पुण्यात आयटी इंजिनियर असणारा निलेश दर रविवारी मुंबईत टॅक्सी चालवतो..

अस्सल मराठी माणूस जरी असला तरीही मुंबईत गेल्यावर काळ्या पिवळ्या टॅक्सी वाल्यांसोबत हिंदीच बोलणार. आपण ठरवलेलंच असतं तो हिंदीच असणार. ते बरोबरचं आहे. तसं पाहायला गेलात तर टॅक्सी चालविणारे सर्वाधिक उत्तर भारतातील सार्वधिक लोक असतात.

तुम्ही बाजूला बसला असतांना टॅक्सी ड्रायव्हर फोन आला आणि तो जर फाडफाड इंग्लिश बोलत असेल तर आपल्याला प्रश्न पडतो.

अरे एवढं चांगलं इंग्लिश बोलता येत असतांना हा का टॅक्सी चालवतोय असा प्रश्न पडतो. 

थोड्या वेळात तुमच्यात आणि त्यांच्यात संभाषण झाल्यानंतर कळत की, तो ड्रायव्हर आयटी इंजिनियर आहे आणि त्यातल्या त्यात मराठी माणूस. मग वाटतं की, इतर इंजिनियर प्रमाणे यांना नोकरी नसल्याने हे टॅक्सी चालवत असतील. मात्र त्यामागचं खरं कारण दुसरंच आहे. 

तर मुंबईत टॅक्सी चालवणाऱ्या आयटी इंजिनियरचं नाव आहे निलेश अर्टे. ते पुण्यातील चांगल्या आयटी कंपनीत नोकरीला आहेत. ते फक्त रविवारीच मुंबईत टॅक्सी चालवतात. 

निलेश यांचं बालपण मुंबईतच गेलं. ते लहान असताना वडिलांसोबत दर शनिवारी, रविवारी मुंबईत फिरायला जायचे. दादर, माउंट मेरी, महालक्ष्मी सारख्या ठिकाणी त्यांचे वडील टॅक्सीने फिरायला घेऊन जात. त्यामुळे निलेश यांना टॅक्सी आणि त्यांच्या ड्रायव्हर बद्दल एक वेगळीच आवड होती. 

मुंबईतल्या सगळ्यानांच काळ्या पिवळ्या टॅक्सी बदल वेगळंच आकर्षण असतं. लहानपणापासून लोकल आणि टॅक्सीशी संबंध आलेला असतो, निलेश यांचं पण सेम तसंच होतं.  

टॅक्सी चालकांना येणारा अनुभव त्यांना जवळून पाहायचा होता.

टॅक्सी ड्रायव्हरला नेमके कुठले प्रॉब्लेम फेस करावे लागतात. सामाजिक मागासलेलापणा असणाऱ्यांकडे लोक असे पाहतात. टॅक्सी ड्रायव्हरचा शर्ट घालून गेल्यावर त्यांच्याकडे कसे पाहतात. कधी कधी तर टॅक्सी ड्रॉयव्हर सोबत गैरवतन करतात. 

हे सगळं अनुभवायचं होत त्यामुळे त्यांनी मुंबईत सुट्टी दरम्यान टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेतला. 

निलेश म्हणतात की, ‘मुंबईतलं वातावरण एकदम फ्री आहे. सगळे प्रोफेशनल आहेत. इथं वर्क कल्चरला फार महत्व दिलं जातं आणि त्याचा आदर सुद्धा केला जातो. मी टॅक्सी ड्रायव्हर्सच्याच क्लासमधून येत असल्याने त्यांना येणारे सगळे प्रॉब्लेम फेस केले आहेत. आता त्याबद्दल तक्रार पण नाही.’ 

एखादा ड्रेस त्या व्यक्ती बद्दलचं मत कसं बदलवत असतो, याचं उदाहरण म्हणून हॉटेलमधले अनुभव निलेश यांनी सांगितले. ते म्हणतात की, मुंबईत सगळीकडेच टॉयलेट नाहीत. त्यामुळे काही वेळा रेस्टोरंट, हॉटेल मधील टॉयलेट वापरावे लागतात. साधे कपडे घालून गेल्यावर हॉटेल, रेस्टोरंटमध्ये टॉयलेट वापरल्यावर कोणीही प्रश्न विचारत नाही. थेट एंट्री दिली जाते. 

मात्र, तेच टॅक्सी ड्रायव्हरचा ड्रेस घालून हॉटेलमध्ये टॉयलेट वापरायला गेले तर त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. कधी कधी तर प्रवेश नाकारला जात असल्याचा अनुभव निलेश यांना आला आहे. 

इतर ५ दिवस आयटी कंपनीत जॉब आणि रविवारी टॅक्सी चालविण्याचे काम निलेश अर्टे करतात.  सरकारी, खासगी कार्यालयांना सुट्टी असल्याने जास्त प्रवासी नसतात. टॅक्सी चालवून रविवारी त्यांना  ५०० रुपये मिळत असल्याचे निलेश सांगतात. 

त्यांना याचबरोबर ज्या भागात लहानाचं मोठं झालो तिथला अनुभव परत घेता आला आहे. टॅक्सी ड्रायव्हर्सना कुठल्या कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, लोक कुठल्या नजरेने त्यांच्याकडे पाहतात याचा सगळा अनुभव निलेश यांना टॅक्सी चालवत असताना मिळाला आहे. निलेश हा प्रयोग ३० रविवार करणार आहेत. त्यांनी टॅक्सी ड्रायव्हरचा प्रयोग करण्यापूर्वी टॅक्सी चालवणाऱ्यांचे प्रश्न जवळून पहिले होते.

निलेश अर्टे म्हणतात की, 

टॅक्सी ड्रायव्हर दिवसाला साधारण १४ ते १६ तास काम करत असतात. टॅक्सी ही मुंबईचा भाग आहे. तिला मुंबई पासून वेगळं करता येणार नाही. 

हे ही वाच भिडू 

   

Leave A Reply

Your email address will not be published.