शिक्षकाने पिक्चर पाहून विद्यार्थिनीचा खून केला लपायला मुलींचे ड्रेस घालून फिरला, तरीही घावलाच

एखादा पिक्चर, वेब सिरीज पाहून हे पाहून अनेकांना वाटलेलं की आपण सुद्धा क्राईम केल्यानंतर अशा प्रकारे वाचू. राजस्थान मधील कोटा इथल्या शिक्षकाने सुद्धा क्राईम केल्यानंतर पुढे काय करायचं याच सगळं प्लॅनींग करून ठेवलं होत. 

कुठल्या रस्त्याने शहराच्या बाहेर पडायचं. कुठं कसं थांबू, रूप कसं बदलायचं, कुठले सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आपण येऊ, यातून कसे आपण वाचू असं सगळं प्लॅनींग त्याने क्राईम केला होता. मात्र तो पोलिसांपासून वाचू शकला नाही. 

कोटा शहरात गौरव जैन हा शिक्षक ८ वी ते १० विच्या मुलांना शिकवायचा. 

 १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी क्लाससाठी गौरव जैन या शिक्षकाच्या घरी रोज येत असे. क्लास सुटल्यावर ही मुलगी १ तासाच्या आत घरी जायची. घटनेच्या दिवशी २ तासानंतरही ही मुलगी घरी नव्हती. त्यामुळे तिच्या घरचे टेन्शन मध्ये येतात आणि तिचे वडील गौरव यांच्या घरी जातात.  

मात्र यावेळी गौरव याच्या घराच्या दरवाज्याला लॉक लावले असल्याचे  दिसते. मात्र त्यांच्या लक्षात येतं की, जरी जैन यांच्या घराला लॉक असले तरीही त्यांच्या मुलीची चप्पल मात्र तिथेच आहे. हे पाहून मुलीचे वडील शेजारी राहणाऱ्या गौरव जैनच्या वडिलांच्या घरी वाजतात आणि विचारणा करतात. 

त्यावेळी पीडित मुलीचे वडील त्यांना सांगतात की, गौरव घरी नाहीत आणि मुलगी क्लास वरून परत आली नाही. आपण जाऊन पाहू असं सांगून ते गौरव राहत असलेल्या घरी येतात. जेव्हा घरच्या दरवाजा उघडल्यावर तिथली स्थिती पाहून पीडित मुलीच्या वडिलांना चक्करच आली. 

पीडित मुलगी खिडकीला लटकवलेल्या अस्वस्थेत त्यांना दिसून आली. तिचे हात पाय बांधलेले असतात. 

थोड्या वेळात तिथे पोलीस आले. पीडित मुलीच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होत्या. तिचा शिक्षक गायब असल्याने पहिला शक त्यांच्यावरच येतो. त्यामुळे पोलीस त्यांच्या शोध घेत असतात. त्यांच्यावर १० हजारांच्या इनाम सुद्धा ठेवण्यात येतो. मात्र त्याचा शोध काही लागत नाही.  गौरव जैनचे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होत. त्यामुळे तिच्या खून केल्यानंतर याने आत्महत्या केली असेल असं पोलिसांना वाटू लागले होते. मात्र पोलिसांनी तपास काही थांबवला नव्हता.

गौरवची एक बहीण गुडगाव इथे राहत होती. राजस्थान पोलिसांचे एक पथक तिथेच ठाण मांडून बसले होते.  घटनेच्या ७ व्या दिवशी गौरव हा आपल्या बहिणीच्या घरी गुडगावला जातो. तिथे त्याला राजस्थान पोलीस पकडतात. त्यानंतर गौरवला कोटाला आणतात.

गौरव पीडित मुलीचा खून करण्यापूर्वी प्लॅनिंग करून ठेवलं होत. यासाठी त्याने अनेक पिक्चर सुद्धा पाहिले होते. खून कसा करायचा असा सर्च तो गुगलवर करत असे. तसेच त्याला बाजीगर पिक्चर मध्ये शाहरुख खान एकाचा गळा दाबून खून, दोरी गळ्याला बांधून कसा खून करण्यात येतो हे सिन लक्षात राहतो. त्याने हा पिक्चर पुन्हा पुन्हा पाहिला. 

गौरवने अशाच प्रकारे पीडित मुलीचा खून करायचा असं ठरवलं. तसेच खून केल्यानंतर पळून कसं जायचं याच सुद्धा प्लॅनींग केलं. यासाठी त्याने युट्युब पाहायला सुरुवात केली. तिथे त्याला दिसले की, मुलींसारखा मेकअप केला तर आपले सगळे रूपच बदलून जाईंल.

मग तो मार्केट मध्ये जाऊन मेकअप किट घेऊन येतो. 

मुलींसारखे मोठे कसे विकत आणतो. बहिणीचे कपडे घरी होते. त्याने खून करण्यापूर्वी मुलींन सारखा मेकअप करून पाहिला. मुली कशा चालतात याची सुद्धा प्रॅक्टिस केली होती. प्लॅन ए आणि प्लॅन बी सुद्धा करून ठेवला होता. 

यात शहराच्या बाहेर कसं जायचं, कुठं जायचं, किती वेळात जायचं असं सगळं प्लॅनींग करून ठेवलं होत. अगोदरच्या दिवशी त्याने मेकअप करून कोटा शहरात फिरून आला होता. त्यावेळी त्याला कोणीही ओळखलं नाही. त्यामुळे त्याला वाटलं हे सगळं बरोबर जुळून आलं आहे.  

१३ फेब्रुवारीच्या दिवशी मुलगी जेव्हा क्लाससाठी घरी येते तेव्हा गौरव तिला प्रपोज करतो. मात्र ती नकार देते. यानंतर तो तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न करतो. त्याला विरोध केल्यानंतर गौरव तिचा ओढणीने गळा आवळतो आणि तिचा खून करतो.

यानंतर गौरव त्या मुलीला खिडकीला अडकवतो आणि पळून जातो. त्याला माहित असत की आपण शहरातील सीसीटीव्हीत दिसणार आहे. पोलिसांना फसविण्यासाठी तो एका पेट्रोल पंपावर जातो आणि तिथे एकाला पत्ता विचारतो. पोलिसांना फसवायला तो असा प्रकारचं डोकं लढवतो. त्यानंतर तो आपल्या बॅगेतून मुलींचा ड्रेस घालतो. आणि एका मोटरसायकल लिफ्ट मागून परत कोटा मध्ये येतो. 

त्याला माहित पोलिस हा कुठल्या रस्त्याने शहराच्या बाहेर गेला आहे तपासतील. मात्र दुसऱ्या रस्त्याने जर शहरात आलो हे पोलिस तपासणार नाहीत. त्यामुळे तो मुलींचे कपडे घालून दुसऱ्या मार्गने शहरात येतो. मीनाक्षी नावाने त्याने बसचे तिकीट बुक केलेलं असते. 

तिथून तो हरिद्वार जातो. त्याला माहित होत पोलीस आपल्याला नातेवाईकांकडे शोधतील. त्यानंतर हो लखनऊ, रांची, पटना, बोध गया, आग्रा अशा शहरांमध्ये फिरतो. 

७ दिवसानंतर त्याचे पैसे संपतात. पहिल्या काही दिवसात पोलीस बहिणीकडे येऊन गेली असेल असं त्याला वाटले होते. त्यामुळे त्याने बहिणीकडे जाण्याचा निर्णय घेतला. इथंच तो पकडल्या गेला.  यावेळी त्यांनी आपण केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. कशा प्रकारे गुगलवर, युट्युबवर पाहून खून केला हे सांगितलं. 

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

  

 

 

  

      

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.