राणी कमलापतींच्या नावानं जाहिरात करणारं MP सरकार त्यांच्या किल्ल्याकडे मात्र दुर्लक्ष करतंय
गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशच्या भोपाळमधलं नवीन हबीबगंज स्टेशन जरा जास्तचं चर्चित आलंय. यामागचं दोन महत्वाची कारण आहेत, एक म्हणजे या स्टेशनला आदिवासी वर्गातील गोंड समाजातील राणी कमलापती यांचं नाव देण्यात आलंय. आणि दुसरं म्हणजे या स्टेशनचं उदघाटन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
महत्वाचं म्हणजे आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्मदिवस ‘आदिवासी गौरव दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. याचंच औचित्य साधतं पंतप्रधान नरेंद्र मोदी या नवीन हबीबगंज स्टेशनचे उद्घाटन करणार आहेत. मुख्यमंत्री चौहान सुद्धा आदिवासी समुदायांच्या जाहीर सभेला संबोधित करतील आणि आदिवासींवर केंद्रित असलेल्या अनेक योजनांची घोषणा करतील.
या गोष्टींमुळे मध्य प्रदेश सरकार सध्या फॉममध्ये आहे. माध्यमाच्या हेडलाईन किंवा मेनपेजवर बातमी तर आहेच, पण याची भरभरून जाहिरात सुद्धा एमपी सरकार करतंय. सोशल मीडियावर तर बोलबालाच सुरु आहे.
पण, आधुनिकीकरणाच्या कवायतीत आता स्टेशनचं नाव बदलून राणी कमलापती यांच्या नावावर करण्यात आलं असलं तरी त्यांचा वारसा असलेली वस्तू आज मोडकळलेल्या अवस्थेत आहे. चकाचक स्टेशन तर उभं केलंय, पण सिहोर येथील त्यांचा किल्ल्याकडे साफ दुर्लक्ष केलं गेलंय. यात विशेष गोष्ट म्हणजे हा ऐतिहासिक किल्ला मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा जिल्हा सिहोर आणि बुधनी विधानसभेच्या अंतर्गत येतो.
सिहोर जिल्ह्यातील गिन्नौर गडातील राणी कमलापतीचा किल्ला अर्धावर्धा जमीनदोस्त आहे. शासनाच्या सगळ्याच विभागानं याकडे कानाडोळा केलाय, मग ते पर्यटन खाते असो, संस्कृती खाते असो की स्थानिक जिल्हा प्रशासन असो, आजपर्यंत या किल्ल्याची कोणीही काळजी घेतली नाही, त्याच्या नूतनीकरणाचा विचार तर केलाचं नाही.
सांगायचं झालं तर एकेकाळी विंध्य पर्वताच्या रांगेत टेकडीवर वसलेला हा किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलाय. पण अलीकडच्या काळात झालेल्या दुर्लक्षपणामुळे गडाची दिवसेंदिवस ढासळायला लागलाय. गडावर जाण्यासाठी पर्यटकांना खडबडीत रस्त्यावरून जावं लागतंय.
त्यात खनिज सापडतील म्ह्णून किल्ल्यात उत्खनन केल्यानं त्याचं मोठा नुकसान झालंय. गेल्या काही वर्षांपासून जनतेनेही ही मागणी लावून धरलीये कि, हा किल्ला दुरुस्त केला जावा. पण सरकार यावर आश्वासन देण्याशिवाय पुढचं पाऊलचं उचलायला तयार नाहीये.
दरम्यान, काही लोकांना आशा आहे कि, आता रेल्वे स्टेशनच नाव बदललंय म्हंटल्यावर सरकार या किल्ल्याचीही काळजी घेईल.
पण भिडू एक गोष्ट क्लियर करायची झाली तर आपला काय वाद नाही त्या स्टेशनवरून, पण जितका बक्कळ पैसा स्टेशनवर खर्च केलाय, त्यातचं थोडा पैसे बाजूला काढून किल्ल्याच्या नूतनीकरणावर केला असता तर किल्ल्याला सुद्धा महत्व मिळालं असत. आणि राणी कमलापतीचा सन्मान आणखी वाढला असता. सोबतच त्यातून सरकारला पर्यटनातून फायदा सुद्धा झाला असता.
हे ही वाच भिडू:
- प्राथमिक शाळेत शिकवणारा निसिथ प्रामाणिक मोदींच्या कॅबिनेट मधला सर्वात तरुण मंत्री बनलाय.
- नरेंद्र मोदींना नंबर वन ठरवणाऱ्या कंपनीबद्दल थोडं माहिती करून घेऊ भिडू
- गुजरात दंगली प्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चिट देणाऱ्या अहवालात सुप्रीम कोर्ट घालणार लक्ष