पुण्यातली पहिली दंगल एका मंदिराच्या छोट्याशा घंटेवरून झाली होती.

पुण्यातल्या लक्ष्मी रोडवर सोन्या मारुतीचे एक छोटेसे मंदिर आहे. जाणारे येणारे लोकं त्या मारुतीचे दर्शन न विसरता घ्यायचे आणि प्रथेनुसार त्यातली छोटीशी घंटा देखील वाजवायचे. पण याच छोटाश्या घंटेमुळे पुण्यात दंगल उसळली होती.

हो ….या मंदिराच्या जवळच एक मशिद होती. घंटेच्या आवाजाने आमच्या नमाजात व्यत्यय येतो म्हणत मुस्लीम समाजाने आक्षेप घेतला होता. आणि ह्याच मुद्द्यावरून १९३८ च्या काळात  हिंदू -मुस्लीम पुण्यातली पहिली दंगल उसळली होती.

हिंदुनी घंटा वाजवू नये अशी मुस्लिमांची मागणी होती.

२४ एप्रिल ते १४ मे या कालावधीत या मंदिरापासून ते पुढे तांबोळी मशिदीपर्यंतच्या  रस्त्यावर कोणतेही वाद्य वाजवायचे नाही असा हुकुमच जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता.

इंग्रज सरकार किती पक्षपाती होते आणि हिंदू-मुस्लिमांमध्ये तणाव वाढावा, यांच्यातली ऐकी तुटावी याचा पुरेपूर प्रयत्न सुरुवातीपासूनच इंग्रजांनी चालवले होते.

रस्ता हा सर्व अर्थानी सार्वजनिक असतो, कोणत्याही रस्त्यावरून, कोणत्याही समाजाला कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्याचे अधिकार असतात. त्यात वाहतुकीला अडथळा न आणता कोणत्याही गटाला मिरवणूक काढण्याची परवानगी असणे हा हि एक साधा सरळ न्यायाचा व्यवहार आहे. तो तर सरकारने त्या घटनेत धाब्यावर बसवला होता. कारण या घटनेत दंगलीची सुरुवात मुसलमानांनी केली होती आणि निर्बंध मात्र हिंदूवर घातले होते असा हिंदू महासभेचा दावा होता.

१८९२-९३च्या वर्षानंतर पुण्यात प्रथमच हिंदु-मुसलमानात दंगल झाली होती.

निमित्त निर्माण करणे किंवा कुरापती काढणे हे दोन्ही गटातील काही धर्मांध व्यक्ती करीतच असतात. त्या काळात टिळकांनी देखील केसरीतून प्रश्न केला होता की, “हिंदूंच्या गणेशोत्सवामध्ये मिरवणुकीवर किंवा ज्ञानोबारायांच्या पालखीवर मुसलमान दगडफेक का करतात? हा प्रकार असाच चालू राहिला तर हिंदूंनाही वेगळा विचार करावा लागेल”, असेही त्यांनी पुढे म्हटले होते.

या दंगलीची मीमांसा करताना टिळकांनी मोठे मार्मिक उद्गार केसरीतील अग्रलेखात काढले होते. “या दंगलीमध्ये हिंदू आणि मुसलमान हे दोनच पक्ष नाहीत तर सरकार हाही एक तिसरा पक्ष आहे”.

सरकार मुसलमानांचा कोणताही हट्ट उचलून धरते आणि कायद्याचा वापर निपक्षपातीपणाने करीत नाही असा टिळकांचा प्रतिपादनातील रोख होता.

गुजरात मधील प्रभासपट्टण येथे हिंदु मुसलमानांची दंगल झाली.  प्रभासपट्टणपासून दोन किलोमीटर अंतरावर भगवान श्रीकृष्णांनी देहत्याग केल्याची जागा गोमती नदीच्या तीरावर दाखवली जाते. अनेक वेळा पाडल्या गेलेल्या सोमनाथ मंदिराचे अवशेष समुद्राच्या तीरावर होते हे त्या स्थानाचे हिंदूंच्या दृष्टीने असलेले धार्मिक महत्त्व आहे.

तेथील दंगलीत निराधार झालेल्या हिंदूंना मदतीसाठी  धावून आले ते मुंबईतील गुजराती लोकं, याच गुजराती लोकांनी अनेक सभा घेतल्या होत्या.

या सभांना उत्तर म्हणून जुम्मा मशीदीतील इतर मुसलमान बाहेर पडले आणि त्यांनी हिंदू वर हल्ले केले.

टिळकांनी १५ ऑगस्ट १८९३ च्या अग्रलेखात “एक दिवस वाट पाहून पोलिसांकडून संरक्षण मिळेना तेव्हा संरक्षणासाठी दंगलखोरांचा प्रतिकार करणे हिंदूंना भाग पडले” असा उल्लेख केला आहे.

दंगलीमध्ये सरकार हिंदूंची बाजू घेणार नाहीत अशी मुसलमानांची समजूत असते एवढेच सांगून टिळक थांबत नाही तर ते म्हणतात कि, मुसलमान लोकं जर शेफारले असले तरी त्याचे मुख्य कारण सरकारची बाजू हीच आहे. मुंबईची हिंदू लोकं याचे उदाहरण आहेत, ते  मुसलमानांसारखे धर्म वेडेपणाने अगर अविचारीपणाने वागत नाहीत”. असे तिखट विचार त्यांनी मांडले होते. 

१८९३ साली  हिंदुत्ववाद हा शब्द आला नव्हता त्या वेळच्या दंग्याची टिळकांनी केलेली ही मीमांसा आहे.

गेल्या शतकभरात झालेल्या हिंदू-मुसलमान दंग्यांची मीमांसा करायला गेलं तर टिळकांनी काढलेले निष्कर्ष काही प्रमाणात लागू होतात.

सोन्या मारुती मंदिरातील घंटा वाजवण्याचे या निर्बंधाविरुद्ध हिंदू महासभेने सत्याग्रहाची मोहीम हाती घेतली.

डॉक्टरांना बरीच लोकं येऊन प्रश्न करीत असत, ” संघ या सत्याग्रहात काय काम करणार आहे?”  डॉक्टर उत्तर द्यायचे, हा सत्याग्रह सर्व नागरिकांचा आहे. हे संघाचे स्वयंसेवक देखील नागरिकच आहेत. नागरिक या नात्याने स्वयंसेवक या सत्याग्रहात आवश्य भाग घेतील”.

संघ हा कोणत्याही चळवळीत उतरणार नाही, डॉक्टरांच्या या चळवळीत न उतरण्याच्या धोरणातील मर्म अनेकांच्या ध्यानात यायचे नाही. त्यानंतरही कित्येक वर्षे आले नाही. राजकीय पक्षाचे लोकं त्यांच्यावर टीका करीत, डॉक्टर टीकेला उत्तर न देता शांत राहायचे.

अनेक स्वयंसेवकांनी या सत्याग्रहात भाग घेतला होता.

स्वतः डॉक्टरांनी १३ मे या दिवशी घंटा वाजवून सत्याग्रह केला त्यांना अटकही झाली होती आणि अर्ध्या तासात त्यांची तात्पुरती मुक्तताही झाली होती. पुढे रितसर खटला चालवला गेला. न.गो. अभ्यंकर यांनी त्यांच्या वतीने युक्तिवाद केला आणि डॉक्टरांना इतरांप्रमाणेच पंचवीस रुपयांचा दंड भरावा लागला आणि त्यांना काही शिक्षा झाली होती.

अगदी छोट्याशा घंटेमुळे पुण्यात दंगल उसळणे हि अत्यंत शरमेची बाब होती…

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.