मनी हाईस्टमुळं चर्चेत आलेल्या मुंबई पोलिस बँड पथकाचा इतिहास खूप मोठ्ठाय !

आपण कालपासून जेव्हा- जेव्हा सोशल मीडिया उघडतोयं तेव्हा-तेव्हा  एक व्हिडिओ समोर येतोयंच, तो व्हिडिओ आहे मुंबई पोलिसांच्या बँड पथकाचा. जो प्रत्येकजण रिपीट -रिपीट करून पाहतोय. जर तुम्ही अजून हा व्हिडिओ पहिला नसेल तर एकदा पाहाच..

एकदम भारी वाटतंय ना. आता मुंबई पोलिसांच्या या बँड पथकानं सादर केलेली म्युझिक अनेकांच्या ओळखीची सुद्धा असेल. होय,हि म्युझिक आहे वर्ल्ड फेमस स्पॅनिश वेब सिरीज ‘मनी हाईस्ट’ची. जिची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून होतेय. 

तर मुंबई पोलिसांच्या ‘खाकी स्टुडिओनं’ काल ३ सप्टेंबरला हा व्हिडिओ आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवरून शेअर केला होता. ज्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालायं.

एवढंच नाही,  याआधीही या खाकी स्टुडिओचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. ज्यात जेम्स बॉण्ड, जय हो अश्या कित्येक म्युझिकचं त्यांनी अफलातून सादरीकरण केलंय. आता या मुंबई पोलिसांच्या बँड पथकाचे व्हिडिओ जसे इंट्रेस्टिंग असतात, तसाच या बँडचा इतिहास सुद्धा इंट्रेस्टिंग आहे.

तर १९३५ चं ते साल. ब्रिटिश सगळ्या जगभरात जिथं- जिथं आपलं साम्राज्य आहे तिथं- तिथं हे वर्ष ′रजत जयंती वर्ष′ म्हणुन साजरं करीत होतं. आता भारतामध्येही ब्रिटिश साम्राज्य होत, त्यामुळे इथेही या रजत जयंती वर्षाच्या निमित्ताने ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.

नायगांव पोलीस कवायत मैदानावर देखील ३ डिसेंबर १९३५ रोजी या कार्यक्रमा निमित्तानं एका शानदार परेडचं आयोजन केलं गेलं. नेहमीच्या प्रथेप्रमाणे सर्व प्रतिष्ठितांना आणि जनतेला निमंत्रित करण्यात आलं. गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांनी मानवंदना स्वीकारली. मुंबई पोलीसांच्या उत्कृष्ठ परेडने सर्वांची मनं जिंकली.

पण एक बाब मात्र सगळ्यांनाच खटकत होती, ती म्हणजे या परेडसाठी मुंबई पोलीसांचे स्वतःचे बँड अस्तित्वात नव्हते.

नायगांव पोलीस मुख्यालयाची शास्त्रोक्त पद्धतीनं म्हणजेच अभियांत्रिकी दृष्टीने केलेली रचना, आदर्शवत समजले जाणारे मैदान, आकर्षक असणारी पोलीस परेड  या सगळ्या गोष्टी उत्कृष्ठ असल्या तरी, जोपर्यंत या पोलीस दलाकडे बँड पथक उपलब्ध होत नाही, तोपर्यंत परेड परिपुर्णता झाल्याचे समाधान नाही, असा एक विचार तिथल्या उपस्थित प्रतिष्ठित मान्यवरांकडे चर्चेला आला.

सरकारच्या काटकसरी आर्थिक धोरणामुळे पोलीस बँड पथकावर एवढा खर्च करणं, सध्यातरी शक्य नव्हते. पण बँडची ही  कमतरता दूर करण्यासाठी अनेक प्रतिष्ठित दानशूर व्यक्ती पुढे आल्या आणि पुढच्याचं डिसेंबर मध्ये होणाऱ्या वार्षिक पोलीस कवायतीच्या वेळी पोलीसांना बँडचं साहित्य उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला गेला.

प्रतिष्ठित आणि व्यावसायिक दानशुरांप्रमाणं  सर्व सामान्य नागरिकांनी देखील आपापल्या ऐपतीनुसार पै-पैसा गोळा करून निधी जमा केला. त्यातून ब्रास बँडचे साहित्य खरेदी करण्यात आले. आणि अशा प्रकारे १९३६ च्या सुरवातीच्या मुंबई शहर पोलीस दलाला पहिल्यांदा ब्रास बॅण्ड पथक उपलब्ध झालं.

त्यांनतर, भारताचे नवनिर्वाचित व्हाइसरॉय लॉर्ड लिनलियागो यांचं भारतात मुंबईत पहिल्यांदाचं आगमन होणार होत, या निमित्ताने त्यांच्या स्वागतासाठी  १७ एप्रिल १९३६ रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे एक पारंपरिक समारंभाचे एक विशेष आयोजन करण्यात आलं होतं.

याचं कार्यक्रमात शानदार परेडमध्ये मिलिटरी बँड सोबत मुंबई पोलीसांच्या बँड पथकाचे शानदारपणे पदार्पण करण्यात आलं. त्यावेळी या मुंबई पोलीस बँड पथकाचे प्रमुख बँडमास्टर सी.आर.गार्डनर यांनी हीच संधी आहे असे म्हणतं जबरदस्त सादरीकरण केलं. आपल्या या सादरीकरणानं उपस्थितांसोबत व्हाइसरॉय लॉर्ड लिनलियागोचं मन जिंकण्यात पोलिसांच्या बंद पथकाला यश आलं. 

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.