दोन भावांनी मोटोरोला फोनचा शोध लावला जगातलं अंतर कमी केलं…..

आजच्या काळात स्मार्टफोनच्या किती व्हरायटी आल्या, अनेक कंपन्या वाढल्या, लोकांना प्रश्न पडायला  लागले कि फोन घ्यायचा तर कुठल्या  कंपनीचा घ्यायचा. आजचा किस्सा आहे जगातल्या पहिल्या सेल फोनचा. अमेरिकेच्या मल्टिनॅशनल कंपनीने बनवलेल्या या फोनची क्रेझ काय होती आणि त्याची यशोगाथा काय होती जाणून घेऊया.

मल्टिनॅशनल कंपनी हि जगातली सगळ्यात जास्त मोबाईल फोन बनवणारी कंपनी होती. तर थोडं आधीपासून माहिती करून घेऊ. हि गोष्ट सुरु होते ती ९०-९२ वर्ष अगोदर म्हणजे १९२८ सालापासून. एका भाडोत्री दुकानातून दोन भावांनी या कंपनीची स्थापना केली. हे दोन भाऊ होते पॉल गॅल्व्हिन आणि जोसेफ गॅल्व्हिन. 

या कंपनीत सुरवातीला फक्त पाच कर्मचारी होते आणि फक्त ५६५ डॉलरवरून हि कंपनी सुरु झाली होती. त्याकाळी दिवाळखोरीत निघालेल्या स्टेवॉर्ट बॅटरी कंपनीच्या वाया गेलेल्या साधनांचा वापर करून हि कंपनी सुरु झाली. ज्यावेळी कंपनी सुरु झालेली त्यावेळी कंपनीचा पहिला प्रोडक्ट होता बॅटरी एलिमिनेटर. जो बॅटरीवर चालणाऱ्या रेडिओला घरच्या वीज उपकरणावरूनसुद्धा चालू ठेवायचा. पण हे प्रोडक्ट लवकरच मार्केटातून बाहेर पडलं.

कारण रेडिओ टेक्नॉलॉजी त्यावेळी जोरात वाढत होती. त्यावेळी पॉलला कळलं कि लोकं गाडीमध्ये रेडिओ ऐकणं जास्त पसंत करत आहेत. त्यावेळी त्याने आपल्या कर्मचाऱ्यांना एक स्वस्त रेडिओ बनवायला सांगितला. गॅल्व्हिन मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन द्वारे डिझाईन केलेल्या या रेडिओला रेडिओच्या संमेलनात दाखवलं गेलं. तिथे लोकांची चांगलीच वाहवा या रेडिओला मिळाली. 

इथून कंपनीला चांगल्याच ऑर्डर मिळायला सुरवात झाली. हे दोन भाऊ आपल्या कंपनीला ब्रँड बनवायच्या विचारात होते त्यामुळे त्यांनी या रेडिओला जास्त महत्व दिलं. त्यामुळे या रेडिओचं नाव त्यांनी मोटोरोला ठेवलं. मोटोरोला हा शब्द दोन शब्दांना जोडून बनला गेला आहे पहिला MOTOR हा मोटरशी संबंधित होता तर OLA हा विकट्रॉलाशी संबंधित होता.

MOTOR + OLA =MOTOROLA

२७ जून १९३० ला कंपनीने आपला पहिला रेडिओ विक्रीस काढला तोही फक्त ३० डॉलरमध्ये. जशी या प्रॉडक्टची लोकप्रियता वाढली तेव्हा गॅल्व्हिन बंधूंनी कंपनीचं नाव बदलून मोटोरोला केलं. पुढे मोटोरोलाने कार रेडिओ रिसिव्हर बनवला आणि तो पोलीस गाड्या आणि नगरपालिकेला विकला.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कंपनीने SCR ५३६ मॉडेल बनवलं ज्यामुळे अमेरिकन मिलिट्रीला संभाषण करण्यासाठी ते जास्तच उपयोगी पडू लागलं. १९४७ ला कंपनीने रेडिओ व्यतिरिक्त एक टेलिव्हिजन सुद्धा बनवला. या काळात मोटोरोलाचा मेन बिजनेस होता रेडिओ आणि टीव्ही बनवणे हाच होता. १९५८ ला सॅटेलाईट लाँच करतेवेळी मोटोरोलाने नासासाठी सुद्धा बरच काम केलं. 

निल आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर गेल्यावर पहिलं संभाषण मोटोरोलाच्या रिसीव्हरमधूनच केलं होतं. १९७३ साली मोटोरोलाने जगातला पहिला मोबाईल फोन बनवला. हा फोन बनवला होता कंपनीचे सिनियर मॅनेजर मार्टिन कूपरने. पुढे मोटोरोला कंपनीने आपला टेलिव्हिजन बिझनेस जपानची कंपनी मात्सुशीताला विकला.

आता मोटोरोलाने फक्त फोन बनवण्यावर लक्ष केंद्रित केलं आणि १९८४ साली पहिला सेल फोन बनवला. पुढे मोटोरोलाने वेगवेगळे फोन आणले जे अगोदर बरेच लोकप्रिय झाले होते. जे मधीच मुडपले जायचे. बराच काळ मोटोरोला फोन बनवण्याच्या बाबतीत पहिल्या नंबरवर होती मात्र नोकियाने बाजारात एंट्री केली आणि हि कंपनी दुसऱ्या नंबरवर फेकली गेली. 

२००७ नंतर कंपनीला उतरती कळा लागली आणि पुढे हि कंपनी विभागली गेली. पुढे यातल्या एका विभागातून लेनोव्हाचा जन्म झाला आणि आता लेनोव्हा कंपनीच्या अंडर मोटोरोला फोन विकला जातो. तर अशा प्रकारे मोटोरोलाने एका भाडोत्री घरातून सुरवात केली होती. दोन भावांनी आपल्या युक्तीच्या जोरावर जगातलं अंतर कमी केलं आणि फोनचा शोध लावला.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.