‘मिस्टर परफेक्शनिस्ट’आमिर खानला फिल्मफेयर पुरस्काराने आठ वर्ष हुलकावणी दिली होती

हिंदी सिनेमा च्या दुनियेत ज्याला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखले जाते त्या आमिर खान यांनी आजवर अनेक पुरस्कारांवर आपली मोहर उमटवली आहे. पण गंमत म्हणजे फिल्मफेअर पुरस्कार, ‘ज्याला आपण भारताचे ऑस्कर म्हणतो’ त्या फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने मात्र आमिर खान एक-दोन नाही ही तर चक्क आठ वर्ष सलग हुलकावणी दिली होती!

तेंव्हा पासून आमिर चा पुरस्कार सोहळयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आणि तो या सोहळ्याला गैरहजर राहू लागला. नवव्या वर्षी मात्र त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्या आधीची सलग आठ वर्षे त्याला सर्वोत्कृष्ट अभिनयाचे केवळ नामांकन मिळत होते. त्यामुळे आमिर खान खूपच वैतागला होता.

सलग आठ वर्ष आमिरला फिल्मफेअरसाठी वाट पाहावी लागली होती

याची सुरुवात १९८८ सालच्या ३४ व्या फिल्मफेअर पुरस्काराच्या वेळी झाली. त्यावर्षी सर्वोत्कृष्ट अभिननेत्याच्या पुरस्कारासाठी तिघांना नामांकन मिळाले होते. यात ‘शहेनशहा’ या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांना, ‘तेजाब’ या चित्रपटासाठी अनिल कपूर यांना आणि ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटासाठी आमिर खान यांना हे नामांकन मिळाले .

पण पुरस्कार मात्र अनिल कपूरला ‘तेजाब’ करिता मिलाला. १९८९ सालच्या फिल्मफेअर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्या साठी ‘राख’ चित्रपटासाठी आमिर खान, ‘ईश्वर’ चित्रपटासाठी अनिल कपूर, ‘परिंदा’ या चित्रपटासाठी जॅकी श्रॉफ, ‘चांदनी’ या चित्रपटासाठी ऋषी कपूर आणि ‘मैने प्यार किया’ या चित्रपटासाठी सलमान खान यांना नामांकन मिळाले होते.

या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मात्र जॅकी श्रॉफ यांना त्यांच्या ‘परिंदा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी मिळाला. १९९० सालच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी नामांकन मिळालेले कलाकार पुढील होते, आमिर खान ‘दिल’ चित्रपटासाठी, अमिताभ बच्चन ‘अग्निपथ’ या चित्रपटासाठी, चिरंजीवी ‘प्रतिबंध’ या चित्रपटासाठी, सनी देओल यांना ‘घायल’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचे नामांकन मिळाले होते.

या वर्षीचा पुरस्कार देखील अमीर खानला हुलकावणी देत सनी देवल यांना त्यांच्या ‘घायल’ या चित्रपटातील भूमिकेसाठी मिळाला! १९९१ सालच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्या मध्ये अमिताभ बच्चन यांना ‘हम’ चित्रपटासाठी, अनिल कपूर यांना ‘लम्हे’, चित्रपटासाठी, दिलीप कुमार यांना ‘सौदागर’ या चित्रपटासाठी, संजय दत्त यांना ‘साजन’ या चित्रपटासाठी तर आमिर खान ला ‘दिल है के मानता नही’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.

यावर्षी ची फाईट खरोखरच खूप तगडी होती आणि ही फाईट जिंकली अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ‘हम’ या चित्रपटातील भूमिकेने.

१९९२ सालच्या फिल्मफेअर पुरस्कारांच्या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी, अमिताभ बच्चन ‘खुदा गवाह’ या सिनेमासाठी, अनिल कपूर ‘बेटा’ या चित्रपटासाठी, आमिर खान ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटासाठी नामांकित झालेले दिसतात. पण पुरस्कार पुन्हा एकदा आमिर यांना खो घालत मात्र अनिल कपूर यांना त्यांच्या ‘बेटा’ चित्रपटातील भूमिकेसाठी मिळाला.

१९९३ सालच्या फिल्म पुरस्कार सोहळ्यामध्ये आमिर खान यांना ‘हम है राही प्यार के’ या चित्रपटासाठी, गोविंदा यांना ‘आंखे’ या सिनेमासाठी, जॅकी श्रॉफ यांना ‘गर्दिश’ या चित्रपटासाठी, शाहरुख खान ला ‘बाजीगर’ या चित्रपटासाठी तर संजय दत्त यांना ‘खलनायक’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचे नामांकन मिळाले होते. हा पुरस्कार पटकावला शाहरुख खान यांनी ‘बाजीगर’ या चित्रपटासाठी!

१९९४ साली ४० व्या फिल्मफेअर पुरस्कार प्रदान समारंभात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे नामांकन आमिर खान यांना ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटासाठी, अक्षय कुमार यांना ‘ये दिल्लगी’ या चित्रपटासाठी, अनिल कपूर यांना ‘१९४२ ए लव स्टोरी’ या सिनेमासाठी, नाना पाटेकर यांना ‘क्रांतिवीर’ या सिनेमासाठी तर शाहरुख खान यांना ‘कभी हां कभी ना’ या चित्रपटासाठी मिळाले होते.

पुरस्कार पटकावला नाना पाटेकर यांनी ‘क्रांतिवीर’ या चित्रपटातील भूमिकेसाठी! म्हणजे आमिर खान ला या वर्षी देखील पुरस्कारापासून वंचित राहावे.

१९९५ च्या ४१ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे नामांकन होते आमिर खान यांना ‘रंगीला’ या चित्रपटासाठी, अजय देवगन यांना ‘नाजायज’ या चित्रपटासाठी, गोविंदा यांना ‘कुली नंबर १’ या चित्रपटासाठी, सलमान खान यांना ‘करण अर्जुन’ या चित्रपटासाठी तर शाहरुख खान यांना ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या सिनेमासाठी.

या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार शाहरुख खान यांना ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटासाठी मिळविला. या वर्षी ‘रंगीला’ करीता आपल्याला नक्की पुरस्कार मिळेल असे आमिरला वाटत होते. त्यातील त्याने साकारलेली टप्पोरी मुन्नाची भूमिका त्याच्या साठी खास होती.  इथे देखील त्याला पुरस्कारा पासून वंचित राहावे लागले. याचे त्याला खूप वाईट वाटले. आणि त्याचा पुरस्काराकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला. हे सर्व पुरस्कार म्हणजे ‘जुगाड’ असतो असे त्याचे मत बनले.

सलग आठ वर्ष सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्कारापासून वंचित राहिलेल्या आमिर खान यांना १९९६ साली झालेल्या ४२ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला! त्यावेळी नामांकन मिळालेले कलाकार होते नाना पाटेकर यांना ‘अग्निसाक्षी’ या चित्रपटासाठी सनी देओल यांना ‘घातक’ या चित्रपटासाठी तर आमिर खान यांना ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटात साठी.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आमिर खान यांनी ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटासाठी मिळविला आणि सलग आठ वर्षे हुलकावणी देणाऱ्या या पुरस्काराला अखेर आमिरला मिळाला.

-भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.