राजनाथ सिंह म्हणतायेत आता लष्करासाठीचे उपकरणे आणि दारूगोळा देशातच तयार होणार

भारत आत्मनिर्भर होण्याचा काळ चालू झाला आहे…असं म्हणण्याचं निमित्त म्हणजे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडेच सांगितले कि, भारत आता  लष्करासाठी उपकरणे, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा देशातच तयार करणार !!!!

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले कि, अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि त्यांच्या अनेक मित्र राष्ट्रांना स्पष्टपणे कळवले आहे की देशाच्या अनेक सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांना आवश्यक असलेले लष्करी व्यासपीठ आणि उपकरणे येथे तयार केली जातील.

प्रादेशिक भौगोलिक-राजकीय घडामोडींचा संदर्भ देत राजनाथ म्हणाले की, भारताचं दुर्दैव म्हणजे भारताला असे काही शेजारी देश मिळालेत कि, आपली प्रगती त्यांना देखवत नाही.

संरक्षण मंत्री म्हणाले की, लष्करी उपकरणे बनवणाऱ्या देशांना लेस मेक इन इंडिया, लेस मेक फॉर इंडिया आणि लेस मेक फॉर वर्ल्ड असा संदेश देण्यात आला आहे. उदाहरण देतांना राजनाथ म्हणाले की, शुक्रवारी फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ले यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सिंह यांनी खुलासा केला आहे कि, फ्रान्सची एक मोठी कंपनी लवकरच भारतात विमानांचे इंजिन बनवण्यासाठी भारतात येणार आहे. 

तर रशियासोबतही भारत आता अमेठीत सहा लाख रायफल बनवणार आहे. रशियासोबत AK 203 रायफल्सचा हा एकूण करार पाच हजार कोटींचा आहे. या एपिसोडमध्ये, संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की,  फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ले यांनी भारताला भेट दिली होती तेंव्हा त्यांनी सांगितले कि, एक मोठी फ्रेंच कंपनी भारतात एरोस्पेस इंजिन तयार करण्यासाठी भारतात आली आहे…आणि ती लवकरच कमला लागणार आहे. संरक्षण मंत्री असंही म्हणाले की, ज्या देशांकडून शस्त्रे खरेदी केली जातात त्याच देशाला अमेरिका आपला मित्र मानते. पण आता अमेरिकेनेही भारताची सूचना पाळण्याचे मान्य केले आहे. 

भारताने रशिया, अमेरिका किंवा फ्रान्स या सर्व देशांना स्पष्टपणे सांगितले आहे की, भारत आता शस्त्रास्त्रे आयात करणार नाही, तर भारताला लागणारे शस्त्रे भारताच तयार करेल.

जरी कोणत्या  परदेशी कंपनीची इच्छा असेलच तर त्या कंपनीला आम्ही काही सवलती देऊ त्या म्हणजे,त्या म्हणजे या  कंपनी कोणत्याही भारतीय कंपनीशी भागीदारी करू शकतात किंवा स्वत: भारतात येऊन शस्त्रास्त्र प्रकल्प उभारू शकतात.

भारत इतर देशांवर अवलंबून राहू शकत नाही. पण या देशांसोबत भारत मैत्री कायम ठेवेल, पण त्याचवेळी लष्करी उपकरणे, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा देशातच तयार केला जाईल. भारताचा आकार, भौगोलिक स्थान आणि सुरक्षेची आव्हाने पाहता संरक्षण तंत्रज्ञानासाठी भारत इतर देशांवर इथून पुढे अवलंबून राहू शकत नाही. त्याचमुळे सरकारला आगामी काळात भारतात जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र बनवायची योजना आहे.  

सर्वात महत्वाचं म्हणजे, जरी भारत स्वदेशी फायटर जेट, एलसीए तेजस बनवत आहे, परंतु तरीही ते स्वदेशी विमानाचे इंजिन बनवू शकलेले नाही. २०१९ मध्ये, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राफेल लढाऊ विमानांची पहिली खेप घेण्यासाठी फ्रान्सला गेले होते, त्यावेळी त्यांनी पॅरिसजवळील सॅफ्रान नावाच्या कंपनीच्या प्लांटलाही भेट दिली होती जी जगभरात एरोस्पेस इंजिन तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे.

‘कम मेक इन इंडिया, कम मेक फॉर इंडिया, कम मेक फॉर द वर्ल्ड’

असं आवाहन संरक्षणमंत्र्यांनी जगभरातील शस्त्रास्त्र निर्मात्यांना केले आहे. 

संरक्षण क्षेत्रात भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याचे आमचे ध्येय असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. ते म्हणाले की, सध्या भारताची संरक्षण आणि एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग मार्केट सुमारे ८५ हजार कोटी आहे आणि २०२२ पर्यंत एक लाख कोटीपर्यंत पोहोचू शकते. २०२४-२५ पर्यंत भारताचे ३५ हजार कोटींचे निर्यातीचे लक्ष्य गाठले जाईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.