स्वत:च्याच मृत्यूची घोषणा ते हुकलेलं पंतप्रधानपद…मुलायम सिंह यांचे ५ किस्से
देशाच्या सर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदापासून ते केंद्रीय मंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंतचा प्रवास करणारे. समाजवादी पक्षाचे कर्ताधर्ता नेताजी मुलायमसिंह यादव यांचं वयाच्या ८२ व्या वर्षी आज पहाटे निधन झालं. श्वास घेण्यास त्रास, रक्तदाब कमी झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार चालू होते पण याचदरम्यान त्यांचं निधन झालं.
८ वेळा आमदार, ७ वेळा खासदार.. विधान परिषद आणि विधानसभेचं विरोधी पक्ष नेते पद, उत्तर प्रदेशचे ३ वेळा मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्रीपद. अशी ५५ वर्षांची झंझावती राजकीय कारकीर्द असलेला राजकारण कोळून प्यायलेला माणूस. या ५५ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत असं अनेक प्रसंग घडले ज्याचा सामना त्यांनी तितक्याच धीराने केलेला, स्वत:च्याच मृत्यूची घोषणा करण्याचे आदेश देणारा नेता..याच नेत्याबद्दलच्या काही महत्वाच्या आठवणींना उजाळा देऊया…