या माणसामुळे नागिण डान्सचा शोध लागला.

हा लेख वाचल्यानंतर एक काम करावं. प्रत्येकाने त्यांचा फोटो आपल्या लग्नात लावावा. ब्रेक अप झालं की त्यांचा फोटो काढून पहावा. प्रेमात पडला तरी त्यांचाच फोटो पहावा. झोप येत नसेल तर आईच्या आठवणी सोबत त्यांचा फोटो पहावा. चुकून देवाची आठवण आली तरी त्यांचाच फोटो पहावा. 

च्या गावात ! काय चाल्लय काय ? असा कोण VIP माणूस आहे की सगळीकडे त्यांचा फोटो पहावा म्हणताय. तर विषय असा आहे की, नेहरूंनी या देशाला आयआयटी वगैरे दिलं, इंदिरा गांधींनी या देशाला अण्वस्त्र दिली, राजीव गांधींनी कॉम्प्युटर दिला, व्ही.पी.सिंग यांनी देशाला मंडल आयोग दिला, मोदींनी देशाला नोटबंदी दिली… 

प्रत्येकानं आपआपल्या परीने देशाला काहीना काही दिल. तसच या माणसाने देशाला नागिण डान्स दिला.. 

गाण्याचे दर्दी असणाऱ्यांना देखील सहसा म्युझिक डायरेक्टर रवी यांच नाव चटकन आठवणार नाही. असो नाव आठवत नसेल तर राहूदे ते पुढं सांगुच पण हि गाणी किती जवळची वाटतात ते बघा. 

  1. आज मेरे यार कि शादी हैं.  
  2. बाबुल की दुवाए लेती जा. 
  3. मेरा यार बना हैं दुल्हा. 
  4. दुल्हन ससुराल चलीं. 

तर हिच ती आजही लग्नात वाजणारी गाणी. त्यातही आज मेरे यार कि शादी हैं गाणं खास जवळच. ते लावलं की दोन्ही कर स्वत:च्या डोक्यावर जुळती टाईप फिल येतो. कंबर हळुच वाकडी होते. मान 90 अंशातून वळू लागते, एक पाय हळूच वर होतो आणि आपोआप आज मेरे यार की शादी हैं करत नागिण डान्स चालू होतो. तर हाच नागिण डान्स देणारा माणूस म्हणजे म्युझिक डायरेक्टर रवी. श्रीदेवीच्या नागिणमुळे जितका नागिण डान्स माणसांच्यात मुरला नाही तितका त्यांच्या गाण्यांमुळे भिनला. त्याचं कारण काय तर, असा डान्स करायला तस गाणं पण पाहिजे. 

बर महान माणसं फक्त एकाच गोष्टीत अडकून रहात नाहीत. मित्राच्या लग्नानंतर विषय निघतो तो ब्रेकअप आणि फ्रेन्डझोन सारख्या प्रकारांचा. दिल तुटलं की गाणी आठवतात. रवी साहेबांनी त्याची देखील तरतुद आपल्यापुढे करुन ठेवली आहे. भविष्याची जाणिव असणारे कदाचित ते एकमेव असावेत. 

आत्ता या गाण्यांवर झलक टाका… 

दिल के अरमां आसुंवो में बहं गऐं.. 

आहा.. एकाच लाईनीत कस्स आत्ताच दिल तुटल्यासारखं फिल झालं. आत्ता अजून, चलों एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों’. ‘अपनो पे सितम गैरों पे करम’, ‘किसी पत्थर की मूरत से’ असच खूप काही…

आत्ता पुन्हा एकदा त्यांच श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी तिसरा प्रकार सांगतो, 

गरिबों की सुनो वों तुम्हारीं सुनेंगा… 

या गाण्याचे म्युझिक डायरेक्टर रवीच. हाय काय नाय काय. नागिण डान्स, त्यानंतर ब्रेकअप आणि नंतर थेट मागणाऱ्यांच गाणं. सगळ काही त्यांचच ते पण युनिक. प्रत्येक सेक्टरमध्ये खणखणीत नाणं वाजवलेला एकमेव माणूस म्हणजे रवीच. 

वाह्ह भिडू काय छान छान सांगितलं ! 

थांबा वो अजून संपत नाय..? 

चौदहवीं का चांद हो या आफताब हो’. ‘बार-बार देखो, हजार बार देखो’. ‘शीशे से पी या पैमाने से पी’. आणि ‘CAT कैट, कैट माने बिल्ली’  हि गाणी देखील त्यांचीच.. 

बघा बाबा आम्ही तर प्रेमात पडलोय या माणसाच्या. तुम्हाला उपकाराची जाणिव असली तर एकदा गाणी तर बघून घ्या.. 

हे ही वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.