पिक्चरच्या वादातून मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंची सिक्युरिटी काढतो अशी धमकी दिली होती

शाहरुख खान अभिनया बरोबर इतर गोष्टीमुळे वादात कायम राहिला आहे. आयपीएल मधील कोलकत्ता नाईट रायडर्सची मालकी ही अभिनेता शाहरुख खानकडे आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडीयम वरील वाद तर सर्वाना परिचितच आहे. त्यामुळे शाहरुख खानला काही वर्ष काही वर्ष स्टेडीयम मध्ये जाण्यापासून बंदी घालण्यात आली होती.

मात्र हा वाद मोठा होता. यात सत्ताधारी, विरोधकांमध्ये चांगली जुपली होती. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यात उडी घेतल्याने चांगलच वाद रंगला होता. 

माय नेम इज खानचा अभिनेता असणाऱ्या  शाहरुख खानने पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलच्या सामन्यात खेळू देण्याचे समर्थन केले होते. त्यामुळे शाहरुख खान हा शिवसेनेच्या निशाण्यावर आला होता. करण जोहरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

शाहरुख खान हा पाकिस्तान धार्जीना असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी ज्या-ज्या ठिकाणी माय नेम इज खान चित्रपट रिलीज झाला होता त्या-त्या थेटर वर हल्ला चढविला होता.

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मात्र कोणत्याही दबावाला न झुकता माय नेम इज खान प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं. इतकंच नव्हे तर तो चित्रपट पाहण्यासाठी ते आपल्या कुटुंबीयांसोबत थिएटरमध्ये देखील गेले. र असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आणखीन वाद वाढला होता.

अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांची झेड प्लस सुरक्षा काढून घेण्याचा इशारा दिला होता.

शिवसेनेने कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देण्याची भूमिका बदलली नाही, तर प्रसंगी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची सुरक्षा काढण्याचा निर्णय घेण्यास आपण कचरणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला. त्यापाठोपाठ, लगेचच ‘तुम्ही काय माझी सुरक्षा काढणार, मीच तुमची सुरक्षा परत पाठवून देतो, तुमची सुरक्षा तुम्हालाच लखलाभ…’, असे प्रत्युत्तर झेड दर्जाची सुरक्षा असलेल्या उद्धव ठाकरे यांनी दिल्याने नवाच वाद ऐरणीवर आला आहे.

‘माय नेम इज खान’ या चित्रपटाचे प्रदर्शन, त्याला असलेला शिवसेनेचा विरोध, आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी ‘वर्षा’ बंगल्यावर उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अतिरिक्त मुख्य सचिव चंदा अय्यंगार, पोलीस महासंचालक अनामी रॉय, मुंबईचे पोलीस आयुक्त डी. शिवानंदन आदी अधिकारी त्यास उपस्थित होते.  

‘माय नेम इज खान’ला शिवसेनेने ज्या पद्धतीने विरोध चालवला आहे, तो पाहता त्यांच्यावर काय कारवाई करणार, असे विचारण्यात आले असता चव्हाण मीडियाशी बोलत म्हणाले होते, कायदा हातात घेण्याचा कुणाचाही प्रयत्न आम्ही चालू देणार नाही.  शिवसेना नेते अशाच प्रकारे आंदोलने करीत राहिले तर त्यांची. इतकेच काय उद्धव ठाकरे यांचीही सुरक्षा काढून घेतली जाईल, असा इशारा त्यांनी दिला होता. मुंबईकरांनी घाबरू नये. त्यांच्या सुरक्षेची पूर्ण तजवीज सरकारने केली आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

यावर प्रतिक्रिया देतांना उद्धव ठाकरे म्हणाले होते. “तुम्हाला सुरक्षेचा अर्थ कसा कळणार? कारण तुम्हाला कोणापासून धोकाच नाही. आहे तो फक्तदिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून, तोही खुर्ची काढून घेतली जाण्याचा. सुरक्षा देणे किंवा काढणे ही तुमच्या मालकीची गोष्ट नाही. परंतु या निमित्ताने तुम्ही ज्या पातळीवर उतरलात ती पातळी सर्वसामान्यांना कळली असणार’, असे ठाकरे यांनी म्हटले होते.

शिवसेना आमदारांनीही केली सुरक्षा परत

सुरक्षा परत करण्याबाबतच्या उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनंतर, राज्यातील शिवसेनेचे आमदार आपली सरकारी सुरक्षा परत करीत आहेत, असे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी निवेदनाद्वारे जाहीर केले होते. आमचा विरोध पाकधाजिर्ण्यांना असल्याने शाहरुखच्या चित्रपटांना आमचा विरोध सुरूच राहील, असे त्यांनी त्यात म्हटले होते. दरम्यान, ‘मराठा मंदिर’मधील ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’चा शो सुद्धा  शिवसैनिकांनी बंद पाडले होते.

शिवसेनेचा विरोध झुगारून, प्रचंड पोलीस बंदोबस्तात शाहरूख खानचा माय नेम इज खान हा चित्रपट  राज्य सरकारने रिलीज करून दाखवला होता. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चिडले होते.  शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये ‘अकलेचे दिवाळे’ असा अग्रलेख लिहून अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की, त्या शाहरूख खानाचे बॉडीगार्ड? तसे असेल तर त्यांनी सुरक्षारक्षकाचा गणवेष चढवून खानाच्या मन्नत बंगल्याच्या दारात उभे राहावे व खानाकडे येणाऱ्या  जाणाऱ्याना  सलाम मारावेत, अशा  शब्दांत टीका केली होती.

 आजही जेव्हा पद्मावत किंवा इतर वादग्रस्त सिनेमांचा विषय निघतो, त्यावर बंदी आणायची मागणी करणाऱ्या संघटना आक्रमक होतात तेव्हा फिल्मइंडस्ट्रीच्या पाठीशी राहणारे इतकंच नाही तर पाठिंबा देण्यासाठी स्वतः थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणारे मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाणांचा उल्लेख हमखास होतो. 

Leave A Reply

Your email address will not be published.