गाडी चालवण्यावरून बायकांना चिडवताय पण इंडिकेटरचा शोध बायकांनीच लावलाय हे माहित आहे का?

धक्कादायक ! धक्कादायक !! धक्कादायक !!! प्रचंड धक्कादायक !!!!

तर धक्कादायक गोष्ट अशी की डावीकडे म्हणून उजवीकडे वळली…

पायाने ब्रेक लावला…

स्टॅण्डल घासल…

विमान लॅण्ड झालं…

अशा कित्येक गोष्टींवरुन महिलांच्या कॉन्फिडन्सची हवा काढत बायकांना गाडी चालवता येत नाही अशी ढळढळीत थेअरी मांडणाऱ्यांसाठी हे खास आर्टिकल आहे. 

तुम्हाला माहित आहे का? गाडीसाठी आज अत्यावश्यक असणाऱ्या इंडिकेटरचा शोध एका बाईने लावला आहे,

इंडिकेटरच काय तर ब्रेक आणि वायपरचा शोध देखील महिलांनीच लावला आहे. 

अशाच शोधाचे काही नमुने याठिकाणी सादर करत आहोत.

त्याचा लाभ घ्यावा. 

शोध क्रमांक एक इंडिकेटर आणि ब्रेक लाईट (डेंजर) 

इंडिकेटरचा शोध लावला तो हॉलीवुडच्या सायलेंट हिल्मची हिरोईन असणाऱ्या फ्लोरेंस लॉरेंसने. १९१३ तिने कार खरेदी केली. तेव्हा तिनं आपल्या गाडीसाठी खास म्हणून लाईट जोडून घेतल्या. हि तिची आयडीया होती. डावीकडे वळण घेण्यासाठी LEFT लिहलेला लाईट, उजवीकडे वळण घेण्यासाठी RIGHT लिहलेला लाईट आणि थाबंण्यासाठी STOP लिहलेला लाईट अशा प्रकारे तिने आपली गाडी घरच्या घरी मॉडिफाय केली. 

पण झालं अस की हा आपला शोध आहे आणि याचं पेटंट घेता येवू शकतं हे तिच्या ध्यानिमनी देखील नव्हतं. म्हणून तिने या शोधाचं पेटंट घेतलं नाही पण या शोधाची जनक म्हणून तिलाच निर्विवादपणे श्रेय दिलं जातं. 

शोध क्रमांक दोन वायपर. 

पावसाळ्यात काचेच्या समोरचं दिसण्यासाठी वायपरच महत्व सांगून दोन चार ओळी घालवण्यात महत्व नाही. थेट मुद्यात हात घालू. वायपरचा शोध लावला तो मेरी एंडर्सन. वरच्या बाजूने आतल्या साईटला एक बटन देवून तिने वायपरची सोय केलेली. आजही जुन्या रिक्षात हे जुगाड तुम्हाला दिसून जाईल. तर हा शोध लावण्यात आला तेव्हा घर बसून सुचणारे रिकामे उद्योग म्हणून या बाईंना चिडवण्यात आलं. १९०५ ला लावलेला हा शोध मुर्खात काढण्यात आला तर तो १९१६ साली पहिल्यांदा अंमलात आणला गेला. आज वायपर गाडीसाठी काय असतो हे तुम्हाला ठावूकच आहे. 

शोध क्रमांक तीन कार हिटर. 

विलिकॉक्स नावाच्या  एक महिला मॅकेनिकल इंजनियर होत्या. साल होतं १८९३ चं. त्या काळात तिने कार हिटर नावाची गोष्ट शोधली. युरोपात थंडी असल्यानं गाडी गरम ठेवण्याचा उपाय तिनं शोधला. सुरवातीच्या काळात गाडीच्या तापलेल्या इंजिनच्या उष्णतेवरच तिने हा अनोखा मार्ग शोधला. 

शोध क्रमांक चार ब्रेक पॅड आणि मल्टिपल गियर.

मर्सिडीज कंपनी माहितच असेल. नसेल माहिती तर “चलो जंगल की औंर’. तर या कंपनीच्या मालकाची बायको बेर्था बेंज. तिने आपल्या गाडीमध्ये मोठमोठ्या सुधारणा केल्या. आपल्या पोरांना घेवून क्रॉस कंट्री टेस्ट ड्रायव्हला गेलेल्या या महिनेनं ब्रेक शू च्या आतमध्ये पॅडस लावले. आत्ता मोठमोठ्या चढाला गाडी चढवण्यासाठी थोडक्यात ऑफ रोडसाठी तिनच पहिल्यांदा मल्टिपल गियरचा शोध लावला. 

थोडक्यात आणि समर्पक भाषेत आत्ता बायकांना गाडी येत नाही म्हणताना विचार करा ! त्या नसत्या तर तुम्ही माणसांनी कधी गाडीला इंडिकेटर आणि ब्रेक असू शकतात याचा विचार पण केला नसता. सुरक्षेचा विचार त्यांनीच केला. असो. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.