मुस्लीम धर्मियांसाठी हज यात्रा एवढी महत्वाची का असते ?

इस्लाम धर्मात ५ महत्वाची तत्त्वं सांगितली आहेत. त्यातलं एक म्हणजे हज यात्रा. जीवनात एकदा तरी मुस्लिम धर्मिय व्यक्तीने हज यात्रा करावी असं सांगितलं जातं. यंदाची हज यात्रा ७ जुलै पासून सुरु झाली आहे.

कोरोनामुळे ही यात्रा दोन वर्ष बंद होती. सौदी अरेबियानं यावर्षी बाहेरील देशातील नागरिकांना हजसाठी परवानगी दिली आहे. जगभरातील १० लाख मुस्लीम धर्मीय नागरिक हजच्या निम्मिताने मक्केतील मस्जिद अल-हरममध्ये असलेल्या भव्य पवित्र काबाचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत.

हज यात्रेत काय असतं

असं सांगतात, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या प्रत्येक मुस्लिम धर्मीय व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करणे कर्तव्य समजले जाते. मस्जिद अल-हरममध्ये असलेल्या भव्य पवित्र काबाला भेट देण्यासाठी जगभरातील मुस्लिम मक्केला जातात. इथल्या प्रार्थनेदरम्यान झालेल्या पापांची क्षमा मुस्लीम नागरिक मागतात.

मुस्लिम कॅलेंडर नुसार १२ व्या महिन्यातील ८ ते १२ तारखेला हज यात्रा असते. याच दरम्यान बकरी ईद साजरी केली जाते.

हज यात्रेत पुरुषांना पांढरे कपडे घालणे आवश्यक असते. त्याला इहराम म्हटले जाते. तर स्त्रियांनी पांढऱ्या कपड्याने आपले संपूर्ण शरीर झाकले पाहिजे. अल्ला समोर सर्व जण सामान आहेत दाखवण्यासाठी सगळ्या सारखे कपड्यांमध्ये दर्शन घ्यावे लागते.

तीन दिवसात यात्रा पूर्ण करावी लागते 

हज यात्रेच्या पहिल्या दिवशी हज यात्रेकरू तवाफ करतात. यात काबाला सात फेऱ्या मारल्या जातात. यानंतर सफा आणि मरवा नावाच्या दोन डोंगरांची परिक्रमा केली जाते. मोहम्मद पैगंबर यांची पत्नी हाजीरा आपल्या मुलगा इस्माईलसाठी पाणी आणायला गेल्या होत्या, तेव्हा पाण्याच्या शोधात त्यांनी या दोन डोंगरांना ७ फेऱ्या मारल्या होत्या, असं सांगितलं जातं. हा हज यात्रेचा पहिला भाग समजला जातो.

यानंतर हज यात्रेकरू मीना शहरात जातात. हे शहर मक्का पासून आठ किलो मीटरवर लांब आहे. दुसऱ्या दिवशी अराफत असते. मुस्लिम कॅलेंडर नुसार हा दिवस महत्वपूर्ण दिवसांपैकी एक समजला जातो. मीना शहरात रात्रीची नमाज अदा केली जाते.

त्यानंतर हे यात्रेकरू दुसऱ्या दिवशी अराफत पर्वतावर जमतात. या डोंगरावर उभे राहून कुराणाचे पठण करतात आणि माफी मागतात. यानंतर, ते मुझदालिफाच्या मैदानात जमतात. तेथे दुसऱ्या रात्रीची प्रार्थना केली जाते.

हजच्या तिसर्‍या दिवशी जमरात म्हणजेच राक्षसाला दगड मारण्यासाठी हज यात्रेकरू पुन्हा मीना शहरात परत येतात. प्रेषित इब्राहिमला सैतानाच्या मोहात पाडलेल्या तीन इमारतींवर दगडफेक करतात.  या दिवशी जगभरात ईद साजरी केली जाते. यानंतर हज यात्रेकरू मुंडन करतात. आपली हज यात्रा पूर्ण करण्यासाठी हे यात्रेकरू परत मक्केत येऊन परिक्रमा करतात.

असं सांगण्यात येतं की, हज यात्रा केल्याने अल्लावरील विश्वास वाढतो. अल्लाच्या जास्त जवळ जाता येतं याच बरोबर भूतकाळात झालेल्या पापांची क्षमा मागता येते. त्यामुळे मुस्लीम धर्मीयांमध्ये हज यात्रेला अनन्यसाधारण महत्व आहे.

हज यात्रा जगभरातील मुस्लिम धर्मियांना एकत्र आणते. हज यात्रा प्रामाणिकपणे करतात. त्यामुळे ते यात्रेकरू घरी परतल्यानंतर त्यांचे आयुष्यातील सगळे पापे धुवून निघतात आणि यात्रे नंतर मृत्यू झाल्यास स्वर्गात स्थान मिळत असल्याचे सांगितले जाते.

हज यात्रेला जाता यावेसाठी सौदी अरबकडे जगभरातुन लाखो मुस्लिम धर्मीय नागरिक निवेदन करत असतात. यानंतर लकी ड्रॉ द्वारे नावे काढली जातात. त्यांनाच हज यात्रेसाठी जाता येतं. ज्यांचा नंबर लागत नाही त्यांना परत पुढच्या वर्षी निवेदन द्यावे लागते.

ज्या व्यक्तींना हज यात्रेचा खर्च परवडत नाही, अशा व्यक्तींचा खर्च सामाजिक संस्था करतात. 

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.