ताटं-वाट्या चाटून मुस्लीम लोक कोरोना पसरवत आहेत ? वाचा खरं काय आहे..

दिल्लीच्या कांडमुळं सध्या देशभरातला मुस्लीम समाज टार्गेट केला जात असल्याचं चित्र आहे. छुपा अजेंडा असणारे लोक मुस्लीम समाजाला कोंडीत पकडण्याचा डाव पकडून आहेत. त्यातही दिल्लीच्या निजामुद्दीनची बातमी आल्याने गावगाड्यातल्या मुस्लीमांना टार्गेट करण्यात येत आहे.

सोशल मिडिया विशेषत: Wtsapp वरती सध्या एक व्हिडीओ पसरत आहे. या व्हिडीओसोबत एक मॅसेज देखील आहे. यात लिहण्यात आलय की बिहारी मस्चिदमध्ये लपलेल्या १४ मुस्लीम लोकांना बिहार पोलीसांनी ताब्यात धेतलं आहे.

तामिळनाडूमधील मश्चिदमध्ये देखील कोरोना व्हायरस पसरवण्यासाठी लपलेल्या मुस्लीमांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

मुस्लीम अशा प्रकारे ताट-वाट्या चाटून कोरोना व्हायरस पसरवत आहेत. 

 

 

वरती असणाऱ्या या व्हिडीओत तुम्हाला मुस्लीम तरुण ताट वाट्या चाटत असताना दिसत आहेत. 

हाच व्हिडीओ महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. यामध्ये मुस्लीम समुदायाने कोरोना जिहाद सुरू केला असून त्यासंबधित व्हिडीओ म्हणून हा व्हिडीओ शेअर केला जात आहे.

वस्तुस्थिती नेमकी काय आहे…? 

या व्हिडीओमध्ये दिसणारे तरुण मुस्लीम आहेतच पण ते बोहरा मुस्लीम आहेत. बोहरा मुस्लीम हा मुस्लीमांमधीलच एक प्रकार आहे. बोहरा समाजातील मुस्लीम ओळखायचे असतील तर त्यांच्या विशिष्ट टोपीमुळे ते चटकन ओळखले जातात.

https://www.thedawoodibohras.com/culture/attire-tradition/

वरील वेबसाईटवर तुम्हाला दाऊदी बोहरा मुस्लीम समाजाबद्दलची माहिती मिळेल. 

पण मुद्दा आहे हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे ?

तर सर्वात प्रथम इंटरनेटवर हा व्हिडीओ ३१ जुलै २०१८ साली पोस्ट केलेला दिसतो. त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की हा व्हिडीओ कोरोनाची साथ पसरल्यानंतरचा किंवा त्याअगोदर काही महिन्यांपुर्वीचा देखील नाही तर तो सुमारे वर्ष-दिड वर्ष जूना आहे.

याच व्हिडीओमध्ये बोहरा समुदायाचे तरुण आपल्या प्रथा परंपरा पाळत असताना अस लिहण्यात आलं आहे.

नेमकी ही प्रथा काय आहे ? 

बोहरा समाजात आठ ते नऊ किंवा त्याहून अधिक व्यक्ति एकत्रितपणे जेवण करतात. हे सर्व एकाच थाळीत घेतले जाते. खाली एक फोटो देत आहोत त्यामध्ये बोहरा समाजात कशा प्रकारे जेवण करण्यात येत हे आपणाला दिसून येईल.

बोहरा समाजात एक मान्यता आहे ती म्हणजे अन्नाचा एक कणही वाया जावून द्यायचा नाही. वाया जावून द्यायचा नाही याचा अर्थ तो कण पोटातच जायला हवा. थोडक्यात ही बोहरा समाजाची नो वेस्टेज पॉलिसी आहे. यामध्ये एकही अन्नाचा कण वाया जावू नये म्हणून तो तोंडाने चाटून स्वच्छ केला जातो.

ही परंपरा फॉलो करणाऱ्यां बोहरा मुस्लीम समुदायातील मुलांचा हा व्हिडीओ आहे. त्याचाच वापर आज मुस्लीम लोक कोरोना जिहाद करत आहेत म्हणून अफवा पसरवण्यासाठी केला जात आहे. 

यासंबधित एक ट्विट देखील करण्यात आलं होतं, 

थोडक्यात अशा अफवा पसरवणं हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे अशा अफवा पसरवू नका.

 हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.