यु ट्यूबवर धमाका करणारी मराठी पोरगी थेट मिशेल ओबामा यांच्यापर्यंत जाऊन पोहचलीय…

यु ट्यूब वर कंटेंट क्रिएटर लोकांची कमी नाहीए. गाण्यापासून ते खाण्यापर्यंत, व्यायामापासून ते ट्रेकिंगपर्यन्त सगळे व्हिडीओ यु ट्यूबवर उपलब्ध असतात. यु ट्यूब चॅनलवर असणारे सबस्क्रायबर हे प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जात. कंटेंट क्रिएट करणे हे खरं यु ट्युबर लोकांचं काम असतं. पैकी फेमस यु ट्युबर लोकं बरेच असतात. त्यापैकीच एक मराठी चेहरा आणि तिचा यशस्वी प्रवास आपण जाणून घेणार आहोत.

मोस्टलीसेन [ MOSTLYSANE ] हे नाव बऱ्याच शोषलं मीडिया धारकांना चांगलंच माहिती असेल.

हे चॅनल आहे मराठी मुलीचं म्हणजे प्राजक्ता कोळीचं. भारतातली सगळ्यात मोठी फिमेल कॉमेडी कंटेन्ट क्रिएटर म्हणून प्राजक्ता कोळीची ओळख आहे.

२७ जून १९९३ रोजी प्राजक्ताचा जन्म झाला. ठाण्यामध्येच ती वाढली. वडील व्यावसायिक आणि आई शिक्षिका असल्याने घरातून तिला भरपूर सपोर्ट मिळाला होता. लहानपणापासूनच नाटकांमध्ये तिचा सहभाग असायचा. शाळेतल्या अनेक कार्यक्रमांमध्ये ती भाग घेऊन आपली कला सादर करत असे. सहावीत असतानाच तिने ठरवलं होतं कि रेडिओ जॉकी बनून लोकांना आनंद द्यायचा.

मुंबई विद्यापीठातून व्ही.जी. वझे कॉलेजमधून मास कम्युनिकेशनला तिने प्रवेश मिळवला. रेडिओ जॉकीच्या मोकळीक असलेल्या कामामुळे तिला रेडिओ जॉकी बनायचं होतं. एक वर्षभर तिने इंटर्नशिप म्हणून एका रेडिओसाठी काम केलं पण तिथे तिच्या मनासारखं काहीच घडेना. आणि आयुष्यात काही वेगळं करता येईना. रेडिओ जॉकी बद्दल रंगवल्या गेलेल्या तिच्या सगळ्या कल्पना धुळीस मिळाल्या.

पुढे तिला लेट नाईट आरजे म्हणून प्रमोशन मिळालं. त्यावेळी अचानकपणे ह्रितिक रोशन त्याच्या बँग बँग सिनेमाचं प्रमोशन करायला तिथे आला होता. आपल्या आवडत्या हिरोला बघून ती अवाक झाली होती. तेव्हा प्राजक्ताने ह्रितिक रोशन सोबत एक फनी व्हिडिओ सिरीज बनवली होती. पण स्वतः प्राजक्ताला तो व्हिडिओ बकवास वाटला होता. 

पण वन डिजिटल एंटरटेनमेंटचे अधिकारी सुदीप लहरी यांना तिची सिरीज प्रचंड आवडली. तेव्हा सुदीप लहरीने प्राजक्ता कोळीला यु ट्यूब चॅनल सुरु करून त्यावर असे कॉमेडी व्हिडिओ शेअर करायला सांगितले. सुरवातीला प्राजक्ताला हि आयडिया सुद्धा बेकार वाटली होती पण तिने स्वतः लिहून, व्हिडिओ बनवून यु ट्यूबला टाकायला सुरवात केली.

तिने बनवलेला पहिला व्हिडिओ म्हणजे फाईव्ह टाईप्स ऑफ सिंगल्स ऑन व्हॅलेंटाईन डे हा पोस्ट केला. अगोदर लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही पण नंतर प्राजक्ताने दररोजच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी विनोदी पद्धतीने सादर करून आपल्या चॅनलवर टाकायला सुरवात केली. यामुळे लोकांना ते जास्तच रिलेट होऊ लागलं आणि मग ऑडियन्सकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला. 

प्राजक्ता कोळीचा हा कन्टेन्ट लोकांना चांगलाच आवडत गेला आणि वर्षभरातच तिच्या मोस्टलीसेन या चॅनलने १ लाख सबस्क्रायबरचा पल्ला गाठला.

प्राजक्ताने तयार केलेला कन्टेन्ट इतका जबर्दस्त होता कि जे अगोदरच यु ट्यूबवर बादशहा म्हणून प्रसिद्ध होते असे भुवन बाम, आशिष चंचलानी, डियर बायसेप्स, टेक्निकल गुरुजी हे सगळे तिच्यासोबत कोलॅब्रेट करून व्हिडिओ बनवू लागले.

२०१६ आणि २०१९ मध्ये प्राजक्ता कोळीला यु ट्यूब फेस्टमध्ये बोलावण्यात आलं होतं. तिथे तिने अस्सल मराठी बाज दाखवत उपस्थित लोकांची मने जिंकली. प्रत्येक वेळी नवीन कन्टेन्ट तयार करून तितकेच जास्त लाईक मिळवणे हे प्राजक्ताचं लोकप्रिय होण्याचं रहस्य आहे.

फक्त कॉमेडी व्हिडिओचं नाही तर प्राजक्ता कोळी सामाजिक कॅम्पेनमधेही सहभागी असते. त्यात नेटवर्क सेफ्टी, मुलींचं शिक्षण, सायबर क्राईम अशा मोहिमांमध्ये ती जागरूकता निर्माण करते. २०१७ मध्ये प्राजक्ता कोळीला व्हायरल क्वीन म्हणून निवडलं गेलं होतं. यु ट्यूबच्या माध्मयातून समाजात आणि तरुणाईमध्ये जागरूकता निर्माण करण्याऱ्या जगातल्या ३७ यु ट्युबर लोकांपैकी प्राजक्ता कोळी एक होती. 

शेमलेस नावाचा तिने एक ट्रेंड सुरु केला होता ज्यात शारीरिक गोष्टींवरून एखाद्याला चिडवल जात असायचं. असंख्य जाहिराती, सोशल कॅम्पेन, भरपूर अवार्ड्स अशा अनेक कामांमधून प्राजक्ता कोळी पुढे येत गेली.

ओबामा फाउंडेशनतर्फे टाऊनहॉल मिटिंगसाठी प्राजक्ता कोळीला बोलावण्यात आलं होतं.

सुरवातीचा आरजे पासून सुरु झालेला हा प्रवास जागतिक स्तरावर सुद्धा तिची दखल घेण्यास भाग पाडतो इतका उत्तुंग आहे. भारतातील सगळ्या तजास्त महिला कॉमेडी कन्टेन्ट क्रिएटर म्हणून प्राजक्ता कोळीचं नाव टॉपला असतं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.