पहिल्यांदाच एक शेतकऱ्याचा लेक संपूर्ण टाटा समूहाचा चेअरमन बनला होता

टाटा ग्रुप. देशातल्या सर्वात यशस्वी उद्योग समूहाच्या यादीत यांचं नाव टॉपला घेतलं जात.  टाटा कंपनीचं कोणतही प्रॉडक्ट म्हंटल कि, एक विश्वास असतो आणि या टाटांचा विश्वास म्हणजे एन चंद्रशेखरन. टाटा समूहाचे चेअरमन. एखादं नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये उतरवायचं असो किंवा कुठं नवीन गुंतवणूक असो, आज कंपनीचे सगळे महत्वाचं निर्णय घेण्याची जबाबदारी चंद्रशेखरन यांच्यावर आहे.

चंद्रशेखरन तामिळनाडूच्या नमक्कल जिल्ह्यातले रहिवासी. त्यांचं संपूर्ण कुटुंब शेतीशी निगडित होतं. त्यांनी सुद्धा शेती करण्याचा प्रयत्न केला. पण कंप्यूटर आणि प्रोग्रामिंगचं नॉलेज आणि आवड त्यांना दुसऱ्या रस्त्यावर घेऊन गेली. आणि आज रिझल्ट आपल्या सगळ्यांच्या समोर आहे.

महत्वाचं म्हणजे आज ते ज्या ग्रुपचा सगळा कारभार सांभाळतायेत, एकेकाळी तिथे एक इंटर्न म्हणून त्यांनी कमाला सुरुवात केली होती.

अप्लाइड सायन्समध्ये पदवी घेतल्यानंतर, चंद्रशेखरन यांच्या वडिलांनी त्यांना कॉम्प्यूटरमध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले. ज्यानंतर कम्प्युटर प्रोग्रामिंगचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी तिरुचिरापल्लीचं रिजनल इंजिअरिंग कॉलेज गाठलं. तिथं कंप्यूटर सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं.

यांनतर १९८६ साली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) मध्ये चंद्रशेखरन इंटर्न म्हणून टाटा ग्रुपमध्ये एन्ट्री केली. त्यांच्या कामाच्या हुशारीने दोन महिन्यांचं त्यांची बढती झाली आणि कंपनीत फुल टाइम इंजिनिअर म्हणून जॉईन झाले.  तेव्हापासून चंद्रशेखरन टाटा समूहाचे कर्मचारी आहेत.

गेल्या ३५ वर्षांपासून त्यांनी कंपनीत वेगवगेळ्या पदांवर काम केलयं. ज्यामुळे कंपनीच्या छोट्या डिपार्टमेंटपासून ते मोठ- मोठ्या प्रॉजेक्टबद्दल त्यांना चांगलीचं माहित आहे.  त्यांनी हळूहळू स्वत: ला अपग्रेट केले. ९० च्या दशकात ते मॅनेजमेंटमध्ये रुजू झाले. त्यांनतर,२००९ मध्ये त्यांना कंपनीचे सीईओ बनवण्यात आले.  टीसीएसला जगभरात प्रसिद्ध करण्यात एन चंद्रशेखरन यांची मोठी भूमिका असल्याचे म्हंटले जाते.

पुढे आपल्या अनुभवाच्या आणि कामाच्या जोराववर ते २०१७  मध्ये टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सचे अध्यक्ष झाले. ज्यांचे ३० पेक्षा जास्त व्यवसाय आहेत, यात रसायने, ऑटोमोटिव्ह, कंसल्टंसी सर्व्हिसेस, हॉस्पिटॅलिटी आणि स्टीलचा समावेश आहे. या ग्रुपमध्ये जागतिक स्तरावर ७५,००० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, ज्यांचं नेतृत्व सध्या एन. चंद्रशेखर करतायेत.

विशेष म्हणजे टाटा समूहाच्या इतिहासात प्रथमच बिगर पारशी समाजातील व्यक्ती टाटा समूहाची प्रमुख बनलीये.

एन चंद्रशेखरन कॉर्पोरेट जगतात एक प्रभावी नेता म्हणून उदयास आले आहेत, जेआरडी आणि रतन टाटा सारख्या टाटा अध्यक्षांचा वारसा ते पुढे चालवणार असल्याचं देखील बोललं जतय. कारण कंपनी जे नवनवीन प्रयोग करतीये, नव्या क्षेत्रात आपलं नशीब अजमावतेय. यात नक्कीच चंद्रशेखरन यांची मेहनत आहे. 

एन चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखाली, टाटा समूह कोविड साथीच्या विरूद्ध लढ्यात एक प्रमुख कॉर्पोरेट संस्था म्हणून उदयास आला. या समूहाने कोविड -१९ च्या काळात जवळपास १४,००० कोटी रुपयांहून अधिक मदत दिली. कोरोना कॅम्प तयार करण्यापासून, अतिदक्षता केंद्रांसह ऑक्सिजन पुरवठा करण्यात टाटा समूहानं महत्वाची भूमिका निभावली.

एवढं नाही एका वेळी हा गट साथीच्या काळात भारताच्या मेडिकल ऑक्सिजनची १० टक्के मागणी पूर्ण करत होता. टाटा ग्रुपच्या या कामगिरीमुळे त्यांनी देशातच नव्हे जगभरातून वाह वा मिळवली. 

हे ही वाचं  भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.