ऑस्ट्रेलियातून थेट शेतकरी आंदोलनात उतरलेली मुस जट्टाना

एखादी व्यक्ती कशी दिसते त्यावरून तो कसा आहे हे ठरवण्याची एक प्रथा आपल्याकडे पुर्वापार चालत आलेली आहे. याबाबत आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील अग्रेसर राहिलेले आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी आंदोलकांच्या कपड्यांवरून ते कोण आहेत याचा अंदाज बांधला होता. यावरून त्यांच्यावर टिका देखील करण्यात आली पण दोष त्यांचा नाही तर आपण देखील तसेच आहोत.

हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे मुस जट्टाना. मुसला आंदोलनात पाहिल्यानंतर ही कोण फॉरेनर अशी प्रतिक्रीया येते. बाहेरचे लोक येवून आंदोलनात सहभागी होत असल्याबद्दल तिचे फोटो देखील सोशल मिडीयावर शेअर करण्यात आले. तिचे केस, तिचे कपडे यावरून देखील टिंगल करण्यात आली.

पण महत्वाची हीच गोष्ट आहे की तरिही ती आंदोलनात सहभागी झाली आहे.

मुस जट्टाना ऑस्ट्रेलियाची नागरिक, पण भारतीय वंशाची. गेले दोन महिने ती सिंघु बॉर्डरवर शेतकऱ्यांसोबत आंदोलनात सहभागी झाली आहे. उद्या दिनांक १४ फेब्रुवारी रोजी ती पुण्यात येणार आहे. पुण्यातल्या गांधीभवन येथे पुरोगामी विचारांच्या लोकांनी आयोजित केलेल्या यंग इंडिया मिटअप या कार्यक्रमात ती बोलणार आहे.

कोण आहे मुस जट्टाना…?

वरती सांगितल्याप्रमाणे ती ऑस्ट्रेलियाची नागरिक. पण तिचा जन्म भारतातला. लाखों अनिवासी भारतीयांप्रमाणेच ती एक. बाहेरच्या देशातली सुखाची लाईफस्टाईल जगणारी ही पोरगी.

पण ती आपली पाळेमुळे विसरलेली नाही. ती मुळची मोहालीची. वयाच्या सातव्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यन्त ती भारतातच रहात होती. दरवर्षी ती भारतात भेट देण्यासाठी यायची. आपला देश आपली माती म्हणून हरकून जायची. त्यानंतर परत आपल्या लाईफस्टाईलमध्ये ती हजर असायची.

सोशल मिडीयावर तिला लाखोत फॉलोअर्स आहेत. इन्स्ट्राग्रामवर दिड लाखांत फॉलोअर्स आहेत. ट्विटरवर ती सक्रिय आहे. पण आजवर ती फक्त आपलं मत आणि आपला सोशल मिडीया यापुरतीच मर्यादित होती.

तेव्हा भारतात किसान आंदोलनाचा पाया रचला जात होता. हजारोच्या संख्येत शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर जमा होवू लागले. सोशल मिडायातून ही माहीती जेव्हा मुस जट्टानाला समजली तेव्हा तिने देखील पाठिंबा दिला.

शेतकरी हिताची भाषा ती बोलू लागली. अगदी बोल्ड वाटणारी ही मुलगी शेतकऱ्यांच्या बाजूने बोलते म्हणल्यानंतर लोकांच्या देखील कौतुकाचा विषय झाली. पण ती इतक्यावर थांबली नाही.

मुस स्वत: भारतात आली आणि शेतकरी आंदोलनात सहभागी झाली. गेल्या दोन महिन्यांपासून ती सिंधु बॉर्डरवर तळ ठोकून आहे. भारताचा झेंडा घेवून ती आंदोलनात सहभागी होते. लोकांना जेवण वाढण्यापासून ते आंदोलनातील माहिती योग्य भाषेत पोहचवण्याची ती जबाबदारी पार पाडतेय.

याबाबत मुस ला विचारलं असता ती टिपीकल रंग दे बसंती पिक्चरप्रमाणे सांगते,

कोणताही देश परफेक्ट नसतो, तो परफेक्ट करावा लागतो. सरकार हे माणसासांठी असतं, माणसं हे सरकारसाठी नसतात. लोकांच म्हणणं सरकारने ऐकायला पाहीजे. बस्स इतक्याच कारणासाठी मी या आंदोलनात सहभागी झाली आहे.

सोशल मिडीयावर असणारे हे फोटो पाहूनच मुस ची जूनी लाईफस्टाईल अन् तीचं शेतकरी आंदोलनासोबत जोडणं म्हणजे दोन संस्कृती एकत्र येणं, आपली पाळेमुळे लक्षात ठेवणं किती गरजेचं आहे हे लक्षात येतं.

तुम्ही उद्या दिनांक १४ फेब्रुवारी रोजी गांधी भवन पुणे येथे मुस जट्टानाला प्रत्यक्ष भेटू शकता तीचे मत ऐकू शकता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.