पवार-शेलार-नार्वेकर युती झाली, असं मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये नेमकं काय आहे.. ?

क्रिकेटमध्ये एक वाक्य बोललं जातं, ‘It’s not over until it’s over.’ थोडक्यात काय तर जोवर शेवटचा बॉल पडत नाही, तोवर काहीही होऊ शकतं. क्रिकेट सोडून हे वाक्य कुठं परफेक्ट फिट बसत असेल, तर ते म्हणजे राजकारण.

त्यात गेल्या काही महिन्यातलं महाराष्ट्राचं राजकारण बघितलं असेल, तर क्रिकेटपेक्षा खतरनाक गेम तर इकडं फिरलेत. एकमेकांचे विरोधक असलेले मित्र झाले आणि मित्र असलेले विरोधक. आरोप आणि टीकांचं धनुष्य हातात घेणारे हात बदलले, पण बाण मात्र सुटत राहिले.

ही एवढी बॅकग्राऊंड सांगण्याचं कारण मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत एक खतरनाक युती झाली, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची.

त्यात या दोघांच्या गटात असलेली इतर नावं आहेत, उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिंदे गटातले आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक. हे एवढे नेते बाकीचे विरोध विसरुन एका गटात एकत्र यावेत असं नेमकं मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये आहे तरी काय ?

राजकारण्यांना मुंबई क्रिकेट असोसिशन एवढं महत्त्वाचं का वाटतं, हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडीओ शेवट्पर्यंत पहा.

Leave A Reply

Your email address will not be published.