नागपूर विधानपरिषदेत काँग्रेसची अंतर्गत बंडाळीची गडबड भाजपच्या पथ्यावर पडली.

राज्यात दोनच विधानपरिषदा बिनविरोध होऊ शकल्या नव्हत्या. एक म्हणजे नागपूर आणि दुसरी अकोला – बुलडाणा – वाशिम. आज या दोन्ही जागांचा निकाल लागला आणि भाजपने या दोन्ही जागांवर मुसंडी मारल्याचं दिसलं.

पण असा नेमका कोणता डाव खेळला भाजपने ज्यामुळे या निवडणुकांत त्यांना बाजी मारता आली. राजकारणातले हे बेसिक्स सगळ्यांना समजले पाहजेत, या उक्तीप्रमाणे नागपूर विधानपरिषदेचा बोल भिडून घेतलेला आढावा.

तर राज्यात चार विधानपरिषदा बिनविरोध करण्यात सर्वपक्षीय नेत्यांना यश आलं. मात्र नागपूर आणि अकोला – बुलडाणा – वाशिम या विधानपरिषदा बिनविरोध झाल्या नाहीत. मग सर्व पक्षांचे नेते आपल्या आपल्या सीटा निवडून आणायच्या कामी लागले.

नागपूर मध्ये भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर केली. याविरोधात दंड थोपटले ते संघाच्या एका कार्यकर्त्याने. छोटू भोयर असं त्यांचं नाव. हे भोयर तसे नितीन गडकरींच्या जवळचे. पण मग उमेदवारी दिली नाही म्हणून त्यांनी बंडखोरी करत काँग्रेसचा हात धरला.

मग नागपूरच्या बाहेर चर्चा रंगू लागल्या त्या म्हणजे नागपूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघात होणार्‍या निवडणुकीत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसचे छोटू भोयर असा हायव्होल्टेज सामना बघायला मिळणार असल्याच्या.

पण नागपुरातल्या लोकांना तसा काही तो हायव्होल्टेज ड्रामा वाटतं नव्हता. त्याच कारण म्हणजे,

छोटू भोयर हे संघाच्या मुशीतले कार्यकर्ते असले तरी ते बावनकुळेंना फाईट देतील इतके मोठे नेते नाहीत. छोटू भोयर यांनी १९८६ पासून भाजपा युवा मोर्च्याचे सदस्य झाले. त्यानंतर १९८८ मध्ये अध्यक्ष झाले. त्यानंतर महामंत्री झाले. १९९७ मध्ये ते नागपूर महापालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. छोटू भोयर हे गेल्या ३४ वर्षांपासून भाजपमध्ये आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा रेशीमबाग कार्यालय असलेल्या भागातून ते नगरसेवक झाले हे विशेष. २००१ मध्ये ते उपमहापौर झाले. २००३ ते २००७ या काळात भाजपचे जिल्हा सचिव म्हणून पक्षाचे काम पाहिले. २००९ पासून २०१३ पर्यंत सरचिटणीस राहिले आहे. २०१२ मध्ये पुन्हा नगरसेवक झाले.

२०१२ ते २०१७ कालखंडात ते एनआयटीचे ट्रस्टी राहिले आहे. २०१७ मध्ये पुन्हा नगरसेवक म्हणून चौथ्यांदा निवडणून आले. त्यांची कमान तर चढती होती पण भाजपमध्ये त्यांच्यावर अन्याय होतोय असं त्यांना वाटलं. २०१९ मध्ये दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात त्यांनी दावा केला होता. पण छोटू भोयर हे बावनकुळेंच्या तुलनेत तेवढे तुल्यबळ उमेदवार नाहीत. सध्याच्या विधानपरिषदेचा विचार करता भाजपकडे अंदाजे अधिकच्या ६० जागांची गोळाबेरीज होती.

भोयर गडकरींच्या जवळचे होते मात्र काही घडामोडी बघता भोयरचं गडकरींवर नाराज असल्याचं चित्र होत. २०१२ ते २०१७ कालखंडात भोयर हे एनआयटीचे ट्रस्टी राहिले आहेत. खरं तर पदाचा कालावधी असतो पाच वर्षांचा. पण गडकरींनी भोयर यांना राजीनामा द्यायला लावला. २०१९ मध्ये जेव्हा भोयर यांनी विधानसभेची उमेदवारी मागितली तेव्हा सुद्धा गडकरींनीच त्यांना ती नाकारली. त्यामुळे हे नाराजीसत्र होत. त्यामुळे बावनकुळेंची उमेदवारी पक्की झाली.

मग काँग्रेसने आयात केलेले नगरसेवक भोयर तिकीट दिलं. काँग्रेसनं सुरुवातीला जी आक्रमक चाल खेळली त्यानंतर काँग्रेस तितकी आक्रमक राहिली नाही. शेवटच्या क्षणी तर काँग्रेसने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. काँग्रेसचं हे गणित कोणालाच समजलं नाही. आम्हाला हि नाही. मग आम्ही नागपुरातल्या वरिष्ठ राजकीय पत्रकारांशी संपर्क साधला. बऱ्याच जणांनी माहिती देण्याचं टाळलं. तर काहींनी माहिती दिली पण ती नाव ना छापण्याच्या अटीवर.

काँग्रेसने शेवटच्या क्षणी आपला निर्णय का बदलला या प्रश्नावर ते पत्रकार म्हंटले कि,

सुरुवातीला भोयर यांना घ्यायचं कि नाही यावरूनच काँग्रेस मध्ये अंतर्गत वाद होता. तसा तो वाद नितीन राऊत आणि सुनील केदार यांच्यात होता. त्यांना भोयर यांना तिकिटाच द्यायचं नव्हतं. पण मग ते द्यावं लागलं. काँग्रेसच्या या नेत्यांनी शेवटपर्यंत छोटू भोयर यांना काहीच मदत केली नाही. आणि शेवटी त्यांच्यावर म्हणजेच भोयर यांच्यावरच खापर ठेवलं कि ते या प्रचारात जास्त सक्रियच नाहीत.

शेवटच्या दिवशी सुनील केदार यांनी सूत्र हातात घेत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. त्यासंबंधीचे पत्रक आदल्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी काढले. काँग्रेसच्या नेत्यांमध्येच उमेदवारीवरुन दोन गट पाहायला मिळाले. काँग्रेसमधील नियोजनातील गडबड भाजपच्या पथ्यावर पडली.

या हि पुढे जाऊन ते पत्रकार म्हंटले कि, नागपुरातल्या काँग्रेसच्या नेत्यांनीच काँग्रेसचा बाजार केला. तसं पाहायला गेलं तर चंद्रशेखर बावनकुळे यांचे नागपुरातल्या सर्वपक्षीय नेत्यांशी चांगलेच संबंध आहेत. त्यामुळे त्यांना मदत व्हावी अशाच प्रकारची खेळी खेळण्यात आली. आणि शेवटी हा रडीचा डाव नाना पटोले यांचावर टाकत सर्व काँग्रेसी नेते मोकळे झाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.