बीडला रेल्वे आलीय खरी पण रेल्वे आणण्याचं श्रेय नक्की कोणाचं ?
मराठवाड्यातील एखादा जिल्हा किती मागास असावा याचं प्रमाण काढायचं असेल तर त्या जिल्ह्यात रेल्वे आहे कि नाही यावरून काढता येईल. या मागास जिल्ह्यात टॉपला होतं बीड. आता नसणार कारण बीड मध्ये रेल्वे आलीय…बीडकरांचं रेल्वेचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. बीडमध्ये रेल्वे आल्याचा काय लेव्हलचा आनंद असेल हे फक्त एखादा बिडकर च सांगू सांगेल.
गेल्या कित्येक दशकांपासून भिजत घातलेला रेल्वेचा प्रश्न मार्गी लागलाय आणि हा प्रश्न मार्गी लावण्यात नक्की श्रेय कुणाला जातं ?
रेल्वेची सर्वप्रथम मागणी कुणी केली तसेच या रेल्वे प्रकल्पाचा पाठपुरावा कुणी केला याचीच चर्चा सगळीकडे चालू झाली आहे. पण बीडचे ग्रामस्थ या यशाचे श्रेय सर्वांनाच देतायेत. या सर्वांमध्ये कोण येतं? बीड च्या रेल्वेच्या मागणीचा इतिहास काय राहिलाय हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओच्या लिंकवर जा..