जगदंबा तलवार आणण्यासाठी सर्वाधिक प्रयत्न मुख्यमंत्री ए आर अंतुलेंच्या काळात झाले होते

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंब तलवार महाराष्ट्रात दर्शनासाठी येणार आहेत. त्याबाबतची मोठी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मागील वर्षी केली होती.. त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रिटनचे उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांना केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे ब्रिटनमधील वस्तू संग्रहलयातील जगदंबा तलवार आणि वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

त्यामुळे परत एकदा सरकारकडून शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे म्हटले आहे. मात्र पाहायला गेलं तर जगदंबा तलवार आणण्यासाठी सर्वाधिक प्रयत्न मुख्यमंत्री ए आर अंतुलेंच्या काळात झाले होते.  

 इतिहास अभ्यासकांच्या मते छत्रपती शिवरायांकडे नेमक्या किती तलवार होत्या, याविषयी कोणतेही ठोस पुरावे समोर आले नाहीत. तरीही छत्रपती घराण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार तसेच कागदोपत्री मिळणाऱ्या नोंदीमधून शिवाजी महाराजांच्या ‘तीन तलवारी’ ज्ञात आहेत.

यातील एक तलवार आजच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर असून, तिचे संवर्धन करण्याचे काम युवराज संभाजीराजे छत्रपती व इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सर यांनी केले आहे. ही तलवार शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर आज एका काचेच्या पेटीमध्ये सुरक्षित ठेवली आहे.

भवानी तलवारी विषयी तर महाराष्ट्रातील प्रत्येकालाच विलक्षण आकर्षण आहे आणि ‘भवानी’ च्या अस्तित्वाचा शोध अविरतपणे सर्वच संशोधक करत आहेत. शिवाजी महाराजांच्या आणखी एका तलवारीचा उल्लेख काही ऐतिहासिक कागदपत्रात पाहायला मिळतो, तेही तिच्या नावासकट.

त्या तलवारीचे नाव आहे ‘जगदंबा तलवार’..

सध्या ही तलवार लंडन मध्ये आहे. मात्र ही जगदंबा लंडनला गेली कशी? यामागेसुद्धा एक कहाणी आहे. ‘ऑक्टोबर 1875’ मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स भारतभेटीवर आला असता, त्याला भारतातील राजेरजवाड्यांनी अत्यंत मौल्यवान वस्तू भेटस्वरूपात दिल्या. कोल्हापूरच्या गादीवर तेव्हा ‘छत्रपती शिवाजी महाराज चौथे’ विराजमान होते.

कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या प्रिन्सला एक अमूल्य भेट नजराणा म्हणून दिली. एक जुनी तलवार.. काहीशी नवीन काम करून, सुंदरपणे सजवून प्रिन्सला भेट देण्यात आली.

या चौथ्या शिवाजी महाराजांच्या अल्पवयाचा फायदा घेऊन प्रिन्सला ही भेट देण्यास प्रवृत्त करणारी व्यक्ती होती छत्रपतींचा दिवाण महादेव बर्वे.. या भारतभेटीदरम्यान ‘नजराणा’ म्हणून मिळालेल्या वस्तूंची एक यादी बनवण्यात आली आणि हा मौल्यवान वस्तूंची नोंद असलेला कॅटलॉग पुढे ‘Catalogue of the collection of Indian arms and objects of art’ या नावाने प्रकाशित करण्यात आला.

या कॅटलॉगमध्ये चौथे शिवाजी महाराज यांनी भेट म्हणून दिलेली तलवार दुसऱ्या-तिसऱ्या कुणाची नसून मराठा स्वराज्याची स्थापना करणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराजांची’ होती, असे नमूद करून ठेवले आहे.

 

 सध्या हि तलवार लंडन मधील Marlborough House मध्यल्या इंडिया हॉल मधील Case of Arms मध्ये ठेवण्यात आलेली आहे. या तलवारीचा क्र. 201 असून कॅटलॉगमध्ये 2 वेळेस या तलवारीस ‘शिवाजी महाराजांची तलवार’ असे संबोधण्यात आले आहे.

तलवार आणण्यासाठी सर्वाधिक प्रयत्न मुख्यमंत्री ए आर अंतुलेंच्या काळात झाले होते 

१९८० मध्ये अब्दुल रहेमान अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात शिवाजी महाराजांची भवानी तलवार भारतात आणण्यासाठी राज्यभर जनआंदोलन उभारण्यात आलं होतं. बॅ. अंतुले स्वतः वकील असल्यामुळे त्यांनी पुराव्यांच्या आधारावर ती तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न करत होते.

परंतु तलवारीच्या ऐतिहासिक संदर्भावरून समस्या निर्माण झाली होती. तेव्हा मुख्यमंत्री अंतुले यांनी प्रयत्न न सोडता ब्रिटनच्या महाराणी बरोबर चर्चेची सुरुवात केली होती. 

याबाबत ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ आणि मुख्यमंत्री अंतुले यांची भेटही निश्चित करण्यात आली होती.  परंतु ही भेट होण्याच्या आधीच बॅ. अंतुलेंना राजीनामा द्यावा लागला होता. 

त्यामुळे बॅ. अंतुले यांचे तलवार परत आणण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. मुख्यमंत्री ए आर अंतुले यांनी राजीनामा दिल्यांनतर बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. परंतु ब्रिटनच्या राणीबरोबर आयोजित बैठकीला बाबासाहेब भोसले गेलेच नाहीत असं सांगण्यात येतं. त्यांनतर अनेक वेळेस  तलवार भारतात परत आण्यासाठी मुद्दा मांडण्यात आला. परंतु त्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांमध्ये सातत्य नसल्यामुळे हा मुद्दा तसाच पडून आहे.

त्यानंतर अनेक अनेक मोठ्या व्यक्तींनी महाराजांची तलवार आणण्यासाठी प्रयत्न केल्याच्या वावड्या अनेकदा उठत होत्या मात्र त्याला कोणताही कागदपत्री पुरवठा मिळत नाही. मग बाकी मागण्या मात्र नेहमीच होत गेल्या. 

हे ही वाच भिडू 

वर्षा बंगल्याचा कायापालट झाला, ज्याचं श्रेय बॅरिस्टर अंतुलेंना जातं

अंतुले विरुद्ध दि.बा.पाटील यांच्यात झालेली लढत रायगडवासी कधीच विसरणार नाहीत…

Leave A Reply

Your email address will not be published.