मुकेशच्या जाहिरातीवर हसणं सोप्पय पण त्याची खरी कहाणी खरंच दर्दभरी आहे…

मेरा नाम मुकेश है, मैने सिर्फ १ साल गुटखा चबाया और मुझे कॅन्सर हो गया…तंबाकू जानलेवा है… आज ही छोड़ें…भारतात सिनेमा सुरु होण्याच्या अगोदर हि जाहिरात कम्पल्सरी दाखवली जाते. नो स्मोकिंगच्या अंतर्गत हि जाहिरात सगळीकडे फिरवली जाते.

जेव्हा जेव्हा हि जाहिरात सुरु होते तेव्हा तेव्हा अनेक जणांचा चेहराच आंबट होतो कि हे काय लावलंय.

हि जाहिरात खरतर त्या लोकांना जास्त इरिटेटिंग वाटते जे व्यसनं करत नाही. पण हि जाहिरात नागरिकांना, व्यसन करणाऱ्या लोकांना जागृत करण्याच्या हेतूने बनवली होती. या जाहिरातीमध्ये कॅन्सर पीडित असलेल्या मुकेशची गोष्ट दाखवण्यात आलेली आहे.

मुकेशला तंबाखूचं जास्त सेवन केल्यामुळे कॅन्सर झाला होता. हि जाहिरात कुठलाच भारतीय विसरू शकत नाही. अनेक लोकं मुकेशच्या या जाहिरातीची मजा घेतात, काहीजण मीम बनवतात, टिंगल करतात पण मुकेशच्या खऱ्या आयुष्यात त्याला आलेलं वाईट मरण सगळ्यांनाच हादरवून टाकणारं होतं. 

तंबाखूच्या या जाहिरातीत दिसणारा युवक हा कोणी ऍक्टर नव्हता तर महाराष्ट्राच्या भुसावळमधला तरुण मुकेश होता. मुकेशचं पूर्ण नाव मुकेश हराने. एका साध्या गरीब कुटुंबातून येणाऱ्या मुकेशला वाईट संगत लाभली आणि त्याला व्यसनांची सवय जडली. याच सवयीने मुकेशचा जीव घेतला. आईवडील कामगार होते त्यामुळे उत्पन्नाचं साधन म्हणून फक्त मुकेशकडे बघितलं जायचं.

२००९ साली तंबाखूच्या आणि व्यसनांच्या विरुद्ध एक जाहिरात शूट होणार होती. त्याच वेळी मुकेशला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेलं होतं. तेव्हा मुकेशच्या परिवाराची परवानगी घेऊन या जाहिरातीसाठी शूट करण्याची परवानगी घेण्यात आली. जेव्हा मुकेशला या जाहिरातीची विचारणा करण्यात आली तेव्हा मुकेशकडे अगदीच थोडेफार शब्द बोलायला उरलेले होते. 

व्हिडिओमध्ये मुकेश म्हणतो कि मेरा नाम मुकेश है. मैंने सिर्फ़ १ साल गुटखा चबाया और मुझे कैंसर हो गया. मेरा ऑपरेशन हुआ है. शायद में इसके आगे बोल नहीं सकूंगा .हे मुकेशचे शेवटचे शब्द होते.

२७ ऑक्टोबर २००९ रोजी मुकेशने कॅन्सरच्या आजाराने जीव गमावला तेही वयाच्या २४ व्या वर्षी. यावेळी सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं कि १ वर्षात कॅन्सर होऊन माणूस मरु कसा शकतो. व्यसन केल्याने एका वर्षातच मुकेश मरण पावला होता.

मुकेशच्या आजारपणाबद्दल आणि मरणाबद्दल अनेकी गैरसमज झालेले होते. २०१७ साली मुकेशच्या भावाने रेडिओ स्टेशन रेड एफएमला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं कि मुकेशला कॅन्सर नव्हता तर फूड पाईपचं इन्फेक्शन झालेलं होतं. मुकेशला ताप आला म्हणून आम्ही त्याला भरती केलं होतं. आमच्याकडे कागदपत्रं आहेत कि मुकेशला कॅन्सर झालेला नव्हता. जाहिरात शूट झाल्यावर आम्हला त्यांनी एक रुपयासुद्धा दिला नव्हता.

या आरोपच खंडन करण्यासाठी जेव्हा रेडिओने डॉक्टर चतुर्वेदी सोबत बोलणं केलं तेव्हा त्यांनी सांगितलं कि मुकेशला कॅन्सर झालेला होता, आमच्याकडे मेडिकल डॉक्युमेंट आहेत. २०१२ साली भारतातल्या सगळ्याच थेटरांमध्ये नेशनल ऑर्गेनाइजेशन फॉर टोबैको इरडिकेशन (नोट) तर्फे मुकेश आणि स्पंजची जाहिरात लावण्यात आली. आणि या दोन जाहिराती कंपल्सरी केल्या २०१३ पर्यंत हे प्रकरण चाललं. आजही बऱ्याच सिनेमांच्या सुरवातीला हिरोच्या आधी मुकेशची जाहिरात दाखवली जाते. 

WHO च्या मते जगभरात दरवर्षी ६० लाख लोकं हे व्यसन केल्याने मरतात पैकी याची संख्या भारतात जास्त आहे. आजही मुकेशच्या जाहिराती दिसल्यावर थोडावेळ का होईना माणूस घाबरतो. पण टिंगलीचा विषय बनलेला मुकेश व्यसनाने गेला याच भान व्यसन करणाऱ्या लोकांना येईल का इथंच खरी मेख आहे.

तब्येती बनवा, सकाळचे मित्र वाढवा, संध्याकाळचे मित्र कमी करा म्हणजे व्यसनाचा नाद लागणार नाही.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.