हा आहे, भारतातील सर्वात महागडा “मतदार”.  

एका मताची किंमत किती असावी ? उमेदवार जसा तशी किंमत. मताला किती रुपये वाटत आहेत हि आतली जगजाहिर गोष्ट तशी आपणा सर्वांनाच माहित असावी. पण हि झाली त्या उमेदवाराने मतदारांना विकत घेण्याची पद्धत. 

“हे चुक आहे” याबाबत कितीही संपादकीय लेख लिहले तरी देखील वातावरण काही बदलणार नाही.

तर असो हि गोष्ट मात्र वेगळी आहे. कारण आम्ही जो मतदार तुम्हाला सांगणार आहोत तो मतदार भारतातील सर्वात महागडा मतदार म्हणून ओळखला जातो. महागडा यासाठी कारण निवडणुक आयोगाच्या बातमीनुसार या मतदारासाठी भारतात  सर्वात जास्त खर्च केला जातो. 

त्यांच नाव भरतदास. डोळ्यांवर गॉगल, पायापासून डोक्यापर्यन्त भगवी वस्त्र आणि पांढरीशुभ्र दाढी असणारे गुजरातचे भरतदास सर्वात महागडे मतदार म्हणून ओळखले जातात. त्याचं कारण अस की, गुजरातच्या गीर जंगलातील शंकराच्या मंदिराचे पुजारी असणारे भरतदास हे त्यांच्या जिल्हातील एकमेव मतदार आहेत.

निवडणुक आयोगामार्फत त्यांच्यासाठी, फक्त आणि फक्त त्यांच्या एकट्यासाठी जंगलामध्ये ३५ किलोमीटर आत जावून निवडणुक बुथ लावण्यात येतो. 

निवडणुक आयोग एवढं कष्ट एका मतदारासाठी का घेतं ? 

निवडणुक आयोगाचा नियम आहे की, “कोणत्याही मतदाराला २ किलोमीटर पेक्षा जास्त मतदान करण्यासाठी जायला लागू नये.” या एकमेव कारणामुळे मतदारांच्या सोयीचे होतील अशा ठिकाणी मतदान बुथ उभा केले जातात. याच नियमांमध्ये गीरच्या जंगलात राहणारे शंकराचे पुजारी देखील येतात. आत्ता ते एकटेच ३५ किलोमीटर आत असणाऱ्या जंगलात राहत असल्याने त्यांच्या एकट्यासाठी खास बुथ उभा करण्यात येतं. 

कोण आहेत हे भरतदास ? 

भरतदास यांचा जन्म राजस्थानचा. राजस्थानातून शाळा निम्यावरती सोडून ते पळून आले. अध्यात्मिक सुख शोधत शोधत ते आले गीरच्या जंगलात. गीरच्या जंगलाच्या मध्यभागातच शंकराचे प्राचीन मंदिर आहे. याच मंदिरातील वातावरण त्यांना आवडलं आणि इथेच स्थानिक होण्याचा निर्णय त्यांनी झटक्यात घेवून देखील टाकला.

आत्ता सर्वात मोठ्ठा प्रश्न होता तो मंदिर आणि अभयारण्य प्रशासनाचा! 

मंदिर प्रशासनाच्या परवानगी शिवाय याठिकाणी कोणत्याही व्यक्तिस राहण्याची परवानगी नव्हती. त्याचं कारण म्हणजे इथे असणारे सिंह. त्याचसोबत हा भागच अभयारण्याच्या क्षेत्रात येत होता. पण भरतदास यांच नशिब जोरावर होतं. त्याचं कारण म्हणजे याच वेळी अभयारण्य अशा माणसांचा शोध घेत होतं जे जंगलाच्या आतमध्ये राहून काळजी घेवू शकेल. झालं त्याचं अधिकृत पदावर पुजारी म्हणून भरतदास यांची नियुक्ती करण्यात आली त्यावेळी पासून शंकराच मंदिर आणि गीरचं जंगल हे भरतदास यांच हक्काचं घर झालं. जंगलाच्या आतील अशी जागा जिथ कोणीही जात नाही.

इथे ना लाईट आहे न मोबाईल फोनसाठी रेन्ज. या मंदिरात आलेच तर अधूनमधून सिंहाची जोडी येते आणि फेरफटका मारून जाते. असा भाग आत्ता भरतदास यांच अधिकृत घर झालं होतं. 

निवडणुक आयोग कशी करतं एका मताची तयारी ? 

निवडणुक आयोगाचे अधिकारी एक दिवस अगोदर आपल्या सामानांसहीत या जंगलात पोहचतात. न्यूटन सिनेमात पाहीला असेल तर अगदी तसच हे एकंदरित प्रकरण असत.

व्होटिंग मशिन, सुरक्षा अधिकारी, वनसंरक्षक आणि निवडणुक आयोगाचे कर्मचारी अशी सात आठ जणांची टिम ३५ किलोमीटर आत जंगलात जाते. मंदिराच्या जवळच बुथ लावला जातो. पुजारी भरतदास मोठ्या अभिमानानं मतदान करतात. साहजिक एका मतदानानंतर १०० टक्के मतदान झाल्यांची नोंद होते. आणि आपला सर्व कारभार आटपून हे अधिकारी पाच नंतर मागे फिरतात. 

हे ही वाचा भिडू –

Leave A Reply

Your email address will not be published.