ओमरच्या मुलापेक्षा या मुल्लाला अफगाणिस्तानचा नवा मुखिया बनवलं जातंय..

एक- एक करत अफगाणिस्तानातच्या सगळ्या प्रांतांवर कब्जा केल्यानंतर तालिबान्यांनी काबूलमध्ये दंगा घालायला सुरुवात केली. तालिबानी काबूलच्या सीमेवर पोहोचणारचं तोवर अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देशातून पळ काढत थेट अमेरिका गाठलं. त्यानंतर जवळपास सगळ्याचं बड्या नेत्यांनी काबूलवरून मिळेल त्या विमानानं आपलं बस्तान दुसऱ्या देशांत हलवलं.  ज्यामुळे तिथलं सरकार पडलं आणि अफगाणिस्तानात तालिबान्यांनी वर्चस्व मिळवलं.

त्यांनतर तालिबान्यांनी आज आपल्या इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान या नव्या सरकारची घोषणा केलीये. ज्यात तालिबान्यांचा प्रमुख मुल्ला बरादर या नव्या सरकारचा मुखिया असणार आहे.

काबुलच्या राष्ट्रपती भवनात सजावट सुरू आहे, नवीन झेंडे तयार केले जात जातायेत. मुल्ला बरादरच्या नेतृत्वातल्या या सरकारमध्ये तालिबानचा दिवंगत संस्थापक मुल्ला उमर यांचा मुलगा मुल्ला मोहम्मद याकूब आणि शेर मोहम्मद अब्बास स्तानिकजई सरकारमधल्या वरिष्ठ पदांवर राहतील. तर तालिबानचा सर्वात मोठा धार्मिक नेता मुल्ला हैबतहुल्ला अखुंदजादाला अफगाणिस्तानचा सर्वोच्च नेता बनवलं जाईल.

तालिबानचा दुसरा मोठा नेता

तर १९९४ साली तालिबानी संघटनेची स्थापना झाली. ज्या चार लोकांनी ही संघटना स्थापन केली त्यातलचं एक नाव म्हणजे मुल्ला अब्दुल गनी बरादर. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची स्थापना झाली. तेव्हा त्याचा प्रमुख होता प्रमुख मुल्ला मोहम्मद ओमर.

असे म्हटले जाते की, बरादरची बहीण ही मुल्ला ओमरची बायको. ९०च्या दशकातील कुख्यात तालिबान राजवटीतील ते दुसरे प्रमुख नेते होते. जिल्हा आणि प्रांतीय राजधानींवर विजय मिळवण्यासाठी बरादर हे प्रमुख जबाबदार मानले जातात.

१९९६ मध्येही जेव्हा तालिबान्यांनी अफगाणिस्तान आपल्या कंट्रोल मध्ये घेतलं होतं. त्यावेळी मुल्‍ला बरादर देशाचे रक्षामंत्री बनले होते. २००१ पर्यंत त्यानं आपलं मंत्रिपद सांभाळलं होत.

९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला आणि तत्कालीन तालिबान सरकारला सत्तेवरून काढून टाकले. यानंतर मुल्ला बरादरने अफगाणिस्तानात अमेरिकन सैन्याविरुद्ध कारवाया सुरू केल्या. त्यावेळी बरदारच्या नेतृत्वाखाली बंडखोरीच्या बातम्या झळकू लागल्या. अमेरिकी सैन्यानं त्याला शोधायला अख्ख्य अफगाणिस्तान पालथं घातलं, पण त्यानं पाकिस्तानला पळ काढला.  

२०१० मध्ये पाकिस्तान सरकारनं बरादरला कराचीतून अटक केली होती.  पाकिस्तानला गुप्त ठेवल्याशिवाय अफगाणिस्तान सरकारशी बोलण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पाकिस्ताननं त्याला तुरुंगात टाकले होते. त्यांनतर अमेरिकेच्या विनंतीनुसार त्याला २०१८ मध्ये सोडण्यात आलं होतं.

सध्या, बरादर हा तालिबानचा राजकीय प्रमुख आणि गटाचा सार्वजनिक चेहरा आहे. बरादर १९८०च्या दशकात सोव्हिएत सैन्याविरुद्ध अफगाण मुजाहिदीनसोबत लढला. १९९२ मध्ये रशिया बाहेर पडल्यानंतर प्रतिस्पर्धी सरदारांमध्ये गृहयुद्ध भडकले.

त्या वेळी बरदारने त्याचा माजी कमांडर आणि नातेवाईक मोहम्मद ओमर याच्यासोबत कंधारमध्ये मदरसा स्थापन केला होता. असं म्हंटल जात कि, इथेच नवीन तालिबानी तयार केले गेले.

त्याचबरोबर हैबतुल्लाह अखुंदजादाला देशाचे सर्वोच्च नेते बनवले जाईल. तो असा दहशतवादी आहे, ज्याला त्याच्या स्वतःच्या संस्थेमधले फार कमी लोक पाहू शकतात. तालिबानच्या अनेक बड्या नेत्यांना त्याचा ठावठिकाणाही माहित नाही. तो दैनंदिन जीवनात काय करत आहे हे तालिबान्यांनासुद्धा  माहीत नाही. मात्र, कोणत्याही  इस्लामिक सणा-सुदीला तो व्हिडिओ संदेशांद्वारे दहशतवाद्यांना संदेश पाठवतो.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.