या देशात मुस्लिम तर राहतात मात्र तिथे मशीद उभारण्यास परवानगी नाही..

इस्लाम जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे. जगातील सुमारे 800 कोटी लोकसंख्येपैकी सुमारे 190 कोटी मुस्लिम बांधव आहेत. इस्लाम धर्मात मस्जिदला खूप महत्त्व आहे.

असं असून पण जगातील 195 देशांपैकी दोन असे देश आहेत जेथे मुस्लिम लोकसंख्या असूनही एकही मशीद नाही.

स्लोवाकिया आणि इस्तोनिया हे दोन देश असे आहेत, जिथे मुस्लीमांना इबादतसाठी एकही मशीद नाही. येथे मशिदी बांधाव्यात या मागणीवरुन बरेच विवाद झाले होते, पण तरीसुद्धा सरकारनं इथं मशिदी बांधू दिल्या नाही. त्यामुळं इथ राहणाऱ्या मुस्लिम बांधवांना कल्चरल सेंटर किंवा त्यांच्या घरात इबादत करावी लागते.

या दोन्ही देशांची खासीयत म्हणजे जगातील सर्वात आनंदी देशात या देशांचा समावेश आहे.

हे दोन्ही देश नवीन आहेत. स्लोवाकिया देश चेकोस्लोवाकिया पासून वेगळा होऊन तयार झाला, तर इस्तोनिया 1940 च्या आसपास सोव्हिएत संघापासून वेगळा झाला. सोव्हिएत संघापासून वेगळे झाल्यानंतर 1991 मध्ये त्याने स्वतः ला वेगळा देश म्हणून घोषित केले. हे दोन्ही देश अलीकडच्या काळातच ते युरोपियन युनियनशी जोडले गेले आहेत.

स्लोव्हाकिया आणि इस्तोनियामध्ये कोणतीही मशीद नसल्याचे मोठे कारण म्हणजे तिथली मुस्लिम लोकसंख्या. या दोन देशांमधी मुस्लिमांची संख्या फारच कमी आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, स्लोव्हाकियात मुस्लिमांची संख्या एकूण 5000 होती, जी एकूण लोकसंख्येच्या केवळ 0.2 टक्के आहे. तर दुसरीकडे, इस्तोनियामधली मुस्लिमांची संख्या फक्त 1508 होती, जी देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ 0.14 टक्के होती.

दरम्यान, यात कोणती शंकाच नाही की, गेल्या 10 वर्षांत येथे मुस्लिम लोकसंख्येच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. असे असूनही, येथे अद्याप कोणतीही मशीद बांधली गेली नाही.

सरकारने मशिदी बांधण्यास दिली नाही मान्यता

आजवर स्लोवाकियातील मशिदीच्या मागणीवरुन बरेच विवाद झाले. 2010 मध्ये स्लोव्हाकियात राहणाऱ्या मुस्लिमांनी देशाची राजधानी ब्रॅटिस्लावामध्ये मशिदीची मागणी केली. मात्र, तत्कालीन सरकारने मुस्लिमांची ही मागणी फेटाळली. 2010 नंतरही मशिदी बांधण्यासाठी अनेक वेळा परवानगी मागितली गेली होती पण त्यासंदर्भात सरकारने मान्यता दिली नाही.

निर्वासित संकटातही स्लोव्हाकियाने मुस्लिमांना दिला नव्हता आश्रय

17 व्या शतकाच्या आसपास इथे आलेले मुस्लिम तुर्क आणि उइगर होते. जे स्लोव्हाकियाच्या मध्य आणि दक्षिण भागात वसले.

एकेकाळी हा देश यूगोस्लाविया म्हणून ओळखला जात होता. 2015 मध्ये युरोपियन निर्वासित संकटा वेळीही स्लोव्हाकियाने सुमारे 200 ख्रिश्चनांना आश्रय दिला होता, परंतु त्यांनी मुस्लीम निर्वासितांना त्यांच्या देशात आश्रय देण्यास स्पष्टपणे नकार दिला.

स्लोव्हाकियाला या निर्णयामुळे जगभरातून टीकेचा सामनाही करावा लागला. पण सरकारने या निर्णयावर स्पष्टीकरणही दिले.

सरकारने म्हटले की, त्यांच्या देशात मुस्लिम लोकसंख्येसाठी कोणतीही मशीद नाही. अशा परिस्थितीत जर त्यांनी तेथील मुस्लिम निर्वासितांना आश्रय दिला तर काही काळानंतर स्लोव्हाकियात मशिदीच्या मागणीसंदर्भात बरीच समस्या उद्भवू शकतात. स्लोव्हाकिया सरकारने दिलेल्या या स्पष्टीकरणानंतरही त्यांच्यावर युरोपियन संघाने टीका केली होती.

दुसरीकडे, इस्तोनियामध्ये एक इस्लामिक कल्चर सेंटर आहे. जिथे मुस्लिम लोक नमाजसाठी एकत्र येतात. इथे सुन्नी तातार आणि शिया अजेरी मुस्लिम राहतात. जे कधीकाळी रशियाच्या सैन्यात काम करत होते. तर या देशात काही ठिकाणी लोक नमाज पठन करण्यासाठी एका कॉमन फ्लॅटमध्ये देखील जमा होतात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.