मुंगूस बॅट वापरायची नाही म्हणून धोनीने हेडनला आमिष दाखवलं होतं…..

क्रिकेटमध्ये काही ना काही वेगळं आणण्याचा एखादा खेळाडू प्रयत्न करत असतो. हेअरस्टाईल असो किंवा नाचायची स्टाईल असो अशा सगळ्या धमाल गोष्टी ट्रेंडमध्ये येत असतात. बॅट आणि बॉलचा हा खेळ लोकांच्या अगदी जिव्हाळ्याचा झाला आहे. त्यातही आयपीएल म्हणजे पर्वणीच. देशी आणि परदेशी खेळाडूंचं कॉम्बिनेशन असलेला हा खेळ भयंकर लोकप्रिय झाला. आजचा किस्सा आयपीएलमधलाच ज्यात धोनीने हेडनला आमिष दाखवलं होतं.

जेव्हा नवीनच आयपीएल सुरु झालं होतं आणि अनेक नवीन टीम्स आल्या होत्या. त्यात एक टीम होती चेन्नई सुपर किंग्ज. चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन हे एकाच संघात खेळत होते. मॅथ्यू हेडन त्यावेळी सगळ्यात आक्रमक बॅट्समन म्हणून ओळखला जायचा. आल्या आल्या बॉलिंगला झोडपण्याचं काम मॅथ्यू हेडन करायचा. 

मॅथ्यू हेडन चौकार षटकारांचा पाऊस पाडायचा ते त्याच्या मुंगूस बॅटमधून. २०११-१२ च्या सुमारास हि मुंगूस बॅट हेडनची दहशत दाखवायला पुरेशी होती. मुंगूस बॅटची विशेषता हि होती कि बॅटचा दांडा मोठा असायचा आणि पल्ला हा एकदम बारीक असायचा.

हॅन्डल लांब असल्याने बॉल एकदा का बॅटवर बसला कि तो थेट चौकार किंवा षटकार असायचा. इतकी आकर्षक आणि धडकी भरवणारी हि मुंगूस बॅट हेडनने आणली होती.

चेन्नई सुपरकिंग्जच्या एका व्हिडिओमध्ये मॅथ्यू हेडनने हा किस्सा सांगितला होता. ज्यावेळी मॅथ्यू हेडन बॅटिंगला जायचा तेव्हा महेंद्रसिंग धोनी हा मुंगूस बॅटच्या विरोधात होता. धोनी हेडनला मुंगूस बॅट वापरायला विरोध करायचा. हेडनला धोनी म्हणाला होता कि ,

तुला ज्या गोष्टी हव्या त्या सगळ्या गोष्टी मी देईन पण हि बॅट तू वापरायची नाहीस, आणि काहीही झालं तरी या बॅटने तू खेळायचं नाहीस.

पण मॅथ्यू हेडनने धोनीला सांगितलं होतं कि,

तो या बॅटने गेली २ वर्ष प्रॅक्टिस करतो आहे. हेडनने धोनीला विश्वास दाखवला कि या बॅटच्या साहाय्याने स्ट्राईक बदलायला जास्त अडचण येत नाही. आणि ज्यावेळी बॉल बॅटच्या एकदम मधोमध बसतो तेव्हा तो २० मीटर लांब सहजरित्या जातो.

मॅथ्यू हेडन म्हणतो कि मी आपल्या मुंगूस बॅटमुळे संघाला धोक्यात आणू इच्छित नव्हतो शिवाय या बॅटमुळे मला भरपूर फायदा झाला होता आणि या बॅटने खेळल्याने माझा चांगला होमवर्क झाला होता. धोनीने सांगितल्यानंतरही अमिश दाखवल्या नंतरही मी त्याच बॅटने खेळत होतो. या बॅटमुळे मला माझा खेळ एन्जॉय करता आला. आणि मुंगूस बॅटने मला एक आक्रमक बॅट्समन म्हणून वेगळी ओळख मिळवून दिली. 

धोनी आणि हेडन यांची बॅटिंग सुद्धा खतरनाक होती. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने २०१० आणि २०११, २०१८ चं आयपीएल जेतेपद पटकावलं होतं. चेन्नईकडून खेळताना मॅथ्यू हेडन हा बराच काळ ऑरेंज कॅप होल्डर होता.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.