आजही सदगुरुंवर त्यांच्या पत्नीचा खून केल्याचे आरोप होत असतात.

भारताला संताची भूमी असं म्हटलं जातं. गेली हजारो वर्षे जगाला अध्यात्मिक ज्ञान देण्याचं काम या देशाने केलं आहे. मात्र गेल्या काही काळात काही बाबांच्या मुळे या अध्यात्मिक परंपरेला मोठा तडा गेल्याच पाहायला मिळतं. राम रहीम, आसाराम, नित्यानंद असले कित्येक महाराज त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे एक तर देश सोडून पळून गेले नाही तर मग जेल मध्ये आहेत. मात्र कित्येक भक्त मंडळी अजूनही या गुरूंच्या चरणी लिन झालेली पाहावयास मिळते.

असेच एक बाबा आहेत ज्यांच्यावर देखील मोठमोठे आरोप आहेत मात्र त्यांची लोकप्रियता कधी कमी झालेली आढळून येत नाही

तर आपण आज इंग्लिश बोलणाऱ्या बाबांविषयी बोलूया…तुम्हाला एव्हाना कळलचं असेल मी कुणाचं नाव घेतेय….तेच ज्यांचे मोटीवेशनल व्हिडिओ प्रत्येकाच्या स्टेट्स ला दिसतात. जग्गी वासुदेव उर्फ जगदीश उर्फ सद्गुरू असो …

कोण आहेत ते ? कुठून आलेत ?

स्वतःला ‘गॉडमॅन’ म्हणून संबोधणारे जग्गी वासुदेव हे मुळचे कर्नाटक राज्यातील म्हैसूर शहरात एक तेलगू घराण्यातले. त्यांच्या आईने म्हणे लहानपणी एका ज्योतिषास त्यांचे भविष्य विचारले आणि तेव्हा त्यांनी सांगितले की, हया मुलाचे आयुष्य अतीशय भाग्यवान असेल म्हणून त्यांचे नाव जगदिश असे ठेवण्यात आले. वयाच्या ११ व्या वर्षी जग्गी राघवेंद्र राव उर्फ मल्लाडीहल्ली स्वामी यांच्या सहवासात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी योगाभ्यास सुरू केला..म्हणजे योग गुरु फक्त रामदेव बाबाच नाहीत हे ही त्याच्या यादीत येतात बरं.

त्यांचं इंग्लिश भारी आहे कारण त्यांनी प्राथमिक शालेय शिक्षणानंतर म्हैसूर विद्यापीठातून इंग्रजी भाषा विषयाची डिग्री मिळवली.

विद्यापीठात  शिकत असताना त्यांना  मोटरसायकल चालवण्यात रूची वाढू लागली म्हणून तर आत्ता त्यांच्याकडे अनेक महागड्या बाईक्स आहेत, असो

त्यांना एकदा भारत-नेपाळच्या सीमारेषेवर पासपार्ट नसल्यामुळे अडवण्यात आले होते आणि मग त्यांनी मनाशी निर्धार केला कि, खूप पैसे कमवायचे आणि स्वावलंबी होण्याचे ठरवले आणि त्यासाठी काही उदयोगही सुरू केले. उदा: पोल्ट्री फार्म, विटा बनवणे, बांधकाम इत्यादी. मग त्यात ते अयशस्वी झाले आणि मग ते पुढील बिझनेस मध्ये उतरले. कोणती ?

तर त्यांनी इशा फाऊंडेशनची स्थापना केली. थोडक्यात असं म्हणलं जातं कि, इशा फाऊंडेशन ही लोकहितासाठी काम करणारी संस्था आहे, जी योग शिबीर चालवते. इशा फाऊंडेशन भारतात तर आहेच तसेच अमेरिका, इंग्लंड, लेबनन, सिंगापूर आणि आस्ट्रेलिया या देशातही योगा शिकविते. सद्गुरू भारतात तर फेमस झालेच तसेच विदेशात ही झालेत.

त्यांनी खूप कमी काळात आपले साम्राज्य उभे केले त्यांच्या  या साम्राज्यावर अनेक शंका आणि प्रश्नहि निर्माण झाले..

त्यात विशेष असं काही नाही प्रत्येक महाराजांच्या श्रीमंतीवर प्रश्न उभे राहिले तरी त्याचे उत्तर मात्र मिळत नसतात.

त्यांच्या संस्था आणि इतर कार्यक्रमांवर पर्यावरणशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कित्येक आरोप केलेत, कर्नाटक उच्च न्यायालयातही एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती, हायकोर्टाने असा निर्णयही दिला की फाउंडेशनला त्यांच्या  निधी उभारणीच्या पद्धतींचा तपशील जाहीर करण्याची आवश्यकता आहे, त्याचे पुढे काय झाले सद्गुरुनांच माहिती.

बरं हे झाले त्यांच्या इशा फाऊंडेशनवरचे आरोप पण त्यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप म्हणजे त्यांनी त्यांच्या पत्नीची हत्या केली.

त्यांना एका मुलाखतीत या बद्दलचा प्रश्न केला असत त्यांनी एक विचित्र उत्तर दिले, म्हणे “माझ्या पत्नीची हत्या वगैरे झाली नव्हती तर तिने समाधी घेतली आणि आत्म्याने त्यांचे शरीर त्याग केले होते” 

१९९७ मधील प्रत्येक न्यूज चॅनल्सची व वर्तमानपत्रांची हेडलाईन होती कि, “सद्गुरूच्या पत्नी विजयकुमारी यांनी महासमाधी घेतली आणि त्यांनी स्वतःचे शरीर त्यागले”. सद्गुरूकडून असं सांगण्यात हि आले होते कि, योगाच्या कठोर साधनेद्वारे जाणीवपूर्वक शरीर सोडण्याची कृती आपण करू शकतो. परंतु यात एखाद्या योग साधनेत संपूर्ण समर्पण आणि दृढनिश्चयाची आवश्यकता असते.

परंतु त्यांच्या पत्नीच्या या ‘गुढ’ निधनानंतरच्या काही महिन्यात सद्गुरुवर त्याच्या पत्नीला मारल्याचा आरोप करण्यात आला होता.

परंतु याबाबत काहीही ठोस पुरावा मिळाला नसल्यामुळे हे आरोप फेटाळण्यात आले असले तरी त्यांच्या पत्नीचा मृत्यू एक गुढ रहस्य च बनून राहिले आहे.

सद्गुरूच्या पत्नी विजयकुमारी ज्यांना ‘विजी’ म्हणूनही ओळखले जात असायचे. या दोघांची भेट मैसूर ला झाली होती आणि ते दोघे प्रेमात पडले, लवकरच एकमेकांना प्रेमपत्रे पाठवायचे. त्यानंतर त्यांनी १९८४ लग्न केलं आणि १९९० मध्ये या जोडप्याला राधे जग्गी नावाची एकुलती एक मुलगी झाली.

विजयकुमारी जिवंत असताना तिने एका वित्तीय संस्थेत काम केल्याची माहिती आहे. मात्र त्यानंतर दुर्दैवाने, २३ जानेवारी १९९७ रोजी तिने महासमाधी घेतली आणि जाणीवपूर्वक आणि हेतूपुरस्सर शरीराला त्याग केले.

अशी माहिती हि सांगितली जाते कि, विजयाकुमारीने तिची महासमाधी भारतातल्या कोयंबटूर मध्ये असलेल्या ईशा योग केंद्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमात घेतली होती ज्याचे तिथे उपस्थितीत असलेले शेकोडो लोकं याचे साक्षीदार असल्याचेही म्हणले जाते.

परंतु विजीच्या निधनानंतर काही महिन्यांनी तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली कि,  आपल्या मुलीचा मृत्यू हा संशयास्पद आहे, तिची हत्या केली गेली आहे.

हा संशयाला आधार म्हणजे सद्गुरुने विजयाकुमारीच्या वडिलांना त्यांच्या मुलीचा मृतदेह पाहण्याची परवानगी दिली नव्हती. शिवाय या घटनेनंतर लगेचच तिचे अंत्यसंस्कार केले जे कि, कोणीही महासमधी घेतलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करीत नाही असा नियम मानला जातो.

१९९७ च्या ऑगस्टमध्ये ‘न्यू इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्राने असे म्हटले आहे की, सद्गुरुवर पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप करून त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण कोयंबटूर पोलिसांकडे होते.

त्याच्या आठ महिन्यांनंतर, एका बातमीत असे नमूद केले गेले आहे की, पोलिसांनी तपास केल्यावर पुरावे आढळले नाहीत म्हणून हे प्रकरणच बंद केले होते, कारण पुढे तपास करण्यात काही अर्थ नाही म्हणून असा निष्कर्ष काढला आणि हे प्रकरण असले तरीही सद्गुरु जग्गी वासुदेव आपल्या पत्नीच्या खुनाच्या अनेक आरोपांमुळे सतत चर्चेत असतात.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.