अस रोज रोज मरण्यापेक्षा कोरोनाने मरतो पण परिक्षा घ्या… 

अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले आणि राज्यात कोरोनाची लाट आली. या लाटेत पुन्हा कित्येक जणांची भविष्य वाहून जाण्याची चिन्हे निर्माण झालेली आहेत. झाल अस की राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज म्हणाले की, 

काही ठिकाणी कडक लॉकडाऊन करावा लागेल. येत्या एक दोन दिवसता आम्ही निर्णय घेणार आहोत. गरज वाटेल तिथे लॉकडाऊन करावा लागेल. 

यातच MPSC मार्फत घेण्यात येणारी राज्यसेवेची पुर्वपरिक्षा देखील पुढे ढकल्यात आल्याची माहिती जाहीर करण्यात आली आणि संतप्त विद्यार्थांच्या कडेलोट झाला. कारण काय तर यापुर्वी ३ वेळा राज्यसेवेची पूर्व परिक्षा पुढे ढकल्यात आली आहे.

यापूर्वी ११ ऑक्टोंबर २०२० रोजी होणारी पुर्वपरिक्षा पुढे ढकलून त्याची तारीख १४ मार्च २०२१ करण्यात आली होती.

परिक्षेच्या अगदी तीनच दिवसांवर राज्य शासनामार्फत असा निर्णय घेण्यात आल्यामुळे राज्यभरातील स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे विद्यार्थी नाराज झाले आणि त्यांनी आज पुण्यात तीव्र आंदोलन सुरु केले आहे. 

WhatsApp Image 2021 03 11 at 3.44.03 PM

पुण्यातील शास्त्री रोड येथे विद्यार्थांनी ठिय्या मांडलेला आहे. या ठिकाणी भेटून विद्यार्थांची मते जाणून घेण्यात आली. 

या ठिकाणी सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आलेले केतन पाटील म्हणाले, 

मी गेली चार वर्ष राज्यसेवेचा अभ्यास करत आहे. ही परिक्षा वास्तविक मागील वर्षी होणे नियोजित होतं. मात्र आजवर तीन वेळा पेपर पुढे ढकल्यात आले. दरवेळी आम्ही त्याच जिद्दीने अभ्यास करुन परिक्षा देण्याची स्वप्ने पहात आहोत.

पण अगदी परवा दिवशी परिक्षा आली असताना परिक्षा पुढे ढकल्यात आली आहे. कोणतिही पुर्वसूचना न देता अगदी तोंडावर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. यातून फक्त इतकच कळतय की सरकार कोणतही असो ते वारंवार स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांना गृहित धरतय.. 

दूसरीकडे इथे उपस्थित असणारी मिनाक्षी भोसले म्हणाल्या, 

अगोदरच मराठा आरक्षणाचा घोळ चालू आहे. दूसरीकडे शासन स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थांबाबतीत तितके सिरीयस नाही. कालच अधिवेशन समाप्त झाले आणि आज हा निर्णय घेण्यात आला. परिक्षा पुढेच ढकलायच्या होत्या तर त्याची पुर्वसुचना किमान एक महिन्यापुर्वी द्यायला हवी होती. पण तस झालं नाही.

कारण राजकारण. यांच्या प्रचारफेऱ्या, यांचे राजकीय रॅली, यामध्ये कुठेही कोरोना होत नाही. काही दिवसांपूर्वी राठोड यांनी जी गर्दी जमवली त्याची पुर्वकल्पना शासनाला होती पण तिथे कोणतिही दक्षता घेण्यात आली नाही. इथे मात्र खेळ लावला आहे. 

अशाच पद्धतीची प्रतिक्रिया शुभम कानडे यांने व्यक्त केली, तो म्हणतो… 

गेल्या वर्षी लॉकडाऊन लागल्यानंतर मी चार महिने घरी होतो. घरातून अभ्यास चालू होता. माझे वडिल हे हातगाडी चालवतात. त्यातून मला आठ हजार महिना अभ्यासासाठी घरातून दिले जातात. मी सप्टेंबर पासून पुण्यात थांबून तयारी करतोय.

परिक्षा दोन चार महिने पुढे ढकलल्यानंतर नेमका काय फरक पडतो हे तुम्हाला सांगून देखील समजणार नाही. आमची इच्छा फक्त येवढीच आहे. की परिक्षा घ्या. असं रोज रोज मरण्यापेक्षा कोरोनाने मरतो पण परिक्षा घ्या… 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.