंद करून घेतात आणि हि नोंद केलेली माहिती सरकारपुढं सोपवतात. 

पण हि माहिती घेऊन सरकार काय करतंय?

तर सरकार हि माहिती जी त्यांचा कर्मचाऱ्यांनी लोकांच्या घरोघरी फिरून गोळा केलेली असते, ती जमा करून त्यातून मग नवनवीन आकडे बाहेर काढतात, मग हे आकडे लोकसंख्येबाबत असतात, यातूनच साक्षरतेचा दर, लिंगगुणोत्तर, भाषा आधारित दर, धार्मिक आकडेवारी आहे वेगवेगळे दर जाहीर करते.

 हे आकडे जाहीर करण्यासोबतच सरकार ला ह्या आकड्याचा उपयोग नवनवीन योजना, प्लॅनींग करण्यासाठी केला जातो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या आकड्याचा उपयोग सरकारला निवडणुकीच्या हिशोबाने नवनवीन धोरण बनवण्यासाठी होतो. त्यामुळे हि जनगणना सगळ्याच अंगाने महत्वाची असते आणि ती जनगणना करणं खूप गरजेचं आहे. 

हे हि वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.