मुंबईची दहा सर्वात श्रीमंत माणसं, यात एकही मराठी माणूस नाही

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या राज्यात गोंधळ सुरु आहे. फक्त राजकीय नेतेच नाही तर सामान्य मराठी जनतेच्या भावना देखील दुखावल्या गेल्याचं दिसतंय. ट्विटरवर अनेक युझर्स राज्यपालांना ट्रोल करत असल्याचं बघायला मिळतंय.

#GovernorGoBack असं हॅशटॅग ट्रेंडिंगवर आलंय.

“गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही”

असं राज्यपाल कोश्यारी म्हटलेत.

या वाक्यावर होणाऱ्या टीका-टिपण्याच्या व्यतिरिक्त एक विषय आमच्या डोक्यात आला. मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जातं म्हणजे मुंबईला श्रीमंत करणारे उद्योगधंदे तिथे आहेत. उद्योग तिथे आहेत म्हणजे उद्योगपती देखील असणारच. म्हणून म्हटलं मुंबईच्या टॉप १० श्रीमंत लोकांची यादी काढूया. यात खरंच कोणत्या समाजातील लोक आहेत? हे बघूया…

  मुकेश अंबानी

गेल्या २-३ महिन्यांपूर्वी बातमी आली होती की गौतम अदानी यांनी मुकेश अंबानी यांना आशियातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत मागे टाकलंय. झालं देखील तसंच मात्र मुकेश अंबानी यांनी त्यांचा हा दर्जा पुन्हा मिळवल्याची ताजी माहिती आहे. 

फोर्ब्सच्या जून महिन्यातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी ६ व्या क्रमांकावर होते. त्यांची एकूण संपत्ती १०३.१ अब्ज डॉलर इतकी आहे.

असे हे अंबानी मुंबईमध्ये राहतात. त्यांच्या घराचं नाव अँटिलिया असून हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं महागडे घर आहे. इंग्लंडच्या राणीच्या बकिंगहॅम पॅलेसच्या खालोखाल याचा नंबर लागतो. मुकेश अंबानी गुजराती समाजातून येतात. 

उदय कोटक 

कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक हे भारतातील सर्वात श्रीमंत बँकर्सपैकी एक आहेत. त्यांची 

१९८० च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा भारताचा आर्थिक विकास संथ गतीने सुरु होता तेव्हा कोटक यांनी मल्टिनॅशनल कंपनीकडून आलेली नोकरीची ऑफर नाकारली आणि त्यांनी फायनान्शिअल सर्व्हिसेसमध्ये व्यवसाय सुरु केला. पुढच्या काही वर्षांतच त्यांनी आपला व्यवसाय विस्तारायला सुरुवात केली.

वित्तीय सेवांच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत विविधता आणली, बिल डिस्काउंटींग, स्टॉकब्रोकिंग, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, कार फायनान्स, लाईफ इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंडमध्ये पाहिलं स्थान निर्माण केलं. २२ मार्च २००३ रोजी कोटक महिंद्रा फायनान्स लिमिटेड ही भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील पहिली कंपनी ठरली, जिने रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग परवाना प्राप्त केला होता. 

हुरून ग्लोबल रिच लिस्टच्या जून महिन्यातील माहितीनुसार उदय कोटक यांचं एकूण उत्पन्न १६ अब्ज डॉलर इतकी आहे. उदय कोटक मुंबईच्या दक्षिण भागात राहतात आणि गुजराती परिवारातून येतात. 

रतन टाटा 

भारताचे असे उद्योगपती ज्यांचं परोपकारात हमखास नाव घेतलं जातं. टाटा समूह या मुंबईस्थित समूहाचे ते माजी अध्यक्ष आहेत. टाटा समूहाचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात त्याचा विस्तार केला. 

या समूहाने २००० सलत लंडन इथे असलेली टेटली टी कंपनी विकत घेतली, २००४ मध्ये डेवू मोटर्सचे ट्रक-मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्स खरेदी केले, २००७ मध्ये कोरस ग्रुप विकत घेतला, २००८ मध्ये जॅग्वार आणि लँड रोव्हर कंपन्या खरेदी केल्या आणि २००९ मध्ये टाटा नॅनो हे ‘पीपल्स कार’ मॉडेल  बाजारात आणले.

अशा रतन टाटांचा जन्म १९३७ मध्ये एका पारसी कुटुंबात मुंबईमध्येच झाला. रिटायरमेंटनंतर सध्या रतन टाटा कुलाबा इथे राहतात.  त्यांचं एकूण उत्पन्न १ अब्ज डॉलर असल्याचं सांगितलं जातं. 

कुमार बिर्ला

कुमार बिर्ला हे भारतातील सर्वात मोठ्या समूहांपैकी एक असलेल्या आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष आहेत. बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद या संस्थांचे ते कुलपतीही आहेत. त्यांचं बालपण मुंबई आणि कोलकाता इथे गेले.

फोर्ब्सच्या माहितीनुसार, जुन २०२२ पर्यंत त्यांची अंदाजे एकूण संपत्ती १४ अब्ज डॉलर्स इतकी आहे. बिर्ला कुटुंबाच्या चौथ्या पिढीतील सदस्य सध्या मुंबईच्या मलबार हिलमधील जाटिया हाऊसमध्ये राहत असून ते मूळचे राजस्थानचे आहेत. 

सुभाष चंद्रा

सुभाष चंद्रा हे मीडिया जायंट एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष आहेत. शिवाय दूरचित्रवाणीवरील व्यक्तिमत्व, मोटिव्हेशनल स्पीकर आणि दानशूर उद्योगपती म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. त्यांनी भारतातील पहिलं सॅटेलाइट टीव्ही चॅनेल झी टीव्ही सुरु केलं. आजच्या घडीला झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायजेसचे ७६ चॅनेल्स १७३ देशांतील १.३ अब्ज प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आहेत.

सुभाष चंद्रा यांची एकूण संपत्ती जवळपास ५ अब्ज डॉलर असल्याची माहिती आहे. चंद्रा हरियाणात जन्मले होते मात्र व्यवसाय करायला ते महाराष्ट्रात आले आणि उत्तर मुंबईमध्ये स्थायिक झाले.

राधाकिशन दमानी

राधाकिशन शिवकिशन दमानी हे एक भारतातील मोठे इन्वेस्टर आहेत. ते डीमार्टचे संस्थापक आहेत.  ‘ब्राइट स्टार इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड’ या इन्व्हेस्टमेंट फर्मच्या माध्यमातून ते त्यांचा पोर्टफोलिओ देखील  मॅनेज करतात.

१९ ऑगस्ट २०२१ रोजी ब्लूमबर्ग बिलिनियर इंडेक्सद्वारे त्यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी ९८  व्या क्रमांकाचं स्थान देण्यात आलं होतं.

दमाणी हे मारवाडी असून त्यांचा जन्म मुंबईतच झाला. सध्या देखील ते मुंबईच्या अल्टामाऊंट रोड इथे राहतात. त्यांची एकूण संपत्ती १५ अब्ज डॉलरच्या पुढे आहे.

आदि गोदरेज

आदि गोदरेज हे त्यांच्या १२५ वर्ष जुन्या कौटुंबिक व्यवसाय असणाऱ्या गोदरेज ग्रुपचे प्रमुख आहेत.

आदि गोदरेज यांच्याकडे ३५०० एकरपेक्षा जास्त जमीन आहे आणि असे मानले जाते की त्यांची खरी श्रीमंती हीच साडेतीन हजार एकरची जमीन आहे. आदि गोदरेज यांनी त्यांचा कौटुंबिक व्यवसाय यशाच्या उंचीवर नेला आहे.

गोदरेज समूहाकडे तब्बल ४.१ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. तसेच आदी गोदरेज हे अनेक औद्योगिक संस्था आणि संघटनांचे अध्यक्ष राहिले आहेत. गोदरेज कुटुंब मुंबईतील प्रतिष्ठित मलबार हिल परिसरात राहते.

 नुस्ली वाडिया

नुस्ली वाडिया हे वाडिया समूहाचे अध्यक्ष आहेत. एफएमसीजी, वस्त्रोद्योग आणि रिअल इस्टेट उद्योगात वाडिया समूह कार्यरत आहे. ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि बॉम्बे डाईंगचेही ते मालक आहेत.

ऑगस्ट २०२१ मध्ये फोर्ब्सने त्यांची एकूण संपत्ती अंदाजे ४.१ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी सांगितली होती. नुस्ली वाडिया पारसी असून ते सध्या मुंबईत राहतात.

सायरस मिस्त्री

शापूरजी पालोनजी समूह ही देशातील ऐतिहासिक कंपनी आहे. हा पालोनजी समूह गेल्या दीडशे वर्षांपासून अस्तित्वात असून जवळपास ५० देशांमध्ये या समूहाचा व्यापार पसरलेला आहे आणि सुमारे ५० हजार कर्मचारी त्यांच्या कंपनीत कार्यरत आहेत. सायरस मिस्त्री यांचे वडील म्हणजेच पालोनजी मिस्त्री यांना २०१६ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

पालोनजी यांचं अलीकडेच निधन झालं आहे. ते जगभरातील श्रीमंत उद्योजकांच्या यादीत १४३ व्या स्थानावर होते. मूळचे गुजरातचे असलेले मिस्त्री कुटुंब १८६० च्या दशकात मुंबईत आले आणि इथेच स्थायिक झाले. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार सायरस मिस्त्री यांची एकूण संपत्ती 15 अब्ज डॉलर्सची आहे.

मिस्त्री समूहाने मलबार हिलचा तलाव, रिझर्व्ह बँकेची इमारत, ब्रेबॉर्न स्टेडियम, दिल्लीतील जवाहरलाल नेहरु स्टेडियम, षण्मुखानंद सभागृह, मुंबई सेंट्रल स्टेशन, एनसीपीए यांसह अनेक तारांकित हॉटेलांच्या भव्य इमारतींची उभारणी या समूहाने केली.

दिलीप शांघवी 

दिलीप सांघवी यांनी सन फार्मास्युटिकल्सची स्थापना केली. भारत सरकारने त्यांना २०१६ मध्ये पद्मश्री हा नागरी सन्मान देखील बहाल केला आहे. इंडिया टुडे मासिकाने त्यांना २०१७ च्या यादीतील भारतातील सर्वात शक्तिशाली लोकांमध्ये ८ वं स्थान दिलं होतं.

फोर्ब्सच्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2021 पर्यंत, शांघवी भारतातील १४ व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, ज्यांची संपत्ती १४.३ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.

दिलीप शांघवी गुजराती जैन कुटुंबातील असून ते मुंबईच्या जुहू भागात राहतात. 

हे ही वाच भिडू :

3 Comments
  1. Sandip Pawar says

    Every business or businessman needs healthy support from society , government and customers which is always given my maharashtrian people. No business can stand if it doesn’t have the customers. Always Grahak matters not Utpadak. If we stop going or buying goods from these businessmen’s will they be still in the top list? If Consumers grow their needs then only such people survives not a vice versa . Otherwise if we decide to stay on basic needs then no jobs will be there in the market.

  2. विकी मडकाम says

    सर्व उद्योगपती बाहेर राज्यातील असले तरी सर्वांनी व्यवसायासाठी मुंबई निवडली, सर्व जण श्रीमंत महाराष्ट्रात झाले, कुणीही त्यांच्यां स्वतःच्या राज्यात ना व्यवसाय केला ना स्थायिक झाले यावरून असे स्पष्ट आहे की सर्वांना मोठे मुंबईने केले महाराष्ट्राने केले आहे. कुणातही हिम्मत नव्हती त्यांच्या स्वतःच्या राज्यात व्यवसाय करायची म्हणून कुणीही बाहेरचे माजू नयेत

  3. Mukund says

    What Governor has said might have affected some people sentiments and some are trying to take milage of it. But facts dont change. Very very few marathi people know and do good business. Mostly they are in employment as they dont take risks. Thats why this picture. But there is nothing wrong in it. What matters is happiness and not wealth

Leave A Reply

Your email address will not be published.