डिसलेक्सिया आजारावर मात करत त्याने जगातली सगळ्यात मोठी फर्निचर कंपनी उभी केली….

डीसलेक्सिया आजारात माणसाच्या ध्यानात काही गोष्टी राहत नाही, विसराळूपणा वाढतो. असाच आजार झाला होता इंगवार केम्पेर्डला. पण हा आजार असतानाही जगातली सगळ्यात मोठी फर्निचर कंपनी त्याने बनवली तर जाणून घेऊया या भिडूचा प्रवास.

स्वीडनमधल्या एका छोट्या गावातल्या गरीब घरात इंगवारचा 23 मार्च 1926 रोजी जन्म झाला. घरातील अठराविश्व दारिद्रय आणि त्यातचं घरच्यांना कळलं की इंगवारला डीसलेक्सिया नावाचा आजार झाला आहे. इंगवारचे वडील शेतकरी होते, आपल्या जमिनीवर ते शेती करत असे. इंगवार जेव्हा मोठा होऊ लागला होता तसा तो वडलांना शेतात मदत करू लागला होता. जंगलात जाऊन लाकूड घेऊन येणे हे त्याचं काम असायचं त्यामुळे त्याला लाकडांची चांगली ओळख झाली होती.

5 वर्षाचा झाल्यानंतर इंगवार शाळेत जाऊ लागला मात्र त्याला झालेला आजार त्याला पुढे जाऊ देईना, तो भविष्यात काहीच करू शकणार नाही अशी चिन्ह दिसत होती. ज्यावेळी तो जंगलात जात असे तेव्हा तो सरकांडे घेऊन येत असे आणि त्याचा पेन करून मुलांना विकत असे. यातून त्याचा शाळेचा खर्च सुटू लागला. वयाच्या 7-8 व्या वर्षी तो वडिलांनी बनवलेल्या तीन चाकी सायकलवरून काडेपेटी विकू लागला. शाळेचा खर्च यातूनच तो करायचा.

नंतर बाहेरगावी जाऊनसुद्धा तो काडेपेटी विकू लागला. वयाच्या 17 व्या वर्षी त्याच्या वडिलांनी त्याला काही पैसे देऊ केले यातूनच इंगवार व्यवसाय करायला खरा सुरू झाला. 20 व्या वर्षी त्याने शिक्षण सोडलं. आजवर त्याने बॉल पॉईंट पेन, डेकोरेशन साहित्य असं बरंच विक्री केलं होतं त्याला मोठं काहीतरी करायचं होतं. इंगवारने आपल्या आसपासच्या फर्निचर विक्रेत्या लोकांकडून माहिती मिळवली त्याचे रेट, ठोक किंमत सगळं जुळवून आणलं.

स्वस्तात फर्निचर विकत घेऊन त्याला मॉडिफाय करून श्रीमंत लोकांना विकायला त्याने सुरवात केली. टेबल खुर्च्या ए वन क्वालिटी असल्याने आणि दिसायला आकर्षित असल्याने मोठ्या घरची लोकं विना संकोच करता इंगवारने तयार केलेलं फर्निचर विकत घेऊ लागली.

अचानकपणे मार्केटमध्ये इंगवार केम्पेर्डचं नाव व्हायला लागलं, हळूहळू पूर्ण देशाला त्याच्याकडून फर्निचर पोहचलं जाऊ लागलं. मग 1953 साली इंगवारने आपलं पहिलं शो रूम उघडलं आणि IKEA फर्निचर असं नाव दिलं. ( इंगवार केम्पेर्ड एलमटायर्ड अगुणायर्ड ) पुढे ही कंपनी ब्रँड बनली.

या नाव ठेवण्यामागे पहिली दोन अक्षरं ही इंगवारचं पूर्ण नाव आहेत आणि एक अक्षर हे ज्या जंगलातून तो लहानपणी लाकूड आणायचा त्या जंगलाचं नाव आहे. आज जगभरात इंगवारने सुरू केलेल्या IKEA चे शोरूम आहेत. स्वस्तात फर्निचर विकू लागल्याने स्वीडनमध्ये इतर कंपन्यांनी इंगवारच्या कंपनीवर बहिष्कार टाकला पण तोवर इंगवारची कंपनी जगात टॉपला पोहचली होती.

आज भारतातसुद्धा IKEA ची धूम आहे. वयाच्या 91 व्या वर्षी इंगवार यांचं निधन झालं पण आपल्या आजारावर मात करत एक ब्रँड सेट त्यांनी केला. अनेक लोकांना रोजगार आणि करोडो रुपयांची उलाढाल आजही IKEA करते.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.