अनिल कुंबळेची स्लेजिंग करणारा मुरली कार्तिक क्रिकेटचा बॅड बॉय म्हणून प्रसिद्ध होता…

क्रिकेटच्या मैदानात विशेष swag बाळगणारे खेळाडू असतात. मैदानाच्या बाहेर त्याची स्टाईल भल्याभल्याना गार करणारी होती, पण खेळायला सुरवात  त्याच्याइतकी जिंकण्यासाठी शर्थ करणारा खेळाडू दुसरा कोणी नव्हता. आजचा किस्सा अशाच एका खेळाडूचा  क्रिकेटचा बॅड बॉय म्हणून ओळखलं जायचं. जे काही असेल ते थेट तोंडावर बोलून तो मोकळा व्हायचा. पण क्रिकेट करियरमध्ये त्याला पुरेशा संधी मिळाल्या नाही आणि त्यामुळे लवकर त्याचं करियर संपलं.

मुरली कार्तिक हे नाव आपण बरेचदा ऐकलेलं असेल. ज्यावेळी संघात बड्या खेळाडूंची चलती असायची मुरली कार्तिक हा युवा लोकांचा स्टाईल आयकॉन होता. मुरली कार्तिकची चर्चा हि त्याच्या गोल्डन केसांमुळे आणि त्याच्या युनिक चष्म्यामुळे व्हायची.

मुरली कार्तिकच्या वडिलांची इच्छा होती कि मुलाने गॅरी सोबर्स इतकं महान खेळाडू बनावं. म्हणून मुरली कार्तिक क्रिकेटकडे वळला. सुरवातीला  बॉलर म्हणून  खेळायचा  बऱ्यापैकी बॅटिंगसुद्धा करायचा. चेन्नईहून  कार्तिकला  बॉलिंगची धार कळली आणि तिथून त्याने स्पिन बॉलिंगवर लक्ष देण्यास सुरवात केली. बिशनसिंग बेदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरली कार्तिक स्पिनचे धडे गिरवू लागला.

मैदानावर कार्तिक मात्र कायम आपल्याच  ,खेळायचं  जिंकण्यासाठी असं त्याच अग्रेशन असायचं. खुद्द कपिल देव  कार्तिकच्या swagचे फॅन होते. रणजी स्पर्धेत मुरली कार्तिक आपल्या बॉलिंगमुळे चांगलाच चर्चेत आला. भारताच्या संघात त्याच नाव चर्चिलं जाऊ लागलं. पण टर्न बॉलिंगचं कौशल्य मुरली कार्तिककडे तेव्हा नव्हतं असं म्हटलं जायचं. 

बराच काळ भारतीय संघात येण्यासाठी मुरली कार्तिकला वाट पाहवी लागली. १९९९-२०००च्या काळात भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्याहून दारुण पराभूत होऊन आला होता. देशभरातून संघावर टीका करण्यात आली होती. एकदा सिनियर भारतीय संघ आणि भारतीय संघ अ यांच्यात एक सामना खेळवण्यात आला होता.

अनिल कुंबळे बॉलिंग करत होते, एका बॉलवर मुरली कार्तिकने पुढे  जाऊन तो बॉल डिफेन्स केला. मुरली कार्तिकच्या डोळ्यात बघत अनिल कुंबळेने त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुरली कार्तिक जे बोलला ते ऐकून सगळी टीमचं एकमेकांकडे बघत बसली होती.

मुरली कार्तिक अनिल कुंबळेला म्हणाला जिथं अग्रेशन दाखवायचं तिथं नाही दाखवलं, ऑस्ट्रेलियात तर पार हवा टाईट झाली होती.

मुरली कार्तिक कायम आपल्याच धुंदीत राहणारा खेळाडू होता. संघात त्याची निवड झाली तेव्हा तो तिसरा स्पिनर म्हणून खेळत होता. हरभजनसिंग आणि अनिल कुंबळे हि मंडळी असतानासुद्धा मुरली कार्तिक आपली वेगळी जागा बनवू पाहत होता. साऊथ आफ्रिका दौऱ्यावर त्याने पटकावलेल्या ६ विकेट भारताला मॅचमध्ये परत आणणाऱ्या ठरल्या होत्या.

कमी हाईट असूनसुद्धा जबरदस्त स्पिन आणि बाउंस करण्याचं कौशल्य मुरली कार्तिकमध्ये होतं. खेळताना कायम पॉझिटिव्ह अप्रोच त्याचा असायचा. ८ कसोटी सामन्यांमध्ये २४ विकेट आणि ३७ वनडे सामन्यांमध्ये ३७ विकेट त्याने मिळवल्या, मात्र फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तब्बल ६४४ विकेट मुरली कार्तिकने मिळवल्या होत्या. 

कामगिरीत सातत्य नसल्यामुळे मुरली कार्तिक लवकरच संघातून बाहेर फेकला गेला. नंतर क्रिकेट कॉमेंटेटर म्हणून तो चांगलाच गाजला. त्याचा आवाज सगळ्यांनाच माहिती होता. पण क्रिकेटच्या मैदानात अनिल कुंबळेला ज्या पद्धतीने त्याने उत्तर दिलं ते चांगलंच चर्चेत राहिलं होतं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.