मुंबई महानगरपालिकेच्या बँकेतल्या FD च ९२ हजार कोटींच्या आहेत.

नरेंद्र मोदी सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. आजच मुंबई मेट्रोच्या मार्गाचंआणि इतर महत्वाच्या विकसकामांच उदघाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. मात्र नरेंद्र मोदी यांचा हा दौरा मुंबई महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून होता. ज्याची प्रचिती बीकेसीत नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात देखील आला.

आपल्या भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले मुंबईच्या विकासामध्ये मुंबई महानगरपालिकेचे मोठे महत्व आहे.

मुंबईकरांचा एक ना एक पैसा मुंबईच्या नागरिकांसाठी खर्च झाला पाहिजे. मुंबईच्या विकासासाठी बजेटची कमी नाहीये. फक्त तो पैसा विकासाठी खर्च व्हायला पाहिजे. त्या पैशाचा भ्रष्टाचार व्हायला नको. तो बँकेत पडून राहायला नको .

नरेंद्र मोदी ज्या पैश्यांबद्दल बोलत आहेत तो मुंबई महानगरपालिकेचा पैसा आहे आणि स्पेसिफिकली बँकेतल्या पैशाच्या उल्लेख झाला आहे तो मुंबई महानगरपालिकेच्च्या हजारो कोटींच्या FD चा आहे. आणि जर मुंबई महानगरपालिकेच्या FD चे आकडे जरी ऐकले तरी तुम्हाला FD चा मुद्दा का ट्रेंडिग ला येत आहे याची आयडिया येइल. तर  BMC कडे 2022 च्या मार्च महिन्यात ९२ हजार कोटी रुपयांचं फिक्स डिपोझिट होतं.

२०२१-२२ या वर्षात मुंबई महानगरपालिकेच्या FD  78,000 कोटी रुपयांवरून 92,000 कोटी रुपयांपर्यंत वाढल्या होत्या. आधीच्या तीन वर्षांत या FD ची ग्रोथ कॉन्स्टन्ट होती. 

बृहन्मुंबई महापालिकेकडे 10 वर्षांपूर्वी 2011-12 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस 26,876 कोटी रुपये एफडीमध्ये होते. एफडीमध्ये त्यानंतर सहा वर्षात 72,000 कोटी रुपयांची वाढ झाली म्हणजेच सहा पटींनी मुंबईच्या FD मध्ये वाढ झाली.

फक्त २०२०-२१ या वर्षातच मुबई महानगरपालिकेच्या FD मध्ये वाढ झाली नव्हती. करोना महामारीमुळे पहिल्यांदाच यामध्ये घट झाली होती. मात्र २०२१-२२ या वर्षात पुन्हा त्यामध्ये वाढ झाली.

मुंबई महानगरपालिकेच्या FDची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे

मार्च 2018: 72,000 कोटी
मार्च 2019:  76,579कोटी
मार्च 2020:  79,116कोटी
मार्च 2021:  78745कोटी
जानेवारी 2022: 92636 कोटी

महत्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या एकूण बजेटपेक्षा FD ची रक्कम बरीच मोठी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचं २०२०-२१ या वर्षीचं बजेट होतं ३९ हजार ३८ कोटी रुपयांचं. त्यांनंतर २०२१-२२चं बजेट झालं आहे ४५ हजार कोटी रुपयांचं. ज्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका ही आपल्या देशातील सर्वाधिक श्रीमंत महानगरपालिका आहे.BMC चं मागच्या वर्षीचं बजेट हे त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम आणि गोवा या राज्यांच्या एकूण बजेटपेक्षा जास्त होतं.

मात्र आता या FD च्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

कारण महानगरपालिका ही FD मध्ये सेविंग्स वाढवण्याची नसते. जनतेच्या पैशांचा उपयोग हा लोक कल्याणकारी योजनांसाठी होणं अपेक्षित असतं. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत अनेक विकासाची कामं होणं अपेक्षित असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात बँकेत रक्कम पडून राहणं किती योग्य आहे असे प्रश्न आता विचारलॆ जाऊ लागले आहेत.

त्यामुळे मोदींनी देखील या मुद्याला हात घातल्याचं बोललं जातं. येत्या निवडणुकीत या प्रचाराचा मुद्दा देखील होऊ शकतो अशी शक्यता देखील आहे. आणि त्याला २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेला उत्तर द्यावं लागणार एवढं नक्की.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.